RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - २५ ]
बुधवार , नोव्हेंबर २० , २०१९ / कार्तिक २ ९ , शके १ ९४१
[ पृष्ठे ३
असाधारण क्रमांक २५
प्राधिकृत प्रकाशन
आयुक्त, महानगरपालिका यांजकडून
पिंपरी - चिंचवड महानगरपालिका , पिंपरी , पुणे -४११ ०१८
सूचना
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ सह कलम ३८ नुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राची सुधारित विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत.
क्रमांक नरवि/वियो-१७/५ ९/२०१ ९ . महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३१ (१ ) अन्वये पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्राची मूळ हद्दीची विकास योजना शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८ ९ ३/१२७६/ सीआर -१७४/९३ /नवि-१३ , दिनांक १८ सप्टेंबर १ ९९ ५ अन्वये मंजूर असून पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्राच्या वाढीव हद्दीची विकास योजना , शासन निर्णय क्रमांक टीपीएस -१८०८ /८ ९ ४ /सीआर -१७२७/० ९/नवि-१३ , दिनांक १८ ऑगस्ट २०० ९ अन्वये मंजूर आहे. त्याचप्रमाणे पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या ताथवडे या गावाची मूळ विकास योजना , शासन निर्णय क्रमांक टीपीएस -१८१५/२०१२/प्र.क्र. ८४/१५/ वियोमंजुरी /नवि-१३ , दिनांक ६ जानेवारी २०१७ अन्वये मंजूर आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम २३ व कलम ३८ अन्वये पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांनी (यापुढे " उक्त मनपा " उल्लेखलेले) मंजूर विकास योजना सुधारित ( दुसऱ्यांदा) तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी त्यांचा सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक ४५३ , दिनांक ७ सप्टेंबर २०१ ९ अन्वये मान्यता दिलेली आहे . त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम २३ नुसार उक्त मनपाच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा पिंपरी- चिंचवड महानगरपालिका कार्यालय, पिंपरी , पुणे या कार्यालयात , कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे .
ज्या नागरिकांच्या याबाबत काही सूचना/ हरकती असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल , त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत आयुक्त, पिंपरी - चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे लेखी स्वरूपात द्याव्यात. विकास योजना तयार करताना त्या सूचना/हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल.
श्रावण हर्डीकर ,
आयुक्त,
पिंपरी- चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी , पुणे-४११ ०१८ .
पिंपरी, १ ९ नोव्हेंबर २०१ ९.
(१)
एच-४९ ८ भाग एक-असा . (पु.वि.पु. )- २५ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , २० नोव्हेंबर २०१९ / कार्तिक २९ , शके १९४१
Notice
Declaration of Intention to prepare Revised Development Plan for Pimpri - Chinchwad Municipal Corporation area as per Section 23 read with Section 38 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 .
No. TPV/ DP / 17/ 59/ 2019. -Government of Maharashtra in Urban Development , vide it's Notification No. TPS -1893 / 1276/CR - 174/ 93/ UD - 13 , dated 18th September 1995 has sanctioned development plan of original limit of Pimpri - Chinchwad Municipal Corporation , vide it's Notification No. TPS / 1808/ 894/CR- 1727/09/UD -13 , dated 18th August 2009 has sanctioned extended limit of Pimpri - Chinchwad Municipal Corporation and also vide it's Notification No. TPS - 1815/ 2012/ CR - 84/ 15/D.P. Sanction/UD -13 , dated 6th January 2017 for newly included village Tathavade as per Section 31 ( 1 ) of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966.
Pimpri- Chinchwad Municipal Corporation ( Hereinafter referred as " the said Municipal Corporation " ) by it's Resolution No. 453 , dated 7th September 2019 declared it's intention to prepare Revised DevelopmentPlan ( Second ) for the whole area within it's limit as per provision of Section 23 read with Section 38 of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966. Accordingly, this notice is being published .
