महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-अ
वर्ष ५, अंक १३] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ५-११, २०१९/अग्रहायण १४-२०, शके १९४१ [पृष्ठे २
किंमत : रुपये ९.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
विधान भवन, मुंबई, दिनांक २९ नोव्हेंबर, २०१९
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक २१५५३/क-१.-------भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १८७ च्या खंड (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांच्याशी विचारविनिमय करून, याद्वारे विधानमंडळ सचिवालयातील ""दूरध्वनीचालक"" "गट-क" या पदाच्या सेवाप्रवेशाचे विनियमन करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियम करीत आहेत :-----
(१) (एक) या नियमांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील ""दूरध्वनीचालक"" "गट-क" (सेवाप्रवेश) नियम, २०१९ असे म्हणावे.
(दोन) ते दिनांक १ नोव्हेंबर, २०१९ रोजीपासून अंमलात आले असल्याचे मानण्यात येईल.
(२) व्याख्या.----या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,-----
(अ) ""विधानमंडळ सचिवालय"" म्हणजे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.
(ब) ""शासन"" म्हणजे, महाराष्ट्र शासन.
(क) ""शासनमान्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम"" म्हणजे शासन मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्ण केलेला प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा शासनाच्या व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाची मान्यता असलेला प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
(ड) ""मागासवर्गीय व्यक्ती"" या शब्दप्रयोगाच्या संबंधात ""मागासवर्ग"" म्हणजे राज्य शासनाने, या नियमांच्या प्रयोजनार्थ, मागासवर्ग म्हणून घोषित केलेल्या वर्गाची व्यक्ती.
(३) नियुक्ती.----विधानमंडळ सचिवालयातील ""दूरध्वनीचालक"" या पदावरील नियुक्ती खालील नमूद पद्धतीने करता येईल :-----
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ५-११, २०१९/अग्रहायण १४-२०, शके १९४१ शैक्षणिक व इतर अर्हता.----(एक) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) किंवा महाराष्ट्र शासनाने एस.एस.सी. शी समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता.
(दोन) शासन मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून दूरध्वनी यंत्रणेसंदर्भात किमान ३ महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र.
किंवा
अन्य संस्थेमधून किमान ३ महिन्यांचा शासनमान्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र.
(तीन) Panasonic KX-TDA 600 Digital Hybrid Phone System या कार्यप्रणालीचे किंवा तत्सम अद्ययावत कार्यप्रणालीचे ज्ञान असल्यास प्राधान्य.
(चार) उमेदवाराची वाणी मधुर असावी व उत्तम संभाषण कौशल्य असावे.
(पाच) वयोमर्यादा.----ज्या व्यक्तीने वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत, परंतु, ३८ वषार्ंपेक्षा जास्त नाही आणि मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ४३ वषार्ंपेक्षा जास्त असणार नाही, शासकीय सेवेतील कर्मचायांच्या बाबतीत ४५ वर्षापेक्षा जास्त असणार नाही.
(सहा) अनुभव.----उमेदवारास किमान एक वर्ष "दूरध्वनीचालक" या पदावर काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक.
(४) परिवीक्षाधीन कालावधी.----""दूरध्वनीचालक"" या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती दोन वषार्ंच्या कालावधीसाठी परिवीक्षाधीन राहील.
(५) मराठी व हिंदी संदर्भातील परीक्षा.----""दूरध्वनीचालक"" या पदावर नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तीला त्याबाबतीत करण्यात आलेल्या नियमानुसार मराठी व हिंदी परीक्षांमध्ये तो त्या परीक्षा पूर्वीच उत्तीर्ण झालेला नसेल किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आलेली नसेल, तर उत्तीर्ण व्हावे लागेल.
(६) संगणक संदर्भातील परीक्षा.----""दूरध्वनीचालक"" या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाद्वारे वेळोवेळी विहित केलेली संगणक हाताळणीबाबतची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
राजेन्द्र ग. भागवत,
सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.