महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक २६ट शुक्रवार, डिसेंबर २०, २०१९/अग्रहायण २९, शके १९४१ पृष्ठ १, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ३५
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
दुरुस्ती आदेश
क्रमांक नपाप्र.१/अनर्हता/एसआर-२७/२०१६/२०१९.-----ज्याअर्थी, शासन राजपत्र दिनांक १९ ऑगस्ट २०१९ नुसार श्रीमती संपदा योगेश वाघधरे, यांना लांजा नगरपंचायतीचे सदस्य म्हणून अनर्ह घोषित करण्यात आले होते. परंतु शासन नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्र. एमयुएन.४४१७/प्रक्र. ७६/नवि-१५, दिनांक १८ डिसेंबर २०१९ अन्वये शासन राजपत्रात दिनांक ४ मे २०१७ रोजीचे मूळ आदेश प्रसिद्ध होणे आवश्यक असल्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे.
त्याअर्थी, या दुरुस्ती आदेशानुसार, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ४४(१)(ई) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार आणि याबाबतीत त्यास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, मी, बाबासाहेब बेलदार, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, लांजा नगरपंचायतीच्या खालील सदस्याला उक्त अधिनियमाच्या कलमानुसार लांजा नगरपंचायतीचे सदस्यपद धारण करण्यास अनर्ह ठरविण्यात येत असून उक्त अधिनियमाच्या कलम ४४ पोट-कलम (३) च्या तरतुदींच्या अधीन पालिका सदस्य म्हणून चालू राहण्यास नि:समर्थ ठरविण्यात येत आहे आणि त्यांचे पालिका सदस्य पद दिनांक ४ मे २०१७ पासून रिकामे झाल्याचे जाहीर करीत आहे.
परिशिष्ट
अनुक्रमांक नगरपंचायतीचे नाव
(१) (२)
सदस्याचे नाव (३)
१ लांजा नगरपंचायत
श्रीमती संपदा योगेश वाघधरे.
रत्नागिरी,
बाबासाहेब बेलदार,
दिनांक १९ डिसेंबर २०१९.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.