Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Ex. 78) (Dated the 15th November 2019) (बृहन्मुंबई महानगरपालिका) क्रमांक एमजीसी/एफ/885 (श्रीम. केशरबेन मुरजी पटेल त्यांचे नगरसेवक पद आपोआप रद्द झाल्याचे औपचारिक आदेशाचे पत्र देण्यात आले होते.

Published 15 November 2019

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, गुरुवार, डिसेंबर ७, २०१७/अग्रहायण १६, शके १९३९ १ RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ५, अंक ५४] शुक्रवार, नोव्हेंबर १५, २०१९/कर्ातिक २४, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ७८

प्राधिकृत प्रकाशन

बृहन्मुंबई महानगरपालिका

अधिसूचना

क्रमांक एमजीसी/एफ/८८५.

बृहन्मंुबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ नागरिकांच्या मागासवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग क्र. ७६ मधून श्रीम. केशरबेन मुरजी पटेल निवडून आल्या होत्या. त्यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम ५ ब अन्वये दिनांक २३ फेब्रुवारी २०१७ पासून त्यांचे नगरसेवक पद आपोआप रद्द झाल्याचे औपचारिक आदेशाचे पत्र देण्यात आले होते.

उच्चतम द्वितीय क्रमांकाची मते मिळवणारे उमेदवार श्री. नितिन बंडोपंत सलाग्रे यांनी मा. लघुवाद न्यायालयात याचिका क्रमांक ईपी/५२/ २०१७ दाखल केली होती. यामध्ये विजयी उमेदवार श्रीम. केशरबेन मुरजी पटेल यांच्या जातीचे प्रमाणपत्राच्या वैधतेचा मुद्दा उपस्थित केला होता.

सदर प्रकरणी मा. लघुवाद न्यायालयाने याचिका क्रमांक ईपी/५२/२०१७ ची सुनावणी घेऊन दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ रोजी श्रीम. केशरबेन मुरजी पटेल यांची नगरसेवकपदी झालेली निवड दिनांक २३ फेब्रुवारी २०१७ पासून रद्दबातल करण्यात येत आहे आणि श्री. नितिन बंडोपंत सलाग्रे यांना विजयी घोषित करण्यात येत आहे असे आदेश दिले आहेत.

यास्तव, श्री. नितिन बंडोपंत सलाग्रे (काँग्रेस) यांना दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ पासून प्रभाग क्र. ७६ मधून निर्वाचित घोषित करण्यात येत आहे.

मुंबई, दिनांक १४ नोव्हेंबर २०१९.

प्रवीण परदेशी, महापालिका आयुक्त.

भाग दोन--७८--१ (१)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 November 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-11-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-11-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.