महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ६, अंक २] सोमवार, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१ [पृष्ठे १५, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ जानेवारी २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१.
क्रमांक एसजीए.२०१९/प्र. क्र. ३९६/काम-५.----ज्याअर्थी, ज्यांची नावे यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक च्या स्तंभ (२) मध्ये नमूद केलेली आहेत, अशा विवक्षीत सुरक्षा रक्षकांना (यात यापुढे ज्यांचा उल्लेख ''उक्त सुरक्षा रक्षक '' असा करण्यात आला आहे.), उक्त अनुसूची-एक च्या स्तंभ (४) मध्ये नमूद केलेल्या ३ मुख्य मालकांकडे अमरावती जिल्हा येथे कामावर ठेवलेले आहे अशा मे. मॉर्डन वीर रेज सिक्युरिटी फोर्स (इं) प्रा. लि., ६ वा मजला, अटलांन्टा सेंटर, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६३, मालक श्री. ग्यान प्रकाश सिंग यांनी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ (१९८१ चा महा. ५८) याच्या कलम २३ अन्वये, उक्त अधिनियमाच्या सर्व तरतुदी आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ (यात यापुढे ज्याचा उल्लेख ''उक्त योजना'' असा करण्यात आला आहे.) यांच्या अंमलबजावणीतून सूट मिळण्यासाठी अर्ज केला आहे ;
आणि ज्याअर्थी, सल्लागार समितीशी विचारविनिमय केल्यानंतर आणि त्याबाबत संबंधित सुरक्षा रक्षक मंडळाने शिफारस केल्यानुसार उक्त सुरक्षा रक्षकांना मिळत असणारे लाभ हे उक्त अधिनियमाद्वारे व त्या अधिनियमान्वये आणि उक्त योजनेद्वारे व त्याअन्वये तरतूद केलेल्या लाभांपेक्षा एकंदरीत पाहता, कमी फायदेशीर नाहीत असे महाराष्ट्र शासनाचे मत झालेले आहे.
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ याच्या कलम २३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या व उक्त योजनेच्या सर्व तरतुदींच्या अंमलबजावणीतून उक्त खाजगी सुरक्षा रक्षकांना, यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोन मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या शतर्ींंच्या अधीन राहून, नियोक्ता अभिकरण एजन्सीने मुख्य मालकासोबत केलेल्या करारपत्राच्या दिनांकापासून कलम २३ अंतर्गत सदरहू अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापयर्ंत तसेच ही अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून पुढील तीन वषार्ंच्या कालावधीसाठी सूट देत आहे.
(१)
भाग एक--ल-----२--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१
अनुसूची-एक
अ. क्र. सुरक्षा रक्षकाचे नाव
वर्ग मुख्य मालकाचे नाव व पत्ता (१) (२)
(३)
(४)
१ सैय्यद मुमताजअली असिफाअली . . सुरक्षा रक्षक अॅक्सीस बँक लिमी., अमरावती २ चेतन रोजश साऊरकर
. . सुरक्षा रक्षक इंन्ट्रकार्ट, अंबादेवी रोड, अमरावती ३ सुद्धोधन दादाराव राऊत
. . सुरक्षा रक्षक
-----''-----
४ दिलीप प्रकाश कांबळे
. . सुरक्षा रक्षक इंन्ट्रकार्ट, अकोला, जि. अकोला ५ दिलीप गौरधन वानखडे
. . सुरक्षा रक्षक अॅक्सीस बँक लिमी., अमरावती टीप.--- महाराष्ट्र शासन या सुरक्षा रक्षकांबाबत कोणत्याही प्रकारची हमी घेत नाही. मुख्य मालक स्वत:च्या जबाबदारीवर सुरक्षा रक्षकांना कामे देऊ शकतात.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१ ३अनुसूची-दोन
मालक एजन्सीने व मुख्य मालकांनी पाळावयाच्या शर्ती
१. पोलीस तपासणी.------ खाजगी सुरक्षा एजन्सी (नियमन) कायदा, २००५ अंतर्गत सुरक्षा रक्षकांच्या तसेच एजन्सीच्या मालकांच्या पूर्वइतिहासाबाबत पोलीस पडताळणी दाखला तसेच सदरहू परवान्यामधील अटी व शतर्ींची पुर्तता करणे आवश्यक असेल.
