Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती राखीव पदांची संख्या व त्यांचे जिल्हानिहाय वाटप निश्चित करणेबाबत.

Published 11 December 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-11.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012 / 47976

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ३४ ]

बुधवार , डिसेंबर ११ , २०१ ९ / अग्रहायण २० , शके १ ९४१

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक ३४

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

क्रमांक पंस सभापती/आरक्षण/ग्रापं-१/आरआर-१०५०/१/२०१ ९.-महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( अध्यक्ष , उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती , उपसभापती) (पदाचे आरक्षण व निवडणूक) नियम , १९ ६२ च्या तरतुदीस अनुसरून महाराष्ट्र शासन , ग्रामविकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र . क्र. २१८ (२)/पंरा -२ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ अन्वये सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती राखीव पदांची संख्या व त्यांचे जिल्हानिहाय वाटप निश्चित करण्यात आलेले आहे . त्यानुसार सोलापूर जिल्ह्याकरिता अनुसूचीमध्ये नमूद केलेप्रमाणे सभापती पदांची संख्या निश्चित करून दिलेली आहे.

परिशिष्ट

आरक्षित पदांची संख्या अनुसूचित जाती

१

अ) अनुसूचित जातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या

१

( (ब) अनुसूचित जाती ( महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या

अनुसूचित जमाती

निरंक (अ) अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या

निरंक (ब) अनुसूचित जमाती (महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.

नागरिकांचा मागास प्रवर्ग

१

(अ) नागरिकांचा मागास वर्गाच्या प्रवर्गासाठी ( विमुक्त जाती व जमातीसह) जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.

२

(ब) नागरिकांचा मागास वर्गाच्या प्रवर्गासाठी (विमुक्त जाती व जमातीसह) (महिला)

जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सभापतीच्या पदांची संख्या .

सर्वसाधारण

३

(अ) सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या जिल्ह्यामधील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.

३

(ब) सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवलेल्या जिल्ह्यामधील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.

(१)

एच-५३७ , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.) - ३४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी , ११ डिसेंबर २०१ ९ / अग्रहायण २० , शके १९४१ महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष , उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती व उपसभापती) ( पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ च्या नियम २ - फ च्या उप- कलम २ (अ) , (ब ) , ३ (अ), ३ ( ब) , ४ (अ) , ४ (ब) , ५ ( अ) , ५ ( ब) व ६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग , यांचेकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र . क्र. २१८ (२)/पंरा -२ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे अधिसूचनेनुसार निश्चित केलेल्या निरनिराळ्या गटांतील पदांचे संख्येस अधीन राहून हे आरक्षण चक्रानुक्रमे पद्धतीने दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ पासूनचे पुढील कालावधीकरिता अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग ( विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिलांसाठी राखून ठेवावयाच्या पंचायत समिती सभापती पदासाठी बिंदू नामावली निश्चित करणेत येत आहे.

नियम -२ फ ( २ ) , २ (ब) च्या तरतुदींनुसार अनुसूचित जातीसाठी पंचायत समिती, अक्कलकोट पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे.

नियम -२ फ (५) (अ) च्या तरतुदीनुसार अनुसूचित जाती महिलांसाठी पंचायत समिती , माळशिरस आरक्षित करणेत येत आहे.

नियम-२ फ ( ४) ( अ) अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी माढा पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे.

नियम -२ फ (५ ) (अ) अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी १. दक्षिण सोलापूर आणि २. पंढरपूर या दोन पंचायत समित्या आरक्षित करणेत येत आहेत.

नियम-२ फ (५) (अ) अन्वये महिलांसाठी १. सांगोला , २. मोहोळ आणि ३. मंगळवेढा या तीन पंचायत समित्या आरक्षित करणेत येत आहे .

वरीलप्रमाणे एकूण आठ पंचायत समित्यांची सभापती पदे आरक्षित झालेने १. बार्शी , २. करमाळा आणि ३. उत्तर सोलापूर या तीन पंचायत समित्यांची सभापती पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहतील .

महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( अध्यक्ष , उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ चे तरतुदीप्रमाणे व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा विचारात घेऊन मी , डॉ. राजेन्द्र भोसले , जिल्हाधिकारी, सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांचे सभापती पदांचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करीत आहे तसेच ही बिंदू नामावली दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ पासून सुरू होणाऱ्या पुढील कालावधीसाठी तयार करणेत येत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.

पंचायत समित्यांची नावे

सभापती पद ज्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले त्याचा तपशील

१

२

३

१

माळशिरस

अनुसूचित जाती महिला

अक्कलकोट

२

अनुसूचित जाती

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ३

पंढरपूर

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ४

दक्षिण सोलापूर

माढा

नागरिकांचा मागास प्रवर्ग ५

सांगोला

महिला

६

महिला

मोहोळ

७

महिला

मंगळवेढा

८

बार्शी

सर्वसाधारण

९

सर्वसाधारण

१०

करमाळा

सर्वसाधारण

११

उत्तर सोलापूर

डॉ. राजेन्द्र ब. भोसले ,

भा.प्र.से. ,

जिल्हाधिकारी , सोलापूर .

सोलापूर , १० डिसेंबर २०१ ९ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-11.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-11.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.