Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV Ext. 55 (8th November 2019) सन 2019 च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 29

Published 08 November 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, नोव्हेंबर ८, २०१९/कर्ातिक १७, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ५, अंक ३०] शुक्रवार, नोव्हेंबर ८, २०१९/कर्ातिक १७, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ५५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे

१-३ सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९.--- महाराष्ट्र राज्यातील प्रसारमाध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर होणाया हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रसारमाध्यमातील व्यक्ती किंवा प्रसारमाध्यम संस्था यांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा हानी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच तत्संबंधित व तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम. . . . . . . . .

दिनांक २८ ऑक्टोबर २०१९ रोजी माननीय राष्ट्रपतींनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९.

(माननीय राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर "महाराष्ट्र शासन राजपत्रात" दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र राज्यातील प्रसारमाध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर

होणाया हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रसारमाध्यमातील व्यक्ती किंवा प्रसारमाध्यम

संस्था यांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा हानी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच तत्संबंधित व

तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम.

ज्याअर्थी, प्रसारमाध्यमातील व्यक्तींच्या जीवितास क्षती किंवा धोका पोहोचवणाया आणि प्रसारमाध्यमातील व्यक्तींच्या किंवा प्रसारमाध्यम संस्थांच्या मालमत्तेस नुकसान किंवा हानी पोहोचवणाया हिंसक कृत्यांमध्ये वाढ होत असून त्यामुळे राज्यात असंतोष निर्माण होत आहे ;

(१)

भाग चार-५५-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, नोव्हेंबर ८, २०१९/कर्ातिक १७, शके १९४१ आणि ज्याअर्थी, प्रसारमाध्यमातील व्यक्तींवरील हिंसाचारास प्रतिबंध करण्यासाठी आणि अशा हिंसक कृत्यांपासून प्रसारमाध्यमातील व्यक्तींच्या किंवा प्रसारमाध्यम संस्थांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांच्या प्रतिबंधासाठी आणि त्याच्याशी संबंधित आणि तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याची आवश्यकता आहे ;

त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या अडुसष्टाव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :------

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व संक्षिप्त नाव व प्रारंभ.

मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७ असे म्हणावे.

(२) तो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू असेल.

व्याख्या. २. या अधिनियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर,----

(क) " प्रसारमाध्यम संस्था " यात कोणतीही नोंदणीकृत वृत्तपत्र आस्थापना, वृत्तवाहिनी आस्थापना, वृत्तांकन आधारित इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम आस्थापना किंवा वृत्तकेंद्र आस्थापना, यांचा समावेश होतो ;

(ख) " प्रसारमाध्यमातील व्यक्ती " याचा अर्थ, ज्या व्यक्तीचा प्रमुख व्यवसाय पत्रकाराचा असेल आणि जी एक किंवा अधिक प्रसारमाध्यम संस्थेमध्ये किंवा संस्थेच्या संबंधात एकतर नियमित किंवा कंत्राटी तवावर पत्रकार म्हणून नियुक्त केली गेली असेल अशी व्यक्ती, असा आहे, आणि त्यामध्ये संपादक, वृत्तसंपादक, उप संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, व्यंगचित्रकार, वृत्तछायाचित्रकार, दूरचित्रवाणी कॅमेरामन, अग्रलेखक, प्रसंगविशेष लेखक, संहिता तपासनीस आणि मुद्रितशोधक यांचा समावेश होतो, मात्र, जी व्यक्ती,----

(एक) मुख्यवेकरून व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय नात्याने नेमलेली असेल, किंवा (दोन) पर्यवेक्षकीय नात्याने नेमलेली असून एकतर तिच्या पदाशी संलग्न असलेल्या कर्तव्यांच्या स्वरूपामुळे किंवा तिच्या ठायी निहित असलेल्या अधिकारामुळे मुख्यवेकरून व्यवस्थापकीय स्वरूपाची कार्ये पार पाडीत असेल,

अशा कोणत्याही व्यक्तींचा त्यामध्ये समावेश होणार नाही ;

(ग) " वृत्तपत्र " याचा अर्थ, लोकवार्ता किंवा लोकवार्तेवरील टिकाटिप्पणी अंतभर्ूत असलेले कोणतेही

१९५५ चा ४५.

