Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील शासकीय सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याबाबतचे सुधारित अंतिम उपविधी प्रसिद्ध करणेबाबत.

Published 17 October 2019

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-10-17.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2012 / 47985

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष ८ , अंक १६ ]

गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७ २३ , २०१ ९ / आश्विन २५ ते कार्तिक १ , शके १ ९ ४१

[ पृष्ठे २

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

जाहीरनामा

क्रमांक कार्या-११ /नपा/ आरआर -४११ /३/४४४/३/२०१९ .--इचलकरंजी नगरपरिषदेने शासकीय सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला देणेबाबत केलेल्या उपविधींना नगर विकास विभागाकडील शासन परिपत्रक क्रमांक जीईएन-१०८९/१३७९/ सीआर-१ ९ ३/नवि-१४ , दिनांक ९ ऑक्टोबर १ ९ ८ ९ व शासन परिपत्रक क्रमांक सफाई-२०१६/प्र . क्र. ३७०/नवि-२० , दिनांक २७ सप्टेंबर २०१६ मधील तरतुदींनुसार उक्त नमूद आदेशान्वये मान्यता देणेत आली होती . त्यानुसार सदर उपविधी दिनांक २६ सप्टेंबर २०१ ९ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणेत आले आहेत . तथापि, मुख्याधिकारी , इचलकरंजी नगरपरिषद यांनी सादर केलेला अंतिम उपविधीचा मसुदा व उक्त नमूद आदेशासोबतचा उपविधीचा मसुदा यामध्ये तफावत असलेचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे उक्त नमूद आदेशान्वये करणेत आलेले व दिनांक २६ सप्टेंबर २०१ ९ रोजीचे शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध करणेत आलेले अंतिम उपविधीमध्ये सुधारणा करून खालीलप्रमाणे सुधारित अंतिम उपविधी प्रसिद्ध करणेत येत आहेत.

सुधारित अंतिम उपविधी

इचलकरंजी नगरपरिषद , जिल्हा कोल्हापूर

(१ ) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ३२२ नुसार शासकीय सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला देणेबाबतचे उपविधी असे संबोधणेत येईल.

(२) व्याख्या.--

1. " सफाई कर्मचारी " म्हणजे इचलकरंजी नगरपरिषदेने सफाई कर्मचारी म्हणून नियुक्त केलेले व शासनाने " सफाई कर्मचारी " या संज्ञेत समाविष्ट केलेले कर्मचारी असा आहे .

II . " कामाची वेळ " म्हणजे सकाळी ६.०० ते दुपारी १.०० अशी राहील .

III . " सार्वजनिक सुट्टी" म्हणजे दुसरा व चौथा शनिवार व महाराष्ट्र शासनाने व मा. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी शासकीय सुट्ट्या म्हणून जाहीर केलेल्या सुट्ट्या.

IV . " मोबदला " म्हणजे सार्वजनिक सुट्टी दिवशी काम केल्याबद्दल दिली जाणारी रक्कम तथा मोबदला.

V. " अधिकारी " म्हणजे मुख्य अधिकारी किंवा त्याचे वतीने आदेशित करणेत येईल असा अधिकारी .

VI . " अत्यावश्यक सेवा " म्हणजे शासनाने वेळोवेळी अत्यावश्यक सेवा म्हणून ठरविलेल्या सेवेचा यात समावेश होईल .

(३ ) शासन व नगरपरिषदस्तरावर जाहीर होणाऱ्या शासकीय सुट्ट्यांचे दिवशी नगरपरिषदेचे सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टीच्या दिवशी काम करणे अपरिहार्य असलेस सफाई कर्मचाऱ्यांनी पर्यायी सुट्टीची लेखी मागणी केल्यास पर्यायी सुट्टी देण्यात यावी अन्यथा सफाई कर्मचाऱ्याला सुट्टीऐवजी वेतन अदा करणे आवश्यक राहील.

(१)

एच-४५६ , भाग एक-अ(पु.वि.पु.)-१६ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १७ २३ , २०१९ / आश्विन २५ ते कार्तिक १ , शके १ ९४१ (४ ) सार्वजनिक सुट्ट्या दिवशी काम करण्यावरील मर्यादा .

( अ) सार्वजनिक सुट्ट्या दिवशी काम करणे खरोखरच आवश्यक आहे अशी जी परिस्थिती निर्माण झाली असेल तिचे सांगोपांग विवेचन, हे विवेचन नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी किंवा त्याचे वतीने आदेशित करणेत येईल असा अधिकारी यांनी तत्कालीन परिस्थितीनुसार सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून ठरविणेचे आहे.

( ब) " अपरिहार्य कारण " म्हणजे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करून घेतल्याशिवाय इलाज नाही/ पर्याय नाही/गत्यंतर नाही अशी निर्माण झालेली परिस्थिती.

(क) उद्भवलेली परिस्थिती ही अपरिहार्य कारणासारखी आहे वा का टाळणेसारखी नाही याची कारणमीमांसा तसेच चिकित्सा त्या त्या वेळी करणे मुख्य अधिकारी किंवा त्यांचे वतीने आदेशित करणेत येईल असा अधिकारी यांचेवर बंधनकारक राहील .

(ड) मुख्य अधिकारी किंवा त्यांचे वतीने आदेशित करणेत येईल अशा अधिकाऱ्यांनी केलेली कारणमीमांसा व चिकित्सा योग्य आहे की अयोग्य वा त्यातून अन्य मार्ग काढणे शक्य आहे किंवा कसे हे ठरविणेचा सर्वस्वी अंतिम अधिकार मुख्य अधिकारी यांचा राहील.

(इ) सार्वजनिक सुट्टी दिवशी काम करून घेतलेच पाहिजे असे म्हणण्याचा कोणताही व कसलाही अधिकार नगरपरिषद कर्मचारी संघटना वा कर्मचारी यांना असणार नाही.

(फ) सार्वजनिक सुट्टी दिवशी काम करून घेणे याचा अर्थ सर्वच सफाई कर्मचाऱ्यांकडून सरसहा काम करून घेणे असा नव्हे. मर्यादित कर्मचाऱ्यांच्याकडून अथवा काही विशिष्ट कर्मचाऱ्यांच्याकडून ते काम करून घेणे शक्य असेल तर तसे करून घेणेचा अधिकार सर्वस्वी मुख्य अधिकारी यांचा असेल .

मात्र तसे करताना त्या त्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच ते काम करून घेणे आवश्यक असेल . अपवादात्मक परिस्थितीत मुख्य अधिकारी अन्य योग्य वाटतील ती उपाययोजना करू शकतील.

(ग) अत्यावश्यक परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती या परस्पर भिन्न समजण्याच्या आहेत . नैसर्गिक आपत्तीच्या वेळी करून घेण्याच्या कामाविषयी हे उपविधी लागू होणार नाहीत.

(५ ) हे उपविधी महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या दिनांक २७ सप्टेंबर २०१६ च्या परिपत्रकानुसार उपविधी तयार करणेचे अधिकार बहाल करणेत आलेने ही उपविधी करणेत येत आहेत .

( ६ ) हे सुधारित उपविधी महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाले दिनांकापासून लागू होतील .

दौलत देसाई ,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर .

कोल्हापूर , ९ ऑक्टोबर २०१ ९ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 October 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-10-17.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-10-17.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.