Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A-Central Extra 69 (19th December 2019) राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, आदेश, दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी माहे फेब्रुवारी 2020 मध्ये होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच...........मतदार याद्या तयार करण्यासाठी वापण्यात येईल.

Published 19 December 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, डिसेंबर १९, २०१९/अग्रहायण २८, शके १९४१ १ RNI No. MAHBIL/2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग

वर्ष ५, अंक ५०] गुरुवार, डिसेंबर १९, २०१९/अग्रहायण २८, शके १९४१ [ पृष्ठ १, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ६९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ डिसेंबर २०१९.

आदेश

क्रमांक रानिआ/मनपा-२०१९/प्र.क्र.१३/का. ५.-----मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (१८८८ चा मुंबई ३) च्या कलम १९(१)(ब), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (१९४९ चा मुंबई ५९) च्या कलम ७-अ, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) च्या कलम ११, महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५) च्या कलम १३ तसेच महाराष्ट्र ग्रामपंचयात अधिनियम, १९५८ (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) चे कलम १०-अ व १२ चे पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ या दिवशी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी, माहे फेब्रुवारी, २०२० मध्ये होणाया महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच नगरपरिषदा/नगरपंचायतीच्या (अध्यक्ष पदासह) व ग्रामपंचायतीच्या (सरपंच पदासह) सार्वत्रिक/पोट-निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येईल, असे अधिसूचित करण्यात येत आहे.

मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,

अ. तु. सणस, सह सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.

(१) भाग एक--अ (म.उ.वि.)----६९

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.