मुद्रित किंवा ऑनलाईन नियतकालिक, असा आहे, आणि त्यामध्ये केंद्र सरकार याबाबतीत श्रमिक पत्रकार व अन्य वृत्तपत्र कर्मचारी (सेवाशर्ती) आणि संकीर्ण उपबंध अधिनियम, १९५५ अन्वये वेळोवेळी राजपत्रात अधिसूचित करील अशा अन्य वर्गाच्या मुद्रित किंवा ऑनलाईन नियतकालिक कामाचा समावेश होतो ;

(घ) " वृत्तवाहिनी " याचा अर्थ, जिची भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे वृत्तवाहिनी म्हणून नोंदणी केलेली असेल अशी वृत्तवाहिनी, असा आहे ;

(ङ) " वृत्तपत्र आस्थापना " याचा अर्थ, एखादी व्यक्ती किंवा व्यक्तींचा निकाय- मग तो एक किंवा अधिक वृत्तपत्रांच्या कोणत्याही र्िनमितीसाठी किंवा प्रकाशनासाठी अथवा कोणतीही वृत्तसंस्था किंवा माध्यम संस्था चालवण्यासाठी विधिसंस्थापित झालेला असो किंवा नसो, याच्या नियंत्रणाखालील आस्थापना, असा आहे.

स्पष्टीकरण.---- या खंडाच्या प्रयोजनार्थ,---

(एक) वृत्तपत्रांच्या आस्थापनांचे भिन्न विभाग, शाखा आणि केंद्रे यांना, त्यांचे भाग असल्याचे समजण्यात येईल ;

(दोन) जर एखाद्या छापखान्याचे मुख्य काम हे वृत्तपत्र छपाई करणे हे असेल, तर त्या छापखान्यास एक वृत्तपत्र आस्थापना असल्याचे मानण्यात येईल ;

(च) " वृत्तांकन आधारित इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम " याचा अर्थ, वृत्तसूचक आशय उपभोक्त्याप्रत पोहोचवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणारे कोणतेही वृत्तांकन आधारित इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम, असा आहे ;

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, नोव्हेंबर ८, २०१९/कर्ातिक १७, शके १९४१ ३

(छ) " वृत्त केंद्र " याचा अर्थ, वृत्त विषयक कार्यक्रमांची र्िनमिती आणि प्रसारण करणारे एखादे दूरचित्रवाणी किंवा नभोवाणी केंद्र, असा आहे ;

(ज) " अपराधी " याचा अर्थ, जी व्यक्ती एकतर स्वत: किंवा व्यक्तींच्या गटाचा किंवा संघटनेचा एक सदस्य किंवा प्रमुख या नात्याने, या अधिनियमाखाली हिंसाचाराचे कृत्य करील, ते करण्याचा प्रयत्न करील किंवा ते करण्यास अपप्रेरणा देईल किंवा चिथावणी देईल किंवा त्यासाठी प्रक्षोभित करील, अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे ;

(झ) " मालमत्ता " याचा अर्थ, प्रसारमाध्यमातील व्यक्तीच्या किंवा प्रसारमाध्यमाच्या मालकीची किंवा त्यांच्या ताब्यात असलेली कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता किंवा साधनसामग्री किंवा यंत्रसामग्री, असा आहे ;

(ञ) " हिंसाचार " याचा अर्थ, ज्या कृत्यामुळे प्रसारमाध्यमातील व्यक्ती आपले कर्तव्य बजावित असताना कोणत्याही प्रसारमाध्यमातील व्यक्तींच्या जीवितास कोणतीही अपहानि, क्षती किंवा धोका पोहोचेल किंवा पोहोचू शकेल किंवा कोणत्याही प्रसारमाध्यमातील व्यक्तींच्या किंवा प्रसारमाध्यम संस्थांच्या मालकीच्या मालमत्तेला नुकसान किंवा हानी पोहोचेल किंवा पोहोचू शकेल, असे कृत्य, असा आहे.