२. प्रशिक्षण.----खाजगी सुरक्षा एजन्सी (नियमन) कायदा, २००५ अन्वये सुरक्षा रक्षकांना नियुक्त करण्यापूर्वी पुरेसे प्रशिक्षण देणे आवश्यक असेल.
३. शैक्षणिक, शारीरिक आणि इतर पात्रता.------खाजगी सुरक्षा एजन्सी (नियमन) अधिनियम, २००५ नुसार सुरक्षा रक्षकांची शैक्षणिक व शारीरिक पात्रता पुढीलप्रमाणे असेल :------
किमान शैक्षणिक पात्रता.----इयत्ता ८वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता.----(अ) (१) उंची----१६२ सें.मी.
(२) वजन----५० किलो.
(३) छाती---न फुगवता---७९ सें.मी.
फुगवून---८४ सें.मी.
(४) नजर---दृष्टी चष्मा असल्यास नंबर जास्त नसावा.
(ब) आदिवासी उमेदवारांना उंचीमध्ये ५ सें.मी. व छातीमध्ये २ सें.मी.ची सवलत देण्यात यावी.
४. लाभ.----सुरक्षा रक्षकांना पुढील लाभ मिळतील :-----
(अ) गणवेष प्रत्येक वर्षाला २ जोड.
(ब) चामडी बूट प्रत्येक वर्षात १ जोड.
(क) पावसाळी व हिवाळी गणवेश---(२ वषार्ंतून एकदा) रेनकोट, ट्राऊझर, टोपी, वूलन कोट व पँट.
५. वेतन व इतर कायदेशीर सवलती.----- सूट दिलेल्या सुरक्षा रक्षकाने राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये आपले खाते उघडावे व मालक एजन्सीने मुख्य मालकाकडे तैनात केलेल्या सुरक्षा रक्षकांच्या देय वेतनाच्या रकमेइतका रेखांकित धनादेश सुरक्षा रक्षकास द्यावा किंवा देय वेतनाची रक्कम सरळ सुरक्षा रक्षकांचे बँक खात्यात प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेच्या आत जमा करावी. सुरक्षा रक्षकास दिलेल्या वेतनाबाबतचे सविस्तर तपशील नमुना ''क'' मधील विवरणपत्रामध्ये भरून सुरक्षा रक्षक मंडळास दर महिन्याच्या १० तारखेपयर्ंत पाठवावे. मालक एजन्सीने खाली दर्शविल्याप्रमाणे लाभ सुरक्षा रक्षकांना दयावेत-----
सानुग्रह अनुदान . . वेतनाच्या १० टक्के
उपदान
. . वेतनाच्या ४ टक्के
भरपगारी रजा . . वेतनाच्या ६ टक्के
भरपगारी सुट्टी . . वेतनाच्या १ टक्का.
सुरक्षा रक्षकांना लागू असलेल्या भविष्यनिर्वाह निधी व कामगार राज्य विमा योजना यांच्या वजाती मालक एजन्सीने परस्पर संबंधित प्राधिकरणाकडे जमा कराव्यात आणि त्यांचे चलन माहितीसाठी मंडळास सादर करावे. मालक एजन्सीने भरणा केलेल्या भविष्यनिर्वाह निधी व कामगार राज्य विमा योजनेच्या वजातीबाबतच्या पावत्या/चलन सुरक्षा रक्षकांना नियमितपणे देऊन त्या संदर्भातील एकत्रित तपशील संबंधित सुरक्षा रक्षक मंडळास प्रत्येक ६ महिन्यांनी सादर करावा, असे न केल्यास, मालक एजन्सीला जबाबदार धरून दिलेली सूट रद्द करण्यात येईल.
६. अतिकालिक भत्ता.-----सुरक्षा रक्षकांना मिळणारा अतिकालिक भत्ता हा मंडळाने नोंदित सुरक्षा रक्षकांसाठी निश्चित केलेल्या वेतन दराच्या दुप्पट दरापेक्षा कमी नसावा, याबाबत संबंधित मुख्य मालकाची अंतिम जबाबदारी राहील. सुरक्षा रक्षकांना देय वेतन व लाभ देणे मुख्य मालकांची जबाबदारी असून मुख्य मालकाने त्यांच्याकडे तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना अधिनियम आणि योजनेतील तरतुदींनुसार वेतन व लाभ मिळत आहेत याची खात्री करून घेणे बंधनकारक असेल. भाग एक--ल-----२--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१ ७. विवरणपत्र सादर करणे.------(अ) त्रैमासिक विवरणपत्र.----मालक एजन्सीजने सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीबाबतचे त्रैमासिक विवरणपत्र प्रत्येक त्रैमासिकाच्या (जानेवारी, एप्रिल, जुलै व ऑक्टोबर महिन्याच्या) पहिल्या आठवडयात सोबत जोडलेल्या नमुना ''अ'' संबंधित सुरक्षा रक्षक मंडळास सादर करावे.
(ब) सहामाही विवरणपत्र.------(१) नियुक्त केलेल्या, नोकरी सोडून गेलेल्या आणि नव्याने भरती केलेल्या सुरक्षा रक्षकांबाबतचे विवरणपत्र दर ६ महिन्यांनी सोबत जोडलेल्या नमुना '' ब '' संबंधित सुरक्षा रक्षक मंडळ यांना एजन्सीने सादर करावे.
(२) भविष्यनिर्वाह निधी व राज्य कामगार विमा योजनेची वर्गणी एजन्सीने नियमित भरून संबंधित सुरक्षा रक्षकांना त्यासंबंधी वेळोवेळी पावत्या द्याव्यात व दर सहा महिन्यांत तसे केल्याबाबतचा अहवाल सुरक्षा रक्षक मंडळास द्यावा.
(३) यापूर्वीच्या भविष्यनिर्वाह निधीच्या रकमा व राज्य कामगार विमा योजनेची वर्गणी भरल्याबाबतचा पुरावा सदर अधिसूचना निर्गमित झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत सादर करावा. अन्यथा संबंधित सुरक्षा रक्षकांना देण्यात आलेली सूट रद्द करण्यात येईल.
(४) सर्व संबंंधित सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांनी सर्व विवरणपत्रे व प्रपत्रे नियमितपणे व अचूक प्राप्त होत आहेत किंवा नाही याची खात्री करावी जर असे होत नसेल तर अटीनुसार संबंधितांविरुद्ध त्वरित आवश्यक कारवाई करण्यात यावी.
(क) वर्ाषिक विवरणपत्र.-----प्रत्येक मालक एजन्सीने, सनदी लेखापाल यांनी प्रमाणित केलेले वर्ाषिक विवरणपत्र सोबत जोडलेल्या नमुना '' ड '' मध्ये दरवर्षी ३० जूनपयर्ंत मंडळास सादर करावे, ज्यात एजन्सीने भरलेला आयकर, सुरक्षा रक्षकांचा जमा केलेला भविष्यनिर्वाह निधी व कामगार राज्य विमा याबाबतच्या चलनाच्या प्रती व इतर तपशील असेल.
८. एजन्सीची व सूटप्राप्त सुरक्षा रक्षकांची मंडळाकडे नोंदणी.------ अधिसूचनेच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत उक्त मंडळाकडे महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ च्या खंड १३(२) व १४(३) मधील तरतुदींनुसार एजन्सीजने स्वत:ची मालक म्हणून आणि त्यांच्याकडील सूटप्राप्त सुरक्षा रक्षकांची विहित नमुन्यातील अर्ज व शुल्क भरून मंडळात नोंदणी करून घ्यावी.
९. एजन्सीच्या मुख्य मालकांची मंडऴाकडे नोंदणी.------सूटप्राप्त सुरक्षा रक्षकांच्या एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक नियुक्त करणा-या मुख्य मालकाने अधिसूचनेच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत योजनेच्या खंड १३(१)(अ) अन्वये स्वत:ची मंडळात विहित नमुन्यातील अर्ज व शुल्क भरून नोंदणी करून घ्यावी.
१०. नोंदणी शुल्क.------ एजन्सीने तसेच सूटप्राप्त सुरक्षा रक्षकाने मंडळाकडे नोंदणी करतेवेळी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना, २००२ च्या खंड १७ मधील तरतुदींनुसार मंडळाकडे विहित कालावधीत आवश्यक ते नोंदणी शुल्क भरले पाहिजे.
११. नोंदणीकृत कार्यालय.-----एजन्सीचे नोंदणीकृत कार्यालय असावे आणि त्याबाबतची माहिती एजन्सीने शासन, कामगार आयुक्त व मंडळास द्यावी. नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता बदलल्यास अथवा एजन्सीच्या नावात बदल झाल्यास, १५ दिवसांचे आत बदलाबाबतच्या आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यासह शासनास व मंडळास कळवावे, जेणेकरून शासन सुधारित अधिसूचना जारी करील. सुधारित अधिसूचना जारी झाल्यानंतर मंडळ झालेल्या बदलांची नोंद घेईल.
१२. सुरक्षा रक्षकांची नियुक्ती.----उक्त मंडळाकडे ज्या मुख्य मालकांची नोंदणी झाली आहे आणि/किंवा जे उक्त मुख्य मालक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांच्या सेवेचा लाभ घेत आहेत, अशा मुख्य मालकांकडे एजन्सी त्यांचेकडील सुरक्षा रक्षक नेमणार नाही. अशाप्रकारे सुरक्षा रक्षक नेमल्यास मालक एजन्सीला जबाबदार धरून दिलेली सूट रद्द करण्यात येईल.
१३. ओळखपत्र व हजेरी कार्ड देणे.----खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी त्यांचेकडील सुरक्षा रक्षकांना व अधिका-यांना नियुक्त केल्यापासून ३० दिवसांच्या आत ओळखपत्र व हजेरी कार्ड देईल.
१४. कायदेशीर देणी अदा करणे.----सुरक्षा रक्षक ज्यावेळी एजन्सीची नोकरी सोडतील, त्यावेळी त्यांना देय असलेली सर्व कायदेशीर देणी (उपदान व इतर कायदेशीर देणी) एजन्सीने अदा करून त्याबाबत झालेल्या व्यवहारांच्या प्रती मंडळाकडे सादर करणे एजन्सीला बंधनकारक राहील.
१५. एकावेळी एकाच मुख्य मालकाकडे नोकरी.--- सुरक्षा रक्षक एकावेळी एकापेक्षा अधिक मुख्य मालकाकडे काम करणार नाही.
याबाबत प्रत्येक सुरक्षा रक्षक एजन्सीने खात्री करून घेतली पाहिजे.
१६. एखाद्या सुरक्षा रक्षकास त्याच्या निवासस्थानापासून ५० कि.मी.पेक्षा अधिक अंतरावर काम करण्यासाठी पाठविल्यास मालक एजन्सीने त्याच्या एकूण वेतनाच्या २० टक्के रक्कम त्याला भत्ता म्हणून द्यावी.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१ ५१७. सुरक्षा रक्षकांच्या फायद्यांसंदर्भात शासनाने किंवा मंडळाने भविष्यकाळात घातलेल्या अटी व शतर्ींचे पालन करणे एजन्सीला, तसेच मुख्य मालकाला बंधनकारक राहील.
१८. मालक एजन्सीने मुख्य मालकासोबत केलेल्या कराराच्या दिनांकापासून ते कलम २३ अंतर्गत सूट देण्याच्या अधिसूचनेपयर्ंत व या सुरक्षा रक्षकांना सूट देण्यासंदर्भातील अधिसूचनेमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीपयर्ंत सुरक्षा रक्षकांच्या वेतनाच्या ३ टक्के एवढी लेव्ही दरमहा १० तारखेपयर्ंत मंडळास देय राहील. सदर लेव्ही अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून १ महिन्याच्या आत मंडळाकडे जमा करणे अनिवार्य राहील.
मंडळाने विर्िनदिष्ट केलेल्या कालमर्यादेत लेव्हीची रक्कम भरण्यात जे नियोक्ता अभिकरण कसूर करील ते नियोक्ता अभिकरण मंडळाने भरणा करण्यास निर्धारित केलेल्या रकमेच्या १० टक्के या दराने अधिभार दंडाच्या रूपाने मंडळाकडे भरील.
१९. मालक एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक नियुक्त करणा-या मुख्य मालकाने करार संपुष्टात आल्यानंतर वा इतर कोणत्याही कारणामुळे सुरक्षा रक्षकांची सेवा घेणे बंद केले असल्यास सेवा खंडीत केल्याच्या दिनांकापासून ७ दिवसांच्या आत अशा मुख्य मालकाची व तेथून कमी केलेल्या सुरक्षा रक्षकांची नावे व तपशील मालक एजन्सी मंडळास सादर करील. अशा मुख्य मालकाची अधिसूचनेनुसार घेतलेली मंडळातील नोंदणी रद्द होईल. तसेच मालक एजन्सीकडून नोकरी सोडून गेलेल्या सुरक्षा रक्षकांची नावे व तपशील मालक एजन्सी मंडळास व नजीकच्या पोलीस ठाण्यास ७ दिवसांच्या आत सादर करील. अशाप्रकारे नोकरी सोडून गेलेल्या सुरक्षा रक्षकांची नोंदणी मंडळ रद्द करील.
२०. मुख्य मालकाकडून सुरक्षा रक्षकांच्या कामाच्या मोबदल्यापोटी एजन्सीकडे जमा होणा-या रकमेपैकी, मंडळाने सुरक्षा रक्षकांच्या वेतनापोटी निश्चित केलेली रक्कम तसेच सर्व वैधानिक रकमा जसे भविष्यनिर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, बोनस प्रदान, रजा वेतन, राष्ट्रीय सुट्टयांचे वेतन यासाठी विनियमित केले जाईल निदान इतकी रक्कम किंवा मुख्य मालकाने एजन्सीला अदा केलेल्या रकमेच्या ५६ टक्के इतकी रक्कम किंवा यापैकी जी अधिक असेल ती सुरक्षा रक्षक एजन्सीने सुरक्षा रक्षकांना अदा करणे आवश्यक आहे.
२१. सुरक्षा रक्षकांना साप्ताहिक सुट्टी उपभोगण्याकरिता कार्यमुक्त करणा-या सुरक्षा रक्षकांचे वेतन मुख्य मालक एजन्सीला अदा करील.
हे वेतन यथा प्रमाण पद्धतीवर आधारीत असेल व ही रक्कम मूळ वेतनाच्या १० टक्के अथवा जी अधिक असेल इतकी असेल.
२२. सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जमा करावयाची लेव्ही, सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षणासाठीचा खर्च, देखरेखीवरील खर्च, तसेच एजन्सीचा प्रशासकीय खर्च व नफा या सर्व गोष्टींचा खर्च हा मुख्य मालकाने एजन्सीकडे जमा केलेल्या एकूण रकमेच्या ३० टक्के रकमेपेक्षा जास्त नसावा.
