RNI No. MAHBIL/2012/46121
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ५, अंक ५८(२)] शुक्रवार, नोव्हेंबर २९, २०१९/अग्रहायण ८, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ८४
प्राधिकृत प्रकाशन
ठाणे महानगरपालिका, ठाणे
शहर विकास विभाग
जाहीर सूचना
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये
क्रमांक ठामपा/शविवि/वियोअंक/२०३८
ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारित विकास योजना शासन निर्णय क्रमांक टिपीएस/१२९७/१३१९/सीआर- १४८/९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर १९९९ अन्वये मंजूर असून, २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आली. तसेच सुधारित विकास योजनेतील वगळलेले क्षेत्र (Excluded Portion) शासन निर्णय क्रमांक टिपीएस/१२०१/ २७४/सीआर-२८/२००९/नवि-१२, दिनांक ३ एप्रिल २००३ अन्वये मंजूर झाली असून दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आली आहे. (यापुढे "उक्त मंजूर विकास योजना" असे संबोधिले आहे.);
आणि ज्याअर्थी, ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा येथे पारसिक बँकेपासून ते शास्त्रीनगर (निरंकारी भवन) या रस्त्याची रुंदी ग्रामपंचायत काळामधील अस्तित्वातील रस्ता असल्यामुळे सदर रस्त्याची रुंदी अपुरी पडून वाहतुकीची व पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. सदर कारणास्तव सदरचा रस्ता ९.०० मी. रुंद दर्शवून विकास योजना रस्ता म्हणून समाविष्ट करण्याकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदल करणे आवश्यक आहे व अशा फेरबदलाची कार्यवाही करणेस मा. महासभा ठराव क्रमांक २९५, दिनांक २० नोव्हेंबर २०१९ अन्वये मान्यता दिलेली आहे. (यापुढे "उक्त फेरबदल" असे संबोधिले आहे.)
१
भाग दोन (संकीर्ण)-८४-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २९, २०१९/अग्रहायण ८, शके १९४१ आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) मधील तरतुदीनुसार "उक्त मंजूर विकास योजनेत उक्त फेरबदलाबाबत" जनतेच्या सूचना/हरकती मागविणेसाठी ही जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. उक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा सहायक संचालक, नगररचना, शहर विकास विभाग, ठाणे महानगरपालिका, "महापालिका भवन", सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे यांचे कार्यालयीन सूचना फलकावर तसेच खाली नमूद संकेतस्थळावर ठेवण्यात आला आहे. उक्त फेरबदलाबाबत कोणत्याही व्यक्तीस सूचना/हरकती घ्यावयाची असल्यास त्यांनी ही सूचना वृत्तपत्रात व www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर आणि महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांचे आत आपली सूचना/हरकत महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचेकडे सादर करावी.
ठाणे, दिनांक २९ नोव्हेंबर २०१९.
श्रीकांत मा. देशमुख, सहायक संचालक, नगररचना, ठाणे महानगरपालिका, ठाणे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २७, २०१९/अग्रहायण ८, शके १९४१ ३THANE MUNICIPAL CORPORATION, THANE
Town Planning Department
Notice
(U/s. 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)
No. TMC/ TDD/ DPIC/2038
Whereas, the Revised Development plan of the city of Thane has been sanctioned by Government vide Notification No. TPS/1297/1319/CR-148/97/UD-12, dated 4th October 1999 and came into force from 22nd November 1999. Also the Excluded Portion (EP) from Revised Development Plan were sanctioned vide Government Notification No. TPS/1201/274/CR-28/2009/ UD-12, dated 3rd April 2003 and came into force from 14th May 2003 (hereinafter referred to as "the said Sanctioned Development Plan") ;
And whereas, a road at Kalwa Parsik Bank to Shastri Nagar (Nirankari Bhavan) at Kalwa is existing since Grampanchayat which is insufficient due to increase in traffic and parking. Hence, it is necessary to carry out modification to development plan for Thane under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, for showing the above said road to "9.00 mtr. Wide D.P. road" and the Hon. General Body of Thane Municipal Corporation has accorded sanction to carry out the modification vide its resolution No. 295, dated 19th September 2018 (hereinafter called as 'Said Modification') ;
And therefore, this notice is published for inviting suggestions/objections from the public to carry out "The said Modification in the said Sanctioned Development Plan" as per the provisions under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Plan showing "The said Modification" is displayed on the notice board in the office of Assistant Director, Town Planning, Town Development Department, Thane Municipal Corporation, "Mahapalika Bhavan", Sarsenani General Arunkumar Vaidy Marg, Chandanvadi, Panchpakhadi, Thane and on the website mentioned below. Any person interested may submit his suggestion or objection to the said modification within 30 (Thirty) days from the publication of this notice in the news paper, on the website www.thanecity.gov.in and Maharashtra Government Gazette, to the Municipal Commissioner, Thane Municipal Corporation, Thane.
SHRIKANT M. DESHMUKH, Asstt. Director Town Planning, Thane, dated 29th November 2019. Thane Municipal Corporation, Thane.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.