३. एखाद्या प्रसारमाध्यमातील व्यक्तीवरील हिंसाचाराच्या कृत्यास किंवा प्रसारमाध्यमातील व्यक्तीच्या किंवा प्रसारमाध्यम हिंसाचारास प्रतिबंध.

संस्थेच्या मालमत्तेच्या नुकसानीस किंवा हानीस प्रतिबंध करण्यात येईल.

शास्ती.

४. जो कोणी, कलम ३ च्या तरतुदींचे उल्लंघन करून हिंसाचाराचे कोणतेही कृत्य करील किंवा करण्याचा प्रयत्न करील किंवा ते करण्यास अपप्रेरणा किंवा चिथावणी देईल किंवा त्यास प्रक्षोभित करील अशा कोणत्याही अपराध्यास, तीन वषार्ंपयर्ंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची, किंवा पन्नास हजार रुपयांपयर्ंत असू शकेल इतक्या रकमेच्या दंडाची शिक्षा होईल, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

अपराधाचा तपास.

१९७४ चा २.

५. फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ यामध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी पोलीस उप अधीक्षक पदाच्या दर्जापेक्षा खालच्या दर्जाच्या पदावर नसलेला कोणताही पोलीस अधिकारी, या अधिनियमाखालील अपराधाचा तपास करील.

अपराधाची दखल.

६. या अधिनियमाखालील केलेला कोणताही अपराध हा, दखलपात्र व अजामीनपात्र असेल आणि तो, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाकडून न्यायचौकशी करण्यायोग्य असेल.

७. (१) कलम ४ मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या शिक्षेव्यतिरिक्त, अपराधी, कलम ६ मध्ये र्िनदिष्ट केलेल्या न्यायालयाने निर्धारित केली असेल अशी, प्रसारमाध्यम व्यक्ती किंवा प्रसारमाध्यम संस्था यांच्या मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीसाठी किंवा हानीसाठी नुकसानभरपाई रक्कम देण्यास पात्र असेल आणि तो प्रसारमाध्यमातील व्यक्तीने केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी देखील पात्र असेल.

मालमत्तेस झालेल्या हानीबद्दल किंवा नुकसानीबद्दल नुकसानभरपाई देण्याचे दायित्व.

(२) जर या अधिनियमाखाली सिद्धापराधी ठरलेल्या व्यक्तीने, पोट-कलम (१) अन्वये त्याच्यावर लादलेली नुकसानभरपाई आणि वैद्यकीय खर्च दिला नसेल तर, ती रक्कम, जणू काही ती जमीन महसुलाची थकबाकी होती असे समजून वसूल करण्यात येईल.

८. (१) जी कोणी प्रसारमाध्यमातील व्यक्ती, या अधिनियमाच्या तरतुदींचा हेतूपुरस्सर गैरवापर करील किंवा दुष्ट प्रयोजनांसाठी त्याचा वापर करील किंवा या अधिनियमाखाली एखादी खोटी तक्रार करील अशा व्यक्तीस, तीन वषार्ंपयर्ंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची, किंवा पन्नास हजार रुपयांपयर्ंत असू शकेल इतक्या रकमेच्या दंडाची शिक्षा होईल, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

अधिनियमात अंतभर्ूत असलेल्या तरतुदींच्या गैरवापराबद्दल शिक्षा.

(२) प्रसारमाध्यमातील व्यक्ती पोट-कलम (१) खाली अपराध सिद्ध झाल्यानंतर, प्रसारमाध्यमातील व्यक्ती म्हणून कोणतेही शासकीय लाभ मिळण्यास हक्कदार नसेल आणि त्याची अधिस्वीकृती पत्रिका, कोणतीही असल्यास, कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल.

९. या अधिनियमाच्या तरतुदी ह्य, त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदींव्यतिरिक्त असतील आणि त्यांचे न्यूनीकरण करणाया नसतील.

अधिनियम इतर कोणत्याही कायद्याचे न्यूनीकरण करणारा नसणे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 November 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-11-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-11-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.