२३. उपरोक्त अनिवार्य लादलेल्या खचर्ोावर नियमानुसार सेवाकर/वस्तू व सेवाकर GST आकारला जाईल व सेवाकर/वस्तू व सेवा कर GST त्या त्या वेळी अंमलात असलेल्या दरानुसार असेल.
२४. या व्यतिरिक्त सुरक्षा रक्षकांना गणवेश दिला जाईल व त्यासाठी ४ टक्के रक्कम दरवर्षी राखीव ठेवण्यात येईल.
२५. सुरक्षा रक्षकांना त्यांचे वेतन पुढील महिन्याच्या सात तारखेपयर्ंत देण्यात यावे.
२६. अधिसूचनेतील आणि सोबत जोडलेल्या अनुसूची २ मधील अटी व शतर्ींचे पालन मालक एजन्सी किंवा मुख्य मालकाकडून स्वेच्छेने होत आहे किंवा नाही, याबाबतची खात्री सुरक्षा रक्षक मंडळाने करणे आवश्यक आहे व पालन करण्यास असमर्थ ठरल्यास, संबंधित मालक एजन्सी किंवा मुख्य मालकाच्या विरुद्ध नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मंडळाची राहील.
२७. प्रस्तुत अधिसूचना ही मालक एजन्सी, मुख्य मालक व संबंधित सुरक्षा रक्षक यांनी सादर केलेली माहिती, कागदपत्रे तसेच संबंधित मंडळाचे अध्यक्ष यांनी केलेल्या शिफारशीवरून निर्गमित करण्यात येत आहे आणि जर सदरची माहिती, कागदपत्रे खोटी किंवा बनावट असल्याचे दिसून आल्यास, संबंधित मालक एजन्सी, मुख्य मालक, सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा रक्षक मंडळ हे या अनुषंगाने निर्माण होणा-या कायदेशीर परिणामांस जबाबदार राहील.
२८. प्रस्तुत अधिसूचना ही संबंधित पोलीस अधिकारी यांनी मालक एजन्सीला खाजगी सुरक्षा एजन्सी, २००५ व त्या अंतर्गत नियमातील तरतुदींनुसार देण्यात आलेला परवाना (पसारा लायसन्स) मधील अटी व शतर्ींचे तंतोतंत पालन होण्याच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे.
२९. वरीलपैकी कोणत्याही अटी व शतर्ींचे मालक एजन्सीने उल्लंघन केल्यास त्यांना सदरहू अधिसूचनेद्वारे देण्यात आलेली सूट रद्द करण्यात येईल किंवा काढून टाकण्यात येईल. तसेच त्यानुषंगाने नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१नमुना " अ "
सुरक्षा रक्षक एजन्सीने सादर करावयाचे त्रैमासिक विवरणपत्र
दिनांक :
महिन्यांचे त्रैमासिक विवरणपत्र : जानेवारी-मार्च, एप्रिल-जून, जुलै-सप्टेंबर, ऑक्टोबर-डिसेंबर एजन्सीचे नाव व पत्ता : अधिसूचना क्रमांक व दिनांक : एजन्सीचा मंडळातील नोंदणी क्रमांक :
अनुक्रमांक मुख्य मालकाचे नाव सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षा रक्षकांचे (१)
व पत्ता (२)
नियुक्तीचे ठिकाण (३)
नाव व वर्ग (४)
प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता,
(नाव व हुद्दा).
नमुना " ब "
सुरक्षा रक्षक एजन्सीने सादर करावयाचे सहामाही विवरणपत्र
दिनांक :
विवरणपत्राचा कालावधी : जानेवारी ते जून/जुलै ते डिसेंबर एजन्सीचे नाव व पत्ता : अधिसूचना क्रमांक व दिनांक : एजन्सीचा मंडळातील नोंदणी क्रमांक :
अनुक्रमांक मुख्य मालकाचे नाव
नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षक नव्याने भरती व पत्ता सुरक्षा रक्षकांची एजन्सी सोडून झालेल्या सुरक्षा
वर्गनिहाय एकूण गेलेल्या सुरक्षा रक्षकांची संख्या रक्षकांची वर्गनिहाय वर्गनिहाय (१) (२)
संख्या संख्या (३) (४) (५)
प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता,
(नाव व हुद्दा).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१ ७नमुना " क "
एजन्सीने वेतन प्रदानाबाबत सुरक्षा रक्षक मंडळास सादर करावयाचे विवरणपत्र
वेतन प्रदानाचा महिना : मुख्य मालकाचे नाव व पत्ता : बँकेचे नाव (शाखा व पत्ता) :
अनुक्रमांक सुरक्षा रक्षकाचे नाव
धनादेश क्रमांक रक्कम
व दिनांक
(१) (२)
(३) (४)
प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता,
(नाव व हुद्दा).
नमुना " ड "
सुरक्षा रक्षक एजन्सीने सादर करावयाचे वर्ाषिक विवरणपत्र
दिनांक :
वर्ाषिक विवरणपत्राचे र्आथिक वर्ष : एजन्सीचे नाव व पत्ता : अधिसूचना क्रमांक व दिनांक : एजन्सीचा मंडळातील नोंदणी क्रमांक :
अनुक्रमांक महिने नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकांना भविष्यनिर्वाह मंडळाकडे जमा (एप्रिल ते सुरक्षा रक्षकांची अदा केलेले निधी ज्यावर केलेली ३ टक्के मार्च) संख्या एकूण वेतन कपात केली आहे लेव्ही रक्कम
असे वेतन
(१) (२) (३) (४) (५) (६)
प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता,
(नाव व हुद्दा).
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय काळभोर, कार्यासन अधिकारी.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१In pursuance of clause (3) of Articles 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. SGA. 2019/ C.R.398/LAB-5, dated the 6th January 2020 is hereby published under the authority of the Governor.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. SHRIKANT L. PULKUNDWAR,
Deputy Secretary (Labour) to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 6th January 2020.
NOTIFICATION
MAHARASHTRA PRIVATE SECURITY GUARDS (REGULATION OF EMPLOYMENT AND WELFARE) ACT, 1981.
No. SGA. 2019/C.R. 398/LAB-5.— Whereas, certain Security Guards, whose names are mentioned in column (2) of Schedule-I appended hereto (hereinafter referred to as " the said Security Guards "), employed at Solapur District with the One Principal Employer mentioned in Column (4) of the said Schedule- I, employed by M/s. Modern Veer Rays Security Force (India) Pvt. Ltd., 6th Floor, Atlanta Centre, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai 400 063, owner Shri Gyan Prakash Shrinath Singh, have applied for grant of exemption, under section 23 of the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981 (Mah. LVIII of 1981), from the operation of all provisions of the said Act and the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Scheme, 2002 (hereinafter referred to as " the said Scheme ") ;
And whereas, the Government of Maharashtra, after consultation with the Advisory Committee and as per the recommendation of the concerned Security Guard Board, is of the opinion that the enjoyment of benefits by the Security Guard which are on the whole not less favourable to them than the benefits provided by and under the said Act and the said Scheme ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by section 23 of the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981, the Government of Maharashtra hereby exempts the said Security Guards from operations of all provisions of the said Act and the said Scheme, from the date of agreement between the Employer Agency and the Principal Employer till the date of publication of this notification in the Official Gazette and further for a period of 3 years from the date of publication of this notification in the Official Gazette, subject to conditions specified in Schedule-II appended hereto.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१ ९Schedule-I
Sr. Name of Class Name and Address of No. Security Guards
Principal Employer (1) (2)
(3)
(4)
1 Mohd. Sharif Ahmedja Sayyed Security Guard Axis Bank Limited, Branch Tal-
Sangola, Dist. Solapur.
