RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी गुरुवार , डिसेंबर १२, २०१९ / अग्रहायण २१ , शके १९४१
वर्ष- ८, अंक - २६ ]
[ पृष्ठे ३
असाधारण क्रमांक २६
प्राधिकृत प्रकाशन
महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे मांजरी खुर्द , कोलवडी नगर रचना योजना क्रमांक ११
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६८ (२) अन्वये मंजुरीची अधिसूचना
अधिसूचना
क्रमांक वियो/नरयो-११/प्र. क्र. ८४/ शाखा-१/२३० ९/२०१ ९ . ज्याअर्थी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ ( यापुढे " उक्त अधिनियम " असे उल्लेखिलेले) चे कलम ६० ( १) अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून पुणे महानगर प्रदेशातील क्षेत्रापैकी नकाशात दाखविलेल्या क्षेत्रासाठी , प्रारूप मांजरी खुर्द कोलवडी नगर रचना योजना क्रमांक ११ (यापुढे " उक्त योजना " असे उल्लेखिलेली) तयार करावयाचा इरादा दिनांक २६ मार्च २०१८ रोजीच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सभा ठराव क्रमांक ३ - क अन्वये जाहीर केलेला असून, त्या संबंधीची उद्घोषणा दिनांक एप्रिल १२-१८ , २०१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, पुणे विभाग , भाग एक मध्ये पृष्ठ ११ वर तसेच दैनिक लोकमतमध्ये दिनांक ५ एप्रिल २०१८ रोजी व दि इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रांमध्ये दिनांक ५ एप्रिल २०१८ रोजी अनुक्रमे मराठी व इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झालेली आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ४० (१) (घ) अन्वये शासन नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस -१८१७ / सीआर -१७३/१७/युडी-१३ , दिनांक १८ जानेवारी २०१८ नुसार पुणे महानगर क्षेत्र अधिसूचित क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करून सदर क्षेत्रासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सदर प्राधिकरणाच्या स्थापनेपासून (दिनांक ३१ मार्च २०१५ ) नियुक्ती करण्यात आली आहे.
आणि ज्याअर्थी , पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने संचालक, नगर रचना , महाराष्ट्र राज्य , पुणे यांचेशी विचारविनिमय करून उक्त नगर रचना योजना तयार केलेली आहे व संचालक, नगर रचना , महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उक्त अधिनियमातील कलम ६१ (१) अन्वये प्रारूप नगर रचना योजना प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करण्यास दिनांक २८ फेब्रुवारी २०१ ९ चे पत्रान्वये हरकत नसल्याचे कळविले आहे.
आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ६१ (१ ) अन्वये उक्त प्रारूप नगर रचना योजना क्रमांक ११ , पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ठराव क्रमांक १ , दिनांक २ मार्च २०१ ९ अन्वये प्राधिकरण कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्यासंबंधीची जाहीर सूचना दिनांक ६ मार्च २०१ ९ च्या महाराष्ट्र शासन राजपत्रात पृष्ठे २२ , २३ वर तसेच दैनिक लोकमतमध्ये दिनांक ७ मार्च २०१ ९ रोजी व दि इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रांमध्ये दिनांक ७ मार्च २०१ ९ रोजी अनुक्रमे मराठी व इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झालेली आहे.
आणि ज्याअर्थी , प्रारूप नगर रचना योजना क्रमांक ११ प्रसिद्ध झाल्यानंतर उक्त अधिनियमाच्या कलम ६७ (१ ) अन्वये विहित मुदतीत नागरिकांनी हरकती / सूचना दाखल केलेल्या आहेत.
(१)
एच -५३ ९ भाग एक-असा. (पु.वि.पु. )- २६ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- असाधारण- पुणे विभागीय पुरवणी , १२ डिसेंबर २०१ ९ / अग्रहायण २१, शके १९४१ आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ६८ (२) अन्वये प्रारूप नगर रचना योजना मंजूर करण्याचे शासनाचे अधिकार उक्त अधिनियमाच्या कलम १५१ अन्वये शासन , नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१७/९ ७३/सीआर -१०३ /१७ /युडी-१३ , दिनांक १३ सप्टेंबर २०१७ नुसार महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्त यांना प्रदान केलेले आहेत .
आणि ज्याअर्थी , उक्त योजना उक्त अधिनियमाच्या कलम ६१ (१) अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उक्त अधिनियमाच्या कलम ६८ (२) अन्वये शासनाच्या प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त मांजरी खुर्द कोलवडी प्रारूप नगर रचना योजना क्रमांक ११ , अधिसूचना क्रमांक वियो/नरयो -११/प्र.क्र.८४/ शाखा-१ / २३० ९ , दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ रोजी मंजूर करण्यात आलेली आहे.
त्याअर्थी उक्त योजना उक्त अधिनियमाच्या कलम ६१ (१) अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्त झालेल्या हरकती/सूचना/आक्षेप , संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्यांचेकडील जावक क्रमांक ६१०५ , दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सूचना यांचा विचार करून आवश्यक तेथे दुरुस्ती / फेरफार करून उक्त अधिनियमाच्या कलम ६८ (२) अन्वये शासनाने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त मांजरी खुर्द कोलवडी प्रारूप नगर रचना योजना क्रमांक ११ मंजूर करण्यात येत आहे .
