Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदांचे वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे.

Published 05 December 2019

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-05.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL/ 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी

वर्ष ८ , अंक १ ९ ]

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ५ ११ , २०१ ९ / अग्रहायण १४ २० , शके १९ ४१

[ पृष्ठे २

प्राधिकृत प्रकाशन

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

सातारा जिल्हा परिषद , सातारा

अधिसूचना

क्रमांक नियो-१ /कावि/वाप्रअ/२४३/२०१ ९ .--महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ चे कलम १४२ चे आधारे महाराष्ट्र राज्य शासनाचे ग्रामीण विकास विभागाकडील क्रमांक झेडपीआर -४७६३/४०४८६- पी, दिनांक ४ सप्टेंबर १ ९ ६४ ने ठरवून दिलेल्या व पुन्हा क्रमांक झेडपीआर - ४७६६-३२३९ ३ - पी. , दिनांक ३ नोव्हेंबर १ ९ ६६ ने सुधारणा करून दिलेल्या तसेच महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाचे पत्र क्रमांक एएआर-१०७ ९- ( ६७६ ) -२६ , दिनांक १२ नोव्हेंबर १ ९ ८१ ने पुन्हा सुधारून ठरवून दिलेल्या नियमानुसार सातारा जिल्हा परिषदेचा सन २०१८-२०१९ सालचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करून प्रसिद्ध करणेत येत आहे.

सन २०१८-२०१९ या वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवाल नियमाप्रमाणे तयार करून सातारा जिल्हा परिषदेच्या दिनांक १५ नोव्हेंबर २०१ ९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आलेला होता . त्यास जिल्हा परिषदेने ठराव क्रमांक ३७६ अन्वये मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम , १ ९ ६४ च्या नियम ९ अन्वये सदर अहवाल प्रसिद्ध झाला असे या अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात येत आहे .

संजय भागवत,

मुख्य कार्यकारी अधिकारी,

सातारा जिल्हा परिषद , सातारा .

सातारा , २८ नोव्हेंबर २०१ ९ .

सोलापूर जिल्हा परिषद , सोलापूर

अधिसूचना

क्रमांक जिपसो/सनिक/कार्या-१३/३०३/३४४३/२०१९.--महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम , १९ ६१ चे कलम १४२ (४) खाली शासनाने वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणेसंबंधीचे सुधारित नियम , १ ९ ८१ तयार केले आहे. त्याला अनुसरून मा . उपसचिव ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभाग , मंत्रालय , मुंबई यांचेकडील परिपत्रक क्रमांक संगणक-१० ९ ५/सीआर-२ ९ ५४/५७- मुंबई, दिनांक २४ जानेवारी १ ९९ ५ च्या परिपत्रकास अनुसरून संगणकाद्वारे तयार करण्यात आलेल्या सुधारित तक्त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने सन २०१८-१९ चा वार्षिक प्रशासन अहवाल तयार केला आहे. दिनांक २१ नोव्हेंबर २०१ ९ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने प्रस्तुतचा ठराव क्रमांक २७२ अन्वये मंजुरी दिलेली आहे.

(१)

एच-५२३ , भाग एक- अ(पु.वि.पु.)-१९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ५ ११ , २०१९ / अग्रहायण १४ २० , शके १ ९४१ महाराष्ट्रजिल्हा परिषद व पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम , १ ९ ६४ मधील नियम नंबर ९ अन्वये सदरहू अहवाल प्रसिद्ध केलेचे माहितीसाठी जाहीर करीत आहोत .

प्रकाश वायचळ ,

मुख्य कार्यकारी अधिकारी,

सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर .

सोलापूर , २१ नोव्हेंबर २०१ ९ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-05.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-05.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.