Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांची कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विधी अधिकाऱ्याच्या सेवा नियुक्तीस तात्पुरत्या स्वरूपात मुदतवाढ देण्याबाबतची अधिसूचना. (2) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील मौजे आंबेठाण, तालुका खेड, येथील 13.386 हेक्टर क्षेत्राचा प्रस्ताव नामंजूर करणेबाबतची, तसेच मौजे म्हाळुंगे, तालुका खेड येथील वनीकरण विभागात समाविष्ट असलेली जमीन रहिवास विभागात समाविष्ट करण्याबाबतची सूचना. (3) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील पाझर तलाव क्रमांक 9, एसआर-18/2003 यासाठी मौजे नजीक पिंपरी, तालुका मोहोळ तसेच गाव वाफळे, तालुका मोहोळ पाझर तलाव क्रमांक 17, एसआर-6/2004 भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (4) उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी, पुणे यांजकडील मौजे नवलाख उंब्रे येथील जमिनी भूसंपादनाबाबतची जाहीर नोटीस. (5) सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील भूमिगत नळमार्ग व वाहिन्या बांधण्याकरिता जमिनीच्या वापर हक्काचे संपादन करण्याविषयी अधिसूचना. (6) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन 2005 अन्वये अधिसूचना क्रमांक 3.
Published 19 December 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.