महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक ६७] बुधवार, नोव्हेंबर २०, २०१९/कर्ातिक २९, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक १३०
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून
घोषणापत्र
भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.
क्रमांक भूसंपादन/टे-८/करंजाडे/एसआर-२०/२०१८/२०१९.----ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या रायगड जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०), (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना, दिनांक १९ ऑगस्ट २०१९ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनूसूची दोनमध्ये अधिक तपशिलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, रायगड जिल्ह्यचे जिल्हाधिकारी यांची, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, अनुसूची तीनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. १, पनवेल यांस पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची एक
(संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन)
गावाचे नाव करंजाडे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड
अ. क्र. भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक
अंदाजित क्षेत्र (चौ. मी.) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २०, २०१९/कर्ातिक २९, शके १९४१ अनुसूची दोन (सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण) अधिसूचना प्रकल्पाचे नाव.----नवी मुंबई प्रकल्प
निर्गमित प्रकल्पकार्याचे वर्णन.----मौजे करंजाडे, ता. पनवेल येथील नवी मुंबई प्रकल्पांतर्गत विकास कार्यासाठी आवश्यक आहे.
समाजाला होणारा लाभ.----नवी मुंबई शहराचे औद्योगिक महव, वाढते नागरीकरण व वाढते पर्यटन याचे महव विचारात घेता येत्या दशकात नवी मुंबई शहराचा विकास आणि विस्तार वेगाने होईल.
अनुसूची तीन
(पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन)
बाधित व्यक्तींची विस्थापने करण्यास भाग पाडणारी कारणे.----अशी बाब नाही.
अनुसूची चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
" निरंक "
टीप.----नकाशे पाहण्यासाठी कार्यालयात उपलब्ध आहेत.
क्र. भूसंपादन/टे-८/करंजाडे/एसआर-२०/२०१८/२०१९.
अलिबाग,
डॉ. विजय सूर्यवंशी,
दिनांक १५ नोव्हेंबर २०१९.
जिल्हाधिकारी, रायगड.