2 Amol Lakshman Tikonde Security Guard Axis Bank Limited, Branch Hotagi
Road, Solapur, Dist. Solapur.
3 Audumbar Malkari Kamble Security Guard Axis Bank Limited, Branch
Vijapur Road, Solapur, Dist.
Solapur.
4 Sudhir Jagdev Randive Security Guard Axis Bank Limited, Branch
Dafrin Chowk, Dist. Solapur.
Note.—Government of Maharashtra does not take any guarantee of any sort as regards to the Security Guards. Principal Employers can employ these Private Security Guards at their own risk.
भाग एक--ल-----२-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१
Schedule-II
Conditions to be followed by the Employer Agency and Principal Employer 1. Police Verification.—Police Verification Certificates regarding antecedent of the guards as well as the Employer Agency of such guard is necessary as per the Licence provided under the Private Security Agency (Regulation) Act, 2005 is compulsory alongwith the compliance of all terms and conditions of this Licence on the part of Employer Agency.
2. Training.—Adequate training shall be imparted to the Security Guards before they are deployed as Private Security Agency (Regulation) Act, 2005 (PASARA, 2005.)
3. Educational Qualifications, Physical Fitness and Other Requirements.—Educational Qualification, Physical Fitness standard and other requirements for the Security Guards shall be as follows :—
Minimum Educational Qualification : 8th Standard Passed.
Physical Requirements.— (A) (1) Height — 162 c.m.
(2) Weight — 50 kg.
(3) Chest — 79 c.m. (Without Expansion) and
84 c.m. (On Expansion).
(4) Sight — If wearing glasses, the glass should not have excess
number.
(B) In case of tribal candidates, there will relaxation of 5 c.m. in
height and 2 c.m. in chest.
4. Benefits.—Benefits for Security Guards shall be as follows :—
(a) Uniform : Two pairs in a year.
(b) Shoes : One pair of leather shoes in a year.
(c) Rainy and Winter Uniform : (Once in two years) Raincoat, Trousers and Cap, Woollen Coat and Pant.
5. Wages and Other Statutory Benefits.—Exempted Security Guard shall open his account in a Nationalised Bank and Employer Agency shall make the Payment of Salary directly to his Bank Account, or shall give Account Payee Cheque to each Security Guard equivalent to his earned wages by 7th of every month.
Statement showing details of wages paid in Form "C" shall be submitted to the Security Guards Board by 10th of every month.
The Agency shall give the following benefits to the Security Guards :—
Ex-Gratia : 10% of wages
Gratuity : 4% of wages
Leave with wages : 6% of wages
Paid Holidays : 1% of wages.
Contribution to be deposited with the Competent Authorities in respect of various statues such as Provident Fund, E.S.I. etc. applicable to the Principal Employer, shall be deposited by the Agency with such authority and challan thereof be submitted to the Board for information. The Security Guards Agency should give regular receipt to the Guard and submit a consolidated report of the abovesaid transactions to the Concerned the Security Guards Board every six months. In case of default, the Agency shall be held responsible and shall be liable for cancellation of exemption.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१ ११6. Overtime Allowance.—Overtime Allowance should not be less than double the rates of wages existing at that time to the Security Guards deployed by the Security Guards Board. The ultimate responsibility in this respect lies on the concerned Principal Employer. It is the responsibility of the Principal Employer to pay wages and provide benefits to the Security Guards. The Principal Employer, in turn, shall ensure that the guards deployed at his establishment are getting wages and benefits not less favourable than those available under the Scheme.
7. Filling of Returns—(a) Quarterly Return.—Agency to submit quarterly return to the concerned Security Guard. Board in the first week of first month of the quarter (January, April, July and October) in respect of employment of Security Guards in Form " A " appended hereto.
(b) Half Yearly Return.—(1) Half Yearly Return in Form " B " appended hereto shall be submitted by the Agency in respect of Guards engaged, who have left and