RNI NO . MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ८ , अंक ३८ ]
सोमवार , डिसेंबर २३ , २०१ ९ / पौष २ , शके १९ ४१
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ३८
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
क्रमांक कार्या- १२- अ/जिपपंस/आरआर/पंस सभापती आरक्षण/५० ९/२०१ ९.-महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष , उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती , उपसभापती) ( पदाचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ च्या तरतुदीस अनुसरून महाराष्ट्र शासन , ग्रामविकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८ /प्र . क्र. २१८ (२)/पंरा -२ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ अन्वये कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती राखीव पदांची संख्या व त्यांचे जिल्हानिहाय वाटप निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याकरिता अनुसूचीमध्ये नमूद केलेप्रमाणे सभापतीपदांची संख्या निश्चित करून दिलेली आहे.
परिशिष्ट
आरक्षित पदांची संख्या अनुसूचित जाती
१
(
अ) अनुसूचित जातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या
१
(ब) अनुसूचित जाती ( महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या
पदांची संख्या
अनुसूचित जमाती
निरंक (अ) अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या
निरंक (ब) अनुसूचित जमाती (महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या.
नागरिकांचा मागास प्रवर्ग
१
(अ) नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गासाठी (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या.
२
(ब) नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्ग (महिला) यांच्यासाठी ( विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या.
सर्वसाधारण
३
(अ) सर्वसाधारण प्रवर्गासाठी जिल्ह्यामधील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या.
४
(ब ) सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यामधील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या.
(१)
एच-५६७ , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु. )- ३८ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी , २३ डिसेंबर २०१९ / पौष २ , शके १९ ४१ महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ च्या नियम २ - फ च्या उप- कलम २ ( अ) , २ (ब ), ३ (अ) , ३ (ब) , ४ (अ) , ४ (ब), ५ (अ) , ५ (ब ) व ६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग , यांचेकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र . क्र. २१८ (२)/पंरा-२ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे अधिसूचनेनुसार निश्चित केलेल्या निरनिराळ्या गटांतील पदांचे संख्येस अधीन राहून हे आरक्षण चक्रानुक्रमे पद्धतीने दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ रोजी काढण्यात आलेले असून सदर आरक्षण निवडीपासून अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग ( विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिलांसाठी राखून ठेवावयाच्या पंचायत समिती सभापती पदासाठी बिंदू नामावली निश्चित करणेत येत आहे.
नियम-२ फ (२) , (अ) (ब) च्या तरतुदींनुसार अनुसूचित जातीसाठी पंचायत समिती , चंदगड पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे.
नियम -२ फ (५ ) (अ) च्या तरतुदीनुसार अनुसूचित जाती महिलांसाठी पंचायत समिती , गडहिंग्लज आरक्षित करणेत येत आहे.
नियम-२ फ (४) (अ) (ब) अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी शाहूवाडी पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे.
नियम -२ फ (५ ) (अ) अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी १. राधानगरी आणि २. गगनबावडा या दोन पंचायत समित्या आरक्षित करणेत येत आहेत.
आहे. नियम -२ फ (५) (अ) अन्वये महिलांसाठी १. शिरोळ, २. करवीर , ३. पन्हाळा आणि ४. भुदरगड या चार पंचायत समित्या आरक्षित करणेत येत वरीलप्रमाणे एकूण नऊ पंचायत समित्यांची सभापती पदे आरक्षित झालेने १. हातकणंगले, २. कागल आणि ३. आजरा या तीन पंचायत समित्यांची सभापती पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहतील .
महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ चे तरतुदीप्रमाणे व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा विचारात घेऊन मी , दौलत देसाई, जिल्हाधिकारी , कोल्हापूर जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांचे सभापती पदांचे आरक्षण दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ रोजी काढण्यात आलेले असून सदर आरक्षण निवडीपासून कालावधी संपेपर्यंत असेल .
परिशिष्ट
अ. क्र.
पंचायत समित्यांची नावे
सभापती पद ज्या प्रवर्गांसाठी आरक्षित झाले त्याचा तपशील
१
३
२
१
गडहिंग्लज
अनुसूचित जाती महिला
चंदगड
२
अनुसूचित जाती
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राधानगरी
३
गगनबावडा
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ४
नागरिकांचा मागास प्रवर्ग ५
शाहूवाडी
सर्वसाधारण महिला
शिरोळ
६
करवीर
सर्वसाधारण महिला
७
सर्वसाधारण महिला
८
भुदरगड
पन्हाळा
सर्वसाधारण महिला
९
दौलत देसाई,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर , ११ डिसेंबर २०१ ९ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .