RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक १३१] शनिवार, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २९५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
अल्पसंख्याक विकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ डिसेंबर २०१९.
अधिसूचना
वक्फ अधिनियम, १९९५.
क्रमांक वक्फ. २०१९/प्र. क्र. ९३/कार्यासन-४.----ज्याअर्थी, वक्फ अधिनियम, १९९५ (१९९५ चा ४३ वा) च्या कलम ८३ च्या पोटकलम (१) व (४) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व यासंबंधी प्राप्त असलेल्या इतर सर्व शक्तींचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने, शासन अधिसूचना, अल्पसंख्याक विकास विभाग, क्र. वक्फ २०१५/प्र. क्र. १४२/कार्यासन-४, दिनांक १ ऑगस्ट २०१७, अन्वये एखाद्या वक्फ किंवा वक्फ मालमत्तेशी संबंधित विवाद, प्रश्न व इतर संबंधित बाबींचे निर्धारण करण्यासाठी, एखाद्या भाडेकरुचे निष्कासन किंवा अशा मालमत्ता संदर्भातील भाडेपट्टाकार व भाडेपट्टादार यांच्या अधिकारांचे व बंधनांचे (obligation) निर्धारण उक्त अधिनियमांतर्गत करण्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर अधिकारिता असलेले, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद ची स्थापना केली आहे ;
आणि ज्याअर्थी, शासन अधिसूचना, अल्पसंख्याक विकास विभाग, क्र. वक्फ २०१९/ प्र. क्र. ९३/ कार्यासन-४, दिनांक ११ जुलै २०१९ अन्वये श्री. मकसूदअली मोहम्मदअली सय्यद, न्यायाधीश, शहर दिवाणी न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, मुंबई यांची महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती ;
आणि ज्याअर्थी, श्री. मकसूदअली मोहम्मदअली सय्यद यांची बदली होत असल्याने मा. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या जागी श्री. मोहम्मद कासिम मुसा शेख, जिल्हा न्यायाधीश-१ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश, वैजापूर, जि. औरंगाबाद यांच्या नावाची अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद म्हणून नियुक्ती करण्यासाठी शिफारस केली आहे.
त्याअर्थी, वक्फ अधिनियम, १९९५ (१९९५ चा ४३ वा) च्या कलम ८३ च्या उपकलम ४ मधील खंड (अ) व उपकलम (४-अ) आणि महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण (अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती व सेवाशर्ती), नियम २०१५ मधील नियम क्र. ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व यासंबंधी प्राप्त असलेल्या इतर सर्व शक्तींचा वापर करुन महाराष्ट्र शासन याद्वारे श्री. मोहम्मद कासिम मुसा शेख यांची
(१)
भाग चार-अ-२९५-१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ २ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद म्हणून नियुक्ती करत आहे, आणि त्या उद्दिष्टाकरिता शासन अधिसूचना, अल्पसंख्याक विकास विभाग, क्र. वक्फ २०१५/प्र.क्र.१४२/कार्यासन-४, दिनांक १ ऑगस्ट २०१७ मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :----
उक्त अधिसूचनेसोबतच्या तक्त्यामध्ये अनुक्रमांक १ मध्ये रकाना क्रमांक २ " नाव " या शिर्षकाखाली " श्री. मकसूदअली मोहम्मदअली सय्यद " या नावाऐवजी " श्री. मोहम्मद कासिम मुसा शेख " या नावाचा समावेश करण्यात यावा.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्याम तागडे शासनाचे प्रधान सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ३MINORITIES DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 7th December 2019.
NOTIFICATION
WAQF ACT, 1995.
No.Waqf. 2019/C.R. 93/Desk-4.—Whereas, in exercise of the powers conferred by sub-sections (1) and (4) of section 83 of the Waqf Act, 1995 (43 of 1995) and of all other powers enabling it in that behalf ; the Government of Maharashtra vide Government Notification, Minorities Development Department, No. Waqf-2015/C.R. 142/Desk-4, dated the 1st August 2017, had constituted the Maharashtra State Waqf Tribunal at Aurangabad, for the determination of any dispute, question or other matter relating to a waqf or waqf property, eviction of a tenant or determination of rights and obligations of the lessor and the lessee of such property, under the said Act, having jurisdiction over whole of the State of Maharashtra ;
And whereas, vide Government Notification, Minorities Development Department, No. Waqf 2019/C.R. 93/Desk-4, dated the 11th July 2019, appointed Shri Maqsoodali Mohamedali Syed, Judge, City Civil Court and Additional Sessions Judge, Mumbai, as Chairman of the Maharashtra State Waqf Tribunal at Aurangabad ;
And whereas the Hon'ble High Court of Judicature at Bombay has now recommended the name of Shri Mohammed Qasem Moosa Shaikh, District Judge-I and Additional Sessions Judge, Vaijapur, District Aurangabad for appointment as Chairman of the Maharashtra State Waqf Tribunal, Aurangabad in place of Shri Maqsoodali Mohamedali Syed who is under order of transfer.
Now therefore, in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (4) and sub- section (4-A) of section 83 of the Waqf Act, 1995 (43 of 1995) read with rule 3 of the Maharashtra State Waqf Tribunal(Appointment and Conditions of Service of Chairman and Members) Rules, 2015 and of all other powers enabling it in that behalf ; the Government of Maharashtra hereby appoints Shri Mohammed Qasem Moosa Shaikh, District Judge-I and Additional Sessions Judge, Vaijapur, District Aurangabad, as Chairman of the Maharashtra State Waqf Tribunal, Aurangabad, and for that purpose amends the Government Notification, Minorities Development Department, No.Waqf-2015/C.R.142/Desk-4, dated the 1st August 2017, as follows :—
In Table appended to the said Notification, in Serial No. 1, in column (2), under the heading " Name ", for the name " Shri Maqsoodali Mohamedali Syed " the name " Shri Mohammed Qasem Moosa Shaikh " shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHYAM TAGADE,
Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.