उक्त योजनेचा नकाशा व अहवाल पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात , कामकाजाच्या दिवशी , कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ खुले ठेवण्यात आले आहेत . तसेच नागरिकांना उक्त योजनेच्या नकाशाची किंवा अहवालाची प्रत किंवा त्यातील भागाची प्रत निश्चित मूल्य (फॉर्म -१ च्या प्रत्येक पृष्ठाकरिता रूपये १० व प्रत्येक अंतिम भूखंडाकरिता भाग नकाशा रूपये १०० याप्रमाणे) प्राधिकरण कार्यालयात जमा केल्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध राहील .
विक्रम कुमार ,
महानगर आयुक्त तथा
मुख्य कार्यकारी अधिकारी , पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ,
पुणे.
पुणे , ११ डिसेंबर २०१ ९ .
PUNE METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY
Notification of sanction of Manjari Khurd - Kolawadi Draft Town Planning Scheme No. 11 under Section 68 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 .
No. DP /TPS - 11/CR - 84/ Br. - 1 /2019. -Whereas the Pune Metropolitan Region Development Authority in accordance with the provisions of Section 60 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 ( hereinafter referred to as " the said Act " ) declared its intention to prepare the Draft Manjari Khurd - Kolawadi Town Planning Scheme No. 11 ( hereinafter referred to as " the said Scheme " ) by its Authority's Resolution No. 3C , dated 26th March 2018 and published a declaration to that effect in the Maharashtra Government Gazette , Part - I , Pune Division Supplement, dated April 12-18 , 2018 on page 11 and in the newspapers daily Lokmat on 5th April 2018 and The Indian Express on 5th April 2018 in Marathi and English respectively ;
and whereas in accordance with the provisions of Section 40 ( 1) (d) of the said Act , Government in Urban Development Department vide Notification No. TPS - 1817 / CR - 173/17 / UD - 13 , dated 18th January 2018 has declared the Metropolitan Pune area as " Notified Area " from the date of its establishment (dated 31st March 2015 ) and appointed The Pune Metropolitan Region Development Authority as Special Planning Authority for this notified area ;
and whereas, the Pune Metropolitan Region Development Authority after consulting with the Director of Town Planning , Maharashtra State , Pune has prepared the said Town Planning Scheme and the Director of Town Planning , Maharashtra State , Pune , has given the No Objection to publish the said Town Planning Scheme under Section 61 ( 1) of the said Act and therefore , to publish Town Planning Scheme under Section 61 (3) of Act , the extension is given by Joint Director, Town Planning Department , PuneDivision , Pune ;
and whereas , vide Resolution No. 1 on dated 2nd March 2019 , the Pune Metropolitan Region Development Authority has published the said Town Planning Scheme under Section 61 ( 1) of the said ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , १२ डिसेंबर २०१९ / अग्रहायण २१ , शके १ ९४१ Act and the notice to that effect has been published in the Maharashtra Government Gazette , dated 6thMarch 2019 on pages 22 , 23 and also in the daily newspapers daily Lokmat and Daily The Indian Express on 7th March 2019 in Marathi and English respectively ;
and Whereas , after publication of the Draft Town Planning Scheme No. 11 suggestion / objections were submitted by the persons within the prescribed limit as per Section 67 ( 1) of the said Act ;
and whereas , the Government in Urban Development Department in exercise of the powers conferred under Section 151 of the said Act , have delegated the powers to sanction the Draft Town Planning Scheme under Section 68 (2) of the said Act to the Metropolitan Commissioner of the Metropolitan Region Development Authorities vide Notification No. TPS - 1817/973/C.R . -103/17 /UD -13 , dated 13th September 2017 .
Now, therefore , after publication of the said Draft Town Planning Scheme in the Official Gazette under Section 61 ( 1) of the said Act and after considering the suggestions / objections received under Section 67 ( 1) of the said Act , taking into considerations of the Director of Town Planning Maharashtra State, Pune vide their letter No. 6105, dated 11th December 2019 and in exercise of the powers delegated under Section 151 ( 1) of the said Act , hereby accords sanction to the Manjari Khurd - Kolawadi Draft Town Planning Scheme No. 11 under Section 68 ( 2) of the said Act vide Notification No. DP /TPS - 11 / CR-84/Br. -1/2309 , dated 11th December 2019 .
A copy of the said scheme and plan thereof are kept open for inspection by the public during office hours on all working days in the office of the Pune Metropolitan Region Development Authority . A copy of the plan and Scheme book of the said scheme or part thereof can be obtained after payment of prescribed fees ( Rs . 10 per page for Form - l and Rs . 100- per Final Plot Number for Part Plan) .
VIKRAM KUMAR ,
Metropolitan Commissioner and
ChiefExecutive Officer, PuneMetropolitan Region Development Authority,
Pune.
Pune, 11th December 2019 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI – 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .