Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IKDS Extra No. 136, (16th December 2019) जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांजकडून अधिसूचना क्रमांक गृह/एमएजी-1/जड वाह.बंदी आंबेत पुल/2019

Published 16 December 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-16.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १६, २०१९/अग्रहायण २५, शके १९४१ १ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक ७२] सोमवार, डिसेंबर १६, २०१९/अग्रहायण २५, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १३६

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक गृह/एमएजी-१/जड वाह.बंदी आंबेत पुल/२०१९.---- ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी उपोद्घातातील अ.क्र. ३ व ५ कडील पत्रान्वये म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील (रा.मा. १०१) सावित्री खाडीवरील कि.मी. ०/८०० मधील आंबेत पुलावरून दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चारचाकी कार, जीप इत्यादी व्यतिरिक्त सर्व प्रकारची अवजड वाहतूक जसे बस, ट्रक, टेम्पो या तात्काळ बंद करण्याबाबत केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने या कार्यालयाकडील अनुक्रमे उपोद्घातातील अ.क्र. ४ व ६ रोजीच्या अधिसूचनेन्वये सदर अधिसूचनेच्या दिनांकापासून १ महाकरिता म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील (रा.मा. १०१) सावित्री खाडीवरील कि.मी. ०/८०० मधील आंबेत पुलावरून दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चारचाकी कार, जीप इत्यादी व्यतिरिक्त सर्व प्रकारची अवजड वाहतूक जसे बस, ट्रक, टेम्पो या तात्काळ बंद करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांचेकडील उपोद्घातातील अ.क्र.०७ या वर्षाच्या लांबलेल्या पावसामुळे व पुलाच्या ठिकाणी असलेल्या अवघड नैर्सगिक परिस्थितीमुळे अद्याप पुलाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण झालेले नाही. सदर पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारास कार्यादेशांच्या दिनांकापासून १२ महिने इतकी मुदत देण्यात आलेली आहे. सद्य:स्थितीत पुलाच्या Pier Cap Bracket च्या दुरुस्तीचे काम चालू आहे. सदर दुरुस्तीसाठी अजून ३ महिने इतका कालावधी लागणार आहे. तरी आंबेत पुलावरून दुचाकी, ऑटोरिक्षा, सहा आसनी रिक्षा, चारचाकी कार, जीप इत्यादी व्यतिरिक्त सर्व प्रकारची अवजड वाहतूक जसे बस, ट्रक, टेम्पो पुढील ३ महिने इतके कालावधीसाठी बंद करण्याबाबत त्वरित अधिसूचना काढण्यात यावी जेणेकरून भविष्यात काही अनुचित प्रकार घडून जिवीत व वित्त हानी होणार नाही असे या कार्यालयास कळविले आहे ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यत झालेल्या अति पर्जन्यवृष्टीमुळे व पुलावरून होणाया जाणाया अतिअवजड वाहतुकीमुळे पुल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने, तसेच पुलाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण करावयाचे असल्याने म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील (रा.मा. १०१) सावित्री खाडीवरील कि.मी. ०/८००(१) भाग एक (को.वि.पु.) १३६----१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १६, २०१९/अग्रहायण २५, शके १९४१ मधील आंबेत पुलावरून दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चारचाकी कार, जीप इत्यादी व्यतिरिक्त सर्व प्रकारची अवजड वाहतूक जसे बस, ट्रक, टेम्पो या तात्काळ बंद करणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हादंडाधिकारी, रायगड उपोद्घातातील अ.क्र.१ व २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार या अधिसूचनेच्या दिनांकापासून ३ महाकरिता म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील (रा.मा. १०१) सावित्री खाडीवरील कि.मी. ०/८०० मधील आंबेत पुलावरून दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चारचाकी कार, जीप इत्यादी व्यतिरिक्त सर्व प्रकारची अवजड वाहतूक जसे बस, ट्रक, टेम्पो या तात्काळ बंद करण्याबाबतचे आदेश जारी करीत आहे.

डॉ. विजय सूर्यवंशी,

रायगड,

जिल्हादंडाधिकारी, दिनांक १६ डिसेंबर २०१९.

रायगड.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-16.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-16.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.