Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडील अधिसूचना (उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे अधिकार प्रदान करणेबाबत).

Published 19 October 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-10-19.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- पुणे विभागीय पुरवणी शनिवार , ऑक्टोबर १ ९ , २०१ ९ / आश्विन २७ , शके १९४१

वर्ष - ८ , अंक - २२ ]

[ पृष्ठ १

असाधारण क्रमांक २२

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे अधिकार प्रदान करणेबाबत

अधिसूचना

क्रमांक पगस/एसआर-१६१०/२०१ ९ .- विस्फोटक कायदा , १८८४ चे कलम ४ ( सी) प्रमाणे जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यक्षेत्रातील स्फोटक पदार्थांच्या परवानगीकरिता ४ ( बी) प्रमाणे जिल्हादंडाधिकारी हे सक्षम आहेत. दरवर्षी दीपावलीनिमित्त सर्व ग्रामीण भागातून तात्पुरत्या स्वरूपात फटाका स्टॉलसाठी विस्फोटक पदार्थ नियम , १ ९ ८३ चे नियम १५५ अन्वये फॉर्म नंबर २४ या विहित नमुन्यात २५ किलो तसेच १००० किलोच्या आत फटाका परवाना दिला जातो .

या तात्पुरत्या परवान्यासाठी दिवाळी या सणानिमित्त ग्रामीण भागातून फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्यासाठी विस्फोटक कायदा, १८८४ चे कलम ४ ( सी) प्रमाणे जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यक्षेत्रातील स्फोटक पदार्थांच्या परवानगीकरिता ४ (बी) प्रमाणे व विस्फोटक अधिनियम , १८८४ चे कलम १७ - अ नुसार मी, नवल किशोर राम , जिल्हादंडाधिकारी, जिल्हा पुणे या आदेशाद्वारे पुणे जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी , पुणे, शिरूर, हवेली, दौंड, पुरंदर, भोर , वेल्हा , मावळ, मुळशी , बारामती , इंदापूर , जुन्नर, आंबेगाव, खेड यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील तात्पुरत्या स्वरूपातून फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्याचे अधिकार प्रदान करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा आदेश निर्गमित केलेच्या तारखेपासून पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील.

उपविभागीय दंडाधिकारी , पुढे उल्लेख केलेली कर्तव्य पार पाडण्यास सक्षम राहतील.

(एक) तात्पुरता फटाका परवाना देण्याचे काम.

(दोन) सदरचे अधिकार हे उपविभागीय दंडाधिकारी यांनी त्यांच्या अधिपत्याखाली तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना त्यांचे स्तरावरून प्रदान करता येणार नाही .

(तीन) मा . सर्वोच्च न्यायालय यांनी दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ रोजी फटाक्यांबाबत केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही करावी . सदर आदेशाची अंमलबजावणी करून आपले अधिनस्त कार्यक्षेत्रात बेकायदेशीर फटाका विक्री होणार नाही , याबाबत खबरदारी घ्यावी .

नवल किशोर राम, पुणे , १८ ऑक्टोबर २०१ ९ .

जिल्हाधिकारी , पुणे .

(१)

एच-४६० भाग एक-असा. ( पु.वि.पु.) - २२

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED ATYERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE- 411 006. EDITOR: SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 October 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-10-19.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-10-19.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.