RNI No. MAHBIL/2009/40124
द्धन्रु]क्ष् रू न्
+रून्
म्रु ५, +हॅ १४(२)] ाप्म्न्, ह्यरूदन् १९, २०१९/+ २८, ॅ १९४१ [ण्रु ३, ॅद्ध : प् २६.००
+रून् ॅद्धहॅ ५४
ह्यण्ॅ ॅ
द्धन्रु]क्ष् ह्यम्रू म् द्धन्रु]क्ष् ह्यम्ह्यन्रु रून् ॅ्र ह्यम्ॅ.
द्धन्रु]क्ष् ह्यम्द्धहभ् रूह्यम्
द्धन्रु]क्ष् ह्यम्रू ह्यहॅ १९ ह्यरूदन्, २०१९ न््र ान्:रूह्य ॅन् + ्र ह्यम्ॅ द्धन्रु]क्ष् ह्यम्रू ह्यद्ध ११६ +म् ह्यरू ॅन् + :---
L. A. BILL No. XLVIII OF 2019.
A BILL
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA MUNICIPAL CORPORATIONS ACT.
सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४८.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.
ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये आणखी सुधारणा १९४९ चा ५९.
करणे इष्ट आहे ;
भाग पाच--५४----१.
एचबी-१८२१----१.
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १९, २०१९/अग्रहायण २८, शके १९४१ त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या सत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----
संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०१९ असे म्हणावे.
सन १९४९ चा अधिनियम क्रमांक ५९ याच्या कलम ५ ची सुधारणा.
१९४९ चा ५९. २०१७ चा महा. ९. २०१९ चा महा.....
२. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ मधील, पोट-कलम (३) मध्ये, पहिल्या परंतुकामधील, "महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०१६ याच्या प्रारंभानंतर ", या मजकुरानंतर "परंतु महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०१९ राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या तारखेच्या लगतपूर्वीच्या दिवसापयर्ंत " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १९, २०१९/अग्रहायण २८, शके १९४१ ३उद्देश व कारणे याचे निवेदन.
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ९ अधिनियमित करण्यापूर्वी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (१९४९ चा ५९) याच्या कलम ५ च्या पोट-कलम (३) मध्ये अशी तरतूद केली होती की, महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागातून केवळ एकच पालिका सदस्य निवडून देण्यात येईल. शक्य असेल तेथवर, प्रत्येक प्रभागातून चार पालिका सदस्य, परंतु, तीन पेक्षा कमी नसतील व पाच पेक्षा अधिक नसतील एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील, आणि प्रत्येक मतदार, त्याच्या प्रभागातील निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांच्या संख्येइतकी मते देण्यास हक्कदार असेल, अशी तरतूद करता यावी म्हणून सन २०१७ च्या उक्त अधिनियमाद्वारे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलम (३) मध्ये सुधारणा केली होती.
२. प्रभागांतील विद्यमान स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि सुरळीत कामकाजासाठी व प्रभागातील विर्िनदिष्ट प्रतिनिधित्वासाठी तसेच महानगरपालिकांच्या जलद विकासात अधिकाधिक उत्तरदायित्वाची सुनिश्चिती करण्यासाठी, उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलम (३) च्या पहिल्या परंतुकात योग्य ती सुधारणा करून त्याद्वारे महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागासाठी केवळ एक पालिका सदस्य निवडला जाईल अशी तरतूद करणे इष्ट आहे असे राज्य शासनाला वाटते.
३. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे.
नागपूर,
एकनाथ शिंदे,
दिनांक १८ डिसेंबर, २०१९.
नगर विकास मंत्री.
विधान भवन :
राजेन्द्र भागवत,
नागपूर,
सचिव (कार्यभार.),
दिनांक : १९ डिसेंबर, २०१९.
महाराष्ट्र विधानसभा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.