महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक ४१] बुधवार, ऑक्टोबर १६, २०१९/आशि्वन २४, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ५८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ ऑक्टोबर २०१९
आदेश
क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१९/प्र.क्र.२५/का.७.---मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (१८८८ चा मुंबई ३) च्या कलम १९(१)(ब), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (१९४९ चा मुंबई ५९) च्या कलम ७-अ, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) च्या कलम ११, महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५) च्या कलम १३ तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) चे कलम १०-अ व १२ चे पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक ०४ ऑक्टोबर, २०१९ या दिवशी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी, माहे डिसेंबर, २०१९ ते जानेवारी, २०२० मध्ये होणाया महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच नगरपरिषदा/ नगरपंचायतीच्या (अध्यक्ष पदासह) व ग्रामपंचायतींच्या (सरपंच पदासह) सार्वत्रिक/पोट निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येईल, असे अधिसूचित करण्यात येत आहे.
मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,
राजाराम झेंडे,
सहसचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.
(१) ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.