Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षणातील शुद्धीपत्रक.

Published 20 December 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-20.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ८ , अंक ३७ ] शुक्रवार , डिसेंबर २० , २०१९ / अग्रहायण २९ , शके १९४१

[ पृष्ठ १

असाधारण क्रमांक ३७

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक पंसप-५ /कावि- ९ ७६४५/ शुद्धीपत्रक/२०१ ९ .-- ग्राम विकास विभाग, मंत्रालय , मुंबई यांचेकडील शासन अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८ / प्र . क्र. २१८ (१ )/पंरा -२ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ नुसार पंचायत समिती सभापती आरक्षणाबाबत दिलेल्या निर्देशाप्रमाणे पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापतीपदाची आरक्षण सोडत दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ रोजी काढण्यात आलेली आहे . सदर सभापती आरक्षण सोडतीमध्ये निघालेल्या आरक्षणाबाबतचा तक्ता सोबत जोडलेला आहे . महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग- एक-अ, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक १७ डिसेंबर २०१ ९/अग्रहायण २६ , शके १ ९ ४१ रोजी प्रसिद्ध करणेत आलेले आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे शुद्धीपत्रक निर्गमित होणे आवश्यक आहे.

पृष्ठ क्रमांक २ वरील परिशिष्टामधील अ. क्र. ४ मधील " पंचायत समित्यांची नावे " या स्तंभातील " खेड " या नावासमोरील " सन २०१ ९ साठी निश्चित झालेले पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण " या स्तंभामध्ये " नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला " ऐवजी " नागरिकांचा मागास प्रवर्ग " असे वाचावे.

तसेच अ. क्र. ५ मधील " पंचायत समित्यांची नावे " या स्तंभातील " इंदापूर " या नावासमोरील " सन २०१ ९ साठी निश्चित झालेले पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण " या स्तंभामध्ये " नागरिकांचा मागास प्रवर्ग" ऐवजी " नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला" असे वाचावे.

नवल किशोर राम,

जिल्हाधिकारी , पुणे .

पुणे, १८ डिसेंबर २०१ ९ .

(१)

एच-५४८ , भाग एक- अ (असा .) (पु.वि.पु.)- ३७

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-20.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-20.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.