RNI No. MAHBIL / 13/ 2 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ८ , अंक - २९ ]
शुक्रवार , ऑक्टोबर १८ , २०१९ / आश्विन २६ , शके १९ ४१
[ पृष्ठे ०३
असाधारण क्रमांक २ ९
प्राधिकृत प्रकाशन
विभागीय आयुक्त यांजकडून
संदर्भ.- ( १ ) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम , १ ९ ४ ९ चे कलम १० (१ -ई).
( २ ) राज्य निवडणूक आयोग , मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०० ९/प्र. क्र.-१३/का-५ व का-६ , दिनांक ५ जून २०१० .
( ३ ) उपआयुक्त ( निवडणूक) , महानगरपालिका , अहमदनगर यांचे पत्र क्रमांक साप्रवि/निवडणूक/११८३ , दिनांक ३१ जानेवारी २०१ ९ .
( ४ ) या कार्याकडील नोटिस क्रमांक २०१ ९/ नपा/१/२ /६३४५ , दिनांक ११ मार्च २०१ ९ तसेच समक्रमांकाच्या नोटिसा , दिनांक २२ एप्रिल २०१ ९ व २३ मे २०१ ९ .
(५ ) आयुक्त, महानगरपालिका , अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक साप्रवि/निवडणूक/२७२ , दिनांक ९ ऑगस्ट २०१ ९.
आदेश
क्रमांक नपा/१ /२ /१३१६१/२०१ ९ . - ज्याअर्थी, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम , १ ९ ४ ९ चे कलम १० (१ -ई) अन्वये " राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने , निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यास कसूर केली आहे " , अशा उमेदवारांना अनर्ह ठरविणेची तरतूद आहे ;
आणि ज्याअर्थी, संदर्भ क्रमांक (२ ) वर नमूद आदेशान्वये महानगरपालिका निवडणुका लढविणाऱ्या उमदेवारांनी निवडणूक खर्चाची माहिती शपथपत्रासह राज्य निवडणूक आयोगाने विहित केल्यानुसार निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या कालावधीमध्ये सादर न केल्यास , अशा उमेदवारांना अनर्ह ठरविण्याबाबतचे अधिकार विभागीय आयुक्त यांना प्रदान केलेले आहेत ;
ज्याअर्थी, संदर्भ क्रमांक (३ ) वर नमूद पत्रान्वये उपआयुक्त ( निवडणूक) , अहमदनगर महानगरपालिका यांनी अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक , २०१८ मध्ये निवडणूक लढविणाऱ्या १५ उमेदवारांनी निवडणुकीत केलेल्या खर्चाबाबतची माहिती शपथपत्रासह विहित मुदतीत सादर केलेली नाही , अशा १५ उमेदवारांचा तपशील या कार्यालयास सादर केलेला आहे.
त्यानुसार अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक, २०१८ मधील निवडणूक लढविलेले व विहित मुदतीत शपथपत्रासह खर्चाची माहिती सादर न केलेल्या उमेदवारांना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम , १ ९ ४९ चे कलम १० (१ - ई) मधील तरतुदीनुसार अनर्ह का ठरविण्यात येऊ नये , याबाबत खुलासा सादर करण्यासाठी संदर्भ क्रमांक ( ४) वर नमूदनुसार नेमून दिलेल्या सुनावणी दिवशी व वेळी उपस्थित राहण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या . सदर नोटिसांमध्ये त्यांनी जर नेमून दिलेल्या दिवशी म्हणणे सादर केले नाही तर त्यांचे काहीएक म्हणणे नाही, असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येईल , असे देखील उमेदवारांना कळविण्यात आले होते.
(१)
वि (एच) ४५९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , ऑक्टोबर १८ , २०१९ / आश्विन २६ , शके १९ ४१ दिनांक १ ९ मार्च २०१ ९ रोजी १५ उमेदवारांपैकी श्री. काळोखे डॅनियल राजेंद्र ( प्रभाग क्रमांक १० - ड) समक्ष उपस्थित होते. तर अन्य सर्व उमेदवार अनुपस्थित होते . प्रकरणी पुढील सुनावणी दिनांक ८ मे २०१ ९ रोजी श्री . काळोखे डॅनियल राजेंद्र ( प्रभाग क्रमांक १० - ड) व श्री. अजीम नूरमोहम्मद राज ( प्रभाग क्रमांक १२ -ड) या दोन उमेदवारांनी समक्ष उपस्थित राहून लेखी खुलासा सादर केला . तर अन्य सर्व उमेदवार अनुपस्थित होते . दिनांक १ ९ जून २०१ ९ रोजीच्या सुनावणीवेळी श्रीमती सोनाली उमेश झेंडे ( प्रभाग क्रमांक १० - क ) यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे पती श्री . उमेश अरुण झेंडे , राहणार अहमदनगर हे उपस्थित होते .
(१) श्री. काळोखे डॅनियल राजेंद्र (प्रभाग क्रमांक १० -ड) यांनी दिनांक ८ मे २०१ ९ रोजीच्या सुनावणीवेळी त्यांचा लेखी खुलासा सादर केला असून त्यांचे म्हणणे असे आहे की, अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०१८ मध्ये केलेल्या खर्चाचे तपशीलवार हिशोब शपथपत्रासह दिनांक १० जानेवारी २०१ ९ रोजी महानगरपालिका कार्यालयात सादर केलेला आहे. सबब त्यांना दिलेली नोटिस रद्द करणेबाबत त्यांनी विनंती केली . सदर खुलाशासोबत त्यांनी सादर केलेल्या खर्चाची कागदपत्रे व शपथपत्राची छायाप्रत सादर केली.
( २ ) श्री. अजीम नूरमोहम्मद राजे (प्रभाग क्रमांक १२ - ड) यांनी दिनांक ८ मे २०१ ९ रोजीच्या सुनवणीवेळी लेखी खुलासा सादर केला असून त्यांचे म्हणणे आहे की , माझे जवळचे नातेवाईक यांची तब्बेत बरी नसल्याने व त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याने , ते अस्वस्थ असल्याने ते मुदतीत खर्च सादर करू शकले नाहीत . तसेच त्यांनी खर्च सादर करणेकामी १५ दिवसांची मुदत मागितली होती . तथापि, अद्यापपर्यंत त्यांनी निवडणूक खर्चाची कागदपत्रे सादर केलेली नाहीत .
(३) दिनांक १९ जून २०१ ९ रोजीच्या सुनावणीवेळी श्रीमती सोनाली उमेश झेंडे (प्रभाग क्रमांक १० - क) यांनी त्यांचे प्रतिनिधी श्री . उमेश अरुण झेंडे , राहणार अहमदनगर यांचेमार्फत खुलासा सादर केला असून सदर खुलाशासोबत अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०१८ मध्ये विहित मुदतीत सादर केलेल्या खर्चाची कागदपत्रे व शपथपत्राची छायापत्र सादर केली.
उक्त उमेदवारांनी दिलेल्या लेखी खुलाशांचे तसेच संदर्भ क्रमांक ( ५ ) वर नमूद पत्रान्वये आयुक्त, महानगरपालिका, अहमदनगर यांचेकडील अभिप्रायाचे अवलोकन केले असता श्री. काळोखे डॅनियल राजेंद्र व श्रीमती सोनाली उमेश झेंडे यांनी अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०१८ साठीचा निवडणूक खर्च मुदतीत सादर केल्याचे दिसून येते. तसेच श्री. अजीम नूरमोहम्मद राजे यांचे खुलाशाचे अवलोकन करता , त्यांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर न करण्याचे कोणतेही ठोस कारण नमूद केलेले नाही , हे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांचा सुनावणीवेळी सादर केलेला खुलासा अमान्य करण्यात येत आहे. त्यामुळे ते पुढील तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरविण्यास पात्र आहेत.
उर्वरित १२ उमेदवार हे नोटिसा देऊनही सुनावणीकामी हजर झालेले नाहीत , त्यामुळे त्यांना त्यांच्याविरुध्द करण्यात आलेल्या आरोपाचा खुलासा करण्यास स्वारस्य नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे तेही पुढील तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरविण्यास पात्र आहेत.
त्याअर्थी , मी , राजाराम माने , विभागीय आयुक्त, नाशिक विभाग , नाशिक मला प्राप्त अधिकाराचा वापर करून महानगरपालिका , २०१८ सार्वत्रिक निवडणुकीत केलेल्या खर्चाबाबतची माहिती मुदतीत सादर न केल्यामुळे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम , १ ९ ४ ९ चे कलम १० (१ - ई) चे अन्वये आदेशाच्या दिनांकापासून खाली नमूद केलेल्या एकूण १३ उमेदवारांना निवडणूक लढविण्यास पुढील ३ वर्षांसाठी अनर्ह ठरवित आहे.
परिशिष्ट
अ. क्र.
उमेदवाराचे नाव
प्रभाग क्रमांक
१
२
उमेदवाराचा पत्ता ४
३
१
२ -ड
आंधळे भाऊसाहेब बाबुराव गुरुकुल सोसायटी, वसंत टेकडी, पाईप लाईन रोड, सावेडी, अहमदनगर ७-अ
२
रेखासुनील केदार
नम्रता हॉटेलशेजारी , श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल , अहमदनगर ७-क
स्वाती अमोल लगड
३
रेणुकानगर , बोल्हेगाव, अहमदनगर
४
७-क
सुवर्णा संदिप सप्रे
दावल मलिक चौक , नागापूर , अहमदनगर
शिंदे शोभा काशिनाथ
८-अ
५
ठाणगे मळा, आदर्श कॉलनी , दत्त मंदिरजवळ , अहमदनगर ६
गवळीवाडा, सिव्हिल हॉस्पिटलजवळ , अहमदनगर
९-ब
दिवटे सुरेखा अनिल
७
१० -अ
उडाणशिवे भाऊसाहेब
रामवाडी, अहमदनगर
३ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , ऑक्टोबर १८ , २०१ ९ / आश्विन २६ , शके १ ९ ४१
परिशिष्ट -चालू
अ. क्र.
उमेदवाराचे नाव
उमेदवाराचा पत्ता
प्रभाग क्रमांक
१
४
२
३
१० -अ
पारधे वैभव अनिल
८
तारकपूर , अहमदनगर
१० -क
९
कादरी मस्जिदजवळ, झेंडीगेट , अहमदनगर
शेख नुरजहाँ गफुर
१०
११ -ब
शेख गयास शब्बीर
घर नंबर २१२१ , नालबंद खुंट , अहमदनगर
शेख शमीम उमर
११
११ -ड
घर नंबर ३२३५ , काळू बागवान गल्ली, अहमदनगर
११-ड
१२
घर नंबर १ ९९ ४ , पारशा खुंट, चाबुकस्वार बिल्डिंग, तालुका-जिल्हा अहमदनगर हुच्चे जगन बबन
१२-ड
१३
घर नंबर २५०६ , तांबटकर गल्ली , शहाजी रोड, अहमदनगर अजीम नुरमोहम्मद राजे
राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक विभाग, नाशिक.
नाशिक, २१ सप्टेंबर २०१ ९ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .