महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक ६८(२)] शनिवार, नोव्हेंबर ३०, २०१९/अग्रहायण ९, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक १३२
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, रायगड अलिबाग यांजकडून
वाचले :---
(१) मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ व ११६.
(२) शासन, गृह विभागाकडील अधिसूचना क्र. एमव्हीए ०५८९/सीआर-१०६१-टीआरए-२, दिनांक १९ मे १९९०.
(३) कार्यकारी अभियंता (रा.म.), म.रा.र.वि.महामंडळ, मुंबई यांचेकडील पत्र क्र.रा.म.२०१९/०२/उ.अ-७/ सी.आर.नं.११/अभियांत्रिकी/४३०५, दिनांक १ जुलै २०१९.
(४) या कार्यालयाकडील अधिसूचना प्रसिद्ध क्र.गृह/एमएजी-१/जड वाह.बंदी वाकण-पाली-खोपोली/२०१९, दिनांक १२ जुलै २०१९.
(५) कार्यकारी अभियंता (रा.म.), म.रा.र.वि.महामंडळ, मुंबई यांचेकडील पत्र क्र.रा.म.२०१९/०२/उ.अ-७/ सी.आर.नं.११/अभियांत्रिकी/५११७, दिनांक ८ ऑगस्ट २०१९.
(६) या कार्यालयाकडील अधिसूचना प्रसिद्ध क्र.गृह/एमएजी-१/जड वाह.बंदी वाकण-पाली-खोपोली/२०१९, दिनांक ९ ऑगस्ट २०१९.
(७) कार्यकारी अभियंता (रा.म.), म.रा.र.वि.महामंडळ, मुंबई यांचेकडील पत्र क्र.रा.म.२०१९/०२/उ.अ-७/ सी.आर.नं.११/अभियांत्रिकी/६०३४, दिनांक २४ सप्टेंबर २०१९.
(८) कार्यकारी अभियंता (रा.म.), म.रा.र.वि.महामंडळ, मुंबई यांचेकडील पत्र क्र.रा.म.२०१९/०२/उ.अ-७/ सी.आर.नं.११/अभियांत्रिकी/६५४९, दिनांक १७ ऑक्टोबर २०१९.
(९) या कार्यालयाकडील अधिसूचना प्रसिद्ध क्र.गृह/एमएजी-१/जड वाह.बंदी वाकण-पाली-खोपोली/२०१९, दिनांक १८ ऑक्टोबर २०१९.
(१०) कार्यकारी अभियंता (रा.म.), म.रा.र.वि.महामंडळ, मुंबई यांचेकडील पत्र क्र.रा.म.२०१९/०२/उ.अ-७/ सी.आर.नं.११/अभियांत्रिकी/७१५२, दिनांक २० नोव्हेंबर २०१९.
(११) या कार्यालयाकडील मंजूर टिपणी दिनांक २६ नोव्हेंबर २०१९.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ३०, २०१९/अग्रहायण ९, शके १९४१ जड वाहतूक बंदी अधिसूचनाक्रमांक गृह/एमएजी-१/जड वाह.बंदी वाकण-पाली-खोपोली/२०१९.---- ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता (रा.म.), म.रा.र.वि.महामंडळ, मुंबई यांनी उपोद्घातातील अ.क्र. ३, ५ व ८ कडील पत्रान्वये वाकण-पाली-खोपोली रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करून, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाहून पेण खोपोली मार्गाहून वळविणेबाबत केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने या कार्यालयाकडील अनुक्रमे उपोद्घातातील अ.क्र. ४, ६ व ९ रोजीच्या अधिसूचनेन्वये सदर अधिसूचनेच्या दिनांकापासून १ महाकरिता वाकण-पाली-खोपोली रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करून, सदर वाहतूक मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाहून वाकण-पेण-खोपोली मार्गे वळविण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत ;
आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता (रा.म.), म.रा.र.वि.महामंडळ, मुंबई यांचेकडील उपोद्घातातील अ.क्र.१० रायगड जिल्ह्यतील अति पर्जन्यवृष्टीमुळे काही ठिकाणी रस्ते क्षतीग्रस्त झाले असून, विषयांकित काम प्रगतीत असल्याने, ठिकठिकाणी तात्पुरते वळण रस्ते (Temporary Diversion) दिलेले आहेत. सदर बांधकामादरम्यान परिसरातील विविध कंपन्याद्वारे प्राप्त निवेदनास अनुसरून २० MT (Metric Tones) पयर्ंतची अवजड वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी देऊ शकतो, तसेच सदर रस्त्यावरील पाली पुल जुना व जीर्ण असल्यामुळे, वाहतुकीसाठी कोंडी होऊ नये तसेच सदर मार्गावरील पाली, जांभुळपाडा व बागुलपाडा पुलाची पुनबार्ंधणीचे काम सुरू करावयाचे असल्याने सदरचे अवजड वाहतूक बंदी अधिसूचना क्रमश: पुढील ६ महिन्यांकरिता वाढविण्यात यावी असे या कार्यालयास कळविले आहे ;
आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता (रा.म.), म.रा.र.वि.महामंडळ, मुंबई यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यत झालेल्या अति पर्जन्यवृष्टीमुळे व पुलावरून होणाया जाणाया अतिअवजड वाहतुकीमुळे पुल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने, तसेच जांभुळपाडा व बागुलपाडा पुलाची पुनबार्ंधणीचे काम सुरू होणार असल्याने वाकण-पाली-खोपोली रस्त्यावरील २० MT (Metric Tones) पयर्ंतची अवजड वाहतूक सुरू ठेऊन त्यावरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक बंद करून, सदर वाहतूक मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून वाकण- पेण-खोपोली मार्गे वळविणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.
त्याअर्थी, मी, डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हादंडाधिकारी, रायगड उपोद्घातातील अ. क्र. १ व २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार या अधिसूचनेच्या दिनांकापासून ६ महाकरिता वाकण-पाली खोपोली रस्त्यावरील २० MT (Metric Tones) पयर्ंतची अवजड वाहतूक सुरू ठेऊन त्यावरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक बंद करून, सदर वाहतूक मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून वाकण-पेण-खोपोली मार्गे वळविण्याचे आदेश जारी करीत आहे.
डॉ. विजय सुर्यवंशी,
रायगड,
जिल्हादंडाधिकारी, दिनांक २६ नोव्हेंबर २०१९.
रायगड.