The plan showing boundaries of the area included in Revised Development Plan of the said Municipal Corporation is kept open for inspection by the public on working days , during office hours at the office of the Municipal Corporation as required under Section 23 of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966.
Any suggesion/ objection of the public in this regard , may be forwarded in writing to the Commissioner, Pimpri - Chinchwad Municipal Corporation within a period of 60 ( sixty) days from the date ofpublication of this notice in Maharashtra Government Gazette . The suggestion / objection shall be duly considered while preparing the Development Plan.
SHRAVAN HARDIKAR ,
Commissioner,
Pimpri- Chinchwad Municipal Corporation , Pimpri , Pune-18 .
Pimpri , 19th November 2019 .
सूचना
मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून
पिंपरी - चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ सह कलम ३८ नुसार पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्राची सुधारित विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत.
क्रमांक डीओ/पीडी-४६ ९/डीपी(एसआर ) -१३८३/ २०१ ९ .- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३१ (१ ) अन्वये पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (यापुढे " उक्त प्राधिकरण " उल्लेखलेले) मूळ हद्दीची विकास योजना , शासन निर्णय क्रमांक टीपीएस -१८ ९ १/ १४१२/नवि-१३ , दिनांक २८ नोव्हेंबर १ ९९ ५ अन्वये मंजूर आहे.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , २० नोव्हेंबर २०१ ९ / कार्तिक २ ९, शके १ ९४१ महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम २३ सह कलम ३८ अन्वये उक्त प्राधिकरणाने मंजूर विकास योजना सुधारित ( दुसऱ्यांदा) तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी त्यांचा सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक ३४०/१७ , दिनांक ९ ऑगस्ट २०१ ९ अन्वये मान्यता दिलेली आहे . त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे .
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम २३ नुसार उक्त प्राधिकरणाच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा पिंपरी - चिंचवड नवनगर प्राधिकरण कार्यालय, निगडी, पुणे या कार्यालयात , कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे .
ज्या नागरिकांच्या याबाबत काही सूचना/हरकती असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल , त्या तारखेपासून ६० ( साठ) दिवसांच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी - चिंचवड नवनगर प्राधिकरण , निगडी, यांच्याकडे लेखी स्वरूपात द्याव्यात. विकास योजना तयार करताना त्या सूचना/हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल.
प्रमोद यादव,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण,
निगडी, पुणे-४४ .
निगडी, पुणे , १५ नोव्हेंबर २०१ ९ .
Notice
Declaration of Intention to prepare Revised Development Plan for Pimpri - Chinchwad New Town Development Authority as per Section 23 read with Section 38 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 .
No. DA/ PD - 469/ DP ( SR ) -1383/ 2019. -Government of Maharashtra in Urban Development Department, vide it's Notification No. TPS - 1891/ 1412/ UD -13 , dated 28th November 1995 has sanctioned development plan of Pimpri - Chinchwad New Town Development Authority ( Hereinafter referred to as "the said Authority " ) as per Section 31 ( 1 ) of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966.
The said Authority by it's Resolution No. 340/17 , dated 9th August 2019 has declared it's intention to prepare Revised Development Plan ( Second ) as per provision of Section 23 read with Section 38 of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966. Accordingly, this notice is being published .
The plan showing boundaries of the area included in Revised Development Plan of the said Authority is kept open for inspection by the public on all working days , during office hours at the office of the Pimpri-Chinchwad New Town Development Authority as required under Section 23 of Mahashtra Regional and Town Planning Act , 1966 .
Any suggesion/ objection of the public in this regard , may be forwarded in writing to the Chief Executive Officer of Pimpri - Chinchwad New Town Development Authority within a period of 60 ( sixty) days from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette . The suggestion/ objection shall be duly considered while preparing the Development Plan .
PRAMOD YADAV ,
ChiefExecutive Officer ,
Pimpri - Chinchwad New Town Development Authority ,
Nigdi , Pune-44 .
Nigdi , Pune , 15th November 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE- 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND, YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .