महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ५, अंक ५०] बुधवार, ऑक्टोबर ३०, २०१९/कर्ातिक ८, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ७३
प्राधिकृत प्रकाशन
बृहन्मुंबई महानगरपालिका
MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI
निवडणूक मुख्य कार्यालय : ४था मजला, जे. बी. शाह मंडई इमारत, युसुफ मेहरअली मार्ग, मस्जिद (प.), मुंबई ४०० ००९.
क्रमांक MGC/F/726
अधिसूचना
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी, २०१७ नागरिकांच्या मागासवर्गातील स्त्रियांसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्र. ३२ मधून श्रीम. किंणी स्टेफी मॉरेस निवडून आल्या होत्या. त्यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम ५ ब अन्वये दिनांक २३ फेब्रुवारी २०१७ पासून त्यांचे नगरसेवक पद आपोआप रद्द झाल्याचे औपचारिक आदेशाचे पत्र देण्यात आले होते.
उच्चतम द्वितीय क्रमांकाची मते मिळवणारे उमेदवार श्रीम. गीता किरण भंडारी यांनी लघुवाद न्यायालयात याचिका क्र. EP/15/2017 दाखल केली होती. यामध्ये विजयी उमेदवार श्रीम. किंणी स्टेफी मॉरेस यांच्या जातीचे प्रमाणपत्राच्या वैधतेचा मुद्दा उपस्थित केला होता.
सदर प्रकरणी मा. लघुवाद न्यायालयाने याचिका क्र. EP/15/2017 ची सुनावणी घेऊन दिनांक १४ ऑक्टोबर २०१९ रोजी श्रीम. किंणी स्टेफी मॉरेस यांची नगरसेवकपदी झालेली निवड दिनांक २३ फेब्रुवारी २०१७ पासून रद्दबातल करण्यात येत आहे आणि श्रीम. गीता किरण भंडारी यांना विजयी घोषित करण्यात येत आहे असे आदेश दिले आहेत.
यास्तव, श्रीम. गीता किरण भंडारी (शिवसेना) यांना दिनांक १४ ऑक्टोबर २०१९ पासून प्रभाग क्र. ३२ मधून निर्वाचित घोषित करण्यात येत आहे.
मुंबई,
प्रवीण परदेशी,
दिनांक २३ ऑक्टोबर २०१९.
महापालिका आयुक्त.
भाग दोन-७३---१ ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : DIRECTOR, DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.