महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक २३ट गुरुवार, डिसेंबर १२, २०१९/अग्रहायण २१, शके १९४१ पृष्ठ १, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ३०
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
प्रादेशिक संचालक नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त कोकण विभाग
कोकण भवन, नवी मुंबई यांचेकडून
आदेश
क्रमांक साशा/का-३/नपा-२/प्र.क्र. १२/२०१९.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९(२) मधील तरतुदीनुसार सन २०११ ची जनगणनेची लोकसंख्या विचारात घेऊन ठाणे जिल्ह्यतील कुळगाव, बदलापूर नगरपरिषदेसाठी एकूण निवडून द्यावयाची सदस्य संख्या ४७ निश्चित करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे नागरीकांचा मागासवर्ग व राखून ठेवावयाची स्री सदस्य संख्या आरक्षणासह तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती राखून ठेवावयाची एकूण संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्या निश्चित करताना नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये कोणताही भाग वगळलेला नाही किंवा हद्दीबाहेरील कोणताही भाग समाविष्ट केलेला नाही.
या आदेशाप्रमाणे कुळगाव, बदलापूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.
शिवाजी दौंड,
नवी मुंबई, दिनांक १२ डिसेंबर २०१९.
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, कोकण विभाग.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.