महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ५, अंक ३३] मंगळवार, डिसेंेबर ३१, २०१९/पौष १०, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ६३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३६.------ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये आणखी सुधारणा
. .
. . . .
. .
करण्यासाठी अधिनियम.
१-२ दिनांक २८ डिसेंबर २०१९ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.
राजेन्द्र ग. भागवत, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३६.
(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर "" महाराष्ट्र शासन राजपत्रात "" दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये आणखी सुधारणा १९४९ चा ५९. करणे इष्ट आहे ;
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, डिसेंेबर ३१, २०१९/पौष १०, शके १९४१ त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या सत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०१९ असे म्हणावे.
सन १९४९ चा अधिनियम क्रमांक ५९ याच्या कलम ५ ची सुधारणा.
२. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ मधील, पोट-कलम (३) मध्ये, पहिल्या परंतुकामधील, " महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०१६ याच्या प्रारंभानंतर ", या मजकुरानंतर " परंतु महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०१९ राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या तारखेच्या लगतपूर्वीच्या दिवसापयर्ंत " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.
१९४९ चा ५९. २०१७ चा महा. ९. २०१९ चा महा. ३६.