Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I KDS Extra 137 (18th December 2019) जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, रायगड-अलिबाग यांजकडून क्रमांक भूसंपादन/टे-6/चेंढरे/5889/2019

Published 18 December 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०१९/अग्रहायण २७, शके १९४१ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक ७३] बुधवार, डिसेंबर १८, २०१९/अग्रहायण २७, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १३७

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, रायगड-अलिबाग यांजकडून

भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ प्रमाणे कलम

१९ चे घोषणापत्र.

क्रमांक भूसंपादन/टे-६/चेंढरे/५८८९/२०१९.-----ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग यांचेमार्फत पोलीस दलातील नव्याने स्थापन झालेल्या जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, पोलीस मोटारवाहन विभाग इत्यादी प्रयोजना करीता मौजे चेंढरें, ता. अलिबाग, जि. रायगड येथील जमीन संपादित करावयाची आहे. सदर संपादनासाठी केलेली जमीन उप विभागीय अधिकारी, अलिबाग यांचे कार्यालयाकडून संपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

आणि ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश ""उक्त अधिनियम"" असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, उप विभागीय अधिकारी, अलिबाग यांनी अधिसूचना, क्रमांक उविअ/कात-२/भूसंपादन/चेंढरे/एस आर ०१/ २०१५ दिनांक ३-९ जानेवारी २०१९ अन्वये कलम ११ ची अधिसूचना मराठी मध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार ३-९, जानेवारी २०१९ पृष्ठ क्र. ६, ७ वर व इंग्रजीमध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार ३-९ जानेवारी २०१९ पृष्ठ क्रमांक ९, १० व ११ वर प्रसिद्ध झाली आहे. तसेच ""कृषिवल"" मध्ये बुधवार दिनांक १६ जानेवारी २०१९ रोजी पान नं. ११ वर आणि ""रायगड रत्नागिरी टाईम्स"" मध्ये गुरुवार दिनांक १७ जानेवारी २०१९ रोजी पान नं. ९ वर प्रसिद्ध झाले आहे. यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

त्याअर्थी, मी, जिल्हाधिकारी रायगड अलिबाग, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश ""उक्त अधिनियम"" असा केला आहे) हा राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये अहवाल पाठविलेल्या प्राधिकायाचा अहवाल विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत माझी खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी ""पुनर्वसाहत क्षेत्र"" म्हणून ""निरंक"" निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये ""निरंक"" विर्िनदिष्ट केला आहे.

(१)

भाग एक (को.वि.पु.)--१३७-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०१९/अग्रहायण २७, शके १९४१ आणि ज्याअर्थी, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे. उक्त जमिनीच्या संबंधात यापुढे करावयाच्या सर्व कार्यवाहीच्या बाबतीत जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्याकरिता संपादन अधिनियमाचे कलम ३ च्या खंड (छ) याद्वारे उप विभागीय अधिकारी, अलिबाग उप विभाग अलिबाग, ता. अलिबाग, जि. रायगड यांची नेमणूक करणेत येत आहे. त्याप्रमाणे त्यांना उक्त जमिनीच्या संबंधातील संपादनाची कार्यवाही, या प्रयोजनासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करून सुरू करावी, असे निर्देश देण्यात येत आहे.

अनुसूची एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

गावाचे नाव मौजे-चेंढरे, ता. अलिबाग, जिल्हा रायगड

अनुक्रमांक (१) भूमापन किंवा गट क्रमांक (२) अ दाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये) ं (३)
१ स. नं. ११८/१अ पैकी ०-०३-०
२ स. नं. ११८/१ब पैकी ०-१९-४
एकूण ०-२२-४

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

अधिसूचना प्रकल्पाचे नाव मौजे चेंढरे, ता. अलिबाग येथील पोलीस दलातील नव्याने स्थापन झालेल्या जलद प्रतिसाद

पथक, दंगा नियंत्रण पथक, पोलीस मोटरवाहन विभाग इ. प्रयोजनासाठी

निर्गमित प्रकल्पकार्याचे वर्णन मौजे चेंढरे ता. अलिबाग येथील पोलीस दलातील नव्याने स्थापन झालेल्या जलद प्रतिसाद पथक,

दंगा नियंत्रण पथक, पोलीस मोटर वाहन विभाग इ. प्रयोजनासाठी संपादन करण्यात येणारी जमीन

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असली तरी ती चेंढरेच्या हद्दीत येते. पोलीस मुख्यालयाच्या

परिसरात प्रस्तावित भूसंपादनाच्या जमिनीशेजारी तळकरनगर येथे १००-१२५ घरांची वस्ती आहे.

दंगलरोधक पथकाच्या कवायती व सरावाकरिता निवडलेली जागा पोलीस मुख्यालयाला

लागून असल्याने सोयीची आहे. तसेच सध्याच्या कवायती क्रिडामैदानाला लागूनच आहे. या

ठिकाणी पोलीस नियमित सराव करतात व याची परिसरातील नागरीकांना माहिती आहे व सवय

आहे.

करण्यापूर्वी समाजाला मिळणारे लाभ अलिबाग शहराचे औद्योगिक महव वाढते नागरीकरण व पर्यटन वाढते महव लक्षात घेता,

येत्या दशकात अलिबाग शहराचा विकास आणि विस्तार वेगाने होईल. वाढत्या शहरीकरणाच्या

प्रक्रियेत ग्रामीण ते शहरी स्थलांतर तर होतेच परंतु परप्रांतीय स्थलांतरसुद्धा वेगाने होत आहे.

याचा नागरी सुविधांवर खूप ताण येतो रोजच्या जगण्यासाठी संघर्ष वाढतो व गुन्हेगारी प्रवृत्ती

वाढते. गुन्हेगारांना पकडणे, शिक्षा करणे व गुन्हेगारी वृत्तीला प्रतिबंध करणे या सर्व आघाडयांवर

पोलीस यंत्रणेला काम करावे लागते. समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस दलाची

भूमिका व कर्तव्य महवाचे ठरते. या दृष्टिने स्थानिक पोलीस दलाकडे दंगलरोधक पथक व

शीघ्रकृतीदल असणे आवश्यक आहे. यामुळे लोकांना सुरक्षित व आश्वासक वाटते. या पथकाचा

नियमित सराव पोलीस मुख्यालयाच्या परिसरात होतो. आजुबाजूच्या वस्तीमधील ९० टक्के

लोकांना दंगलरोधक पथक व शीघ्रकृतिदलामुळे सुरक्षित वाटते.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०१९/अग्रहायण २७, शके १९४१

लोकांच्या मते १. सुरक्षिततेची भावना २. भुरटेचोर, साखळीचोर यांना दहशत, ३ गुन्हेगारी कमी

होईल. ४. लहान मुले, स्त्रिया, जेष्ठ नागरीकांना सुरक्षित वाटेल. गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी,

लोकांच्या मनात विश्वास, सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी दंगलरोधक पथक व

शीघ्रकृतीदलाची महवाची भूमिका आहे.

अनुसूची तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन (लागू नाही)

गावाचे नाव चेंढरे, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड

अनुक्रमांक (१) भूमापन क्रमांक किंवा गट नंबर (२) क्षेत्र (हेक्टरमध्ये) (३)
१ निरंक निरंक

अनुसूची चार

(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश) (लागू नाही)

""निरंक""

टीप .—उक्त जमिनीच्या नकाशाचे उप विभागीय अधिकारी, अलिबाग, उप विभाग अलिबाग, ता. अलिबाग, जि. रायगड या कार्यालयात निरीक्षणाकरिता उपलब्ध होऊ शकेल.

अलिबाग, दिनांक १७ डिसेंबर २०१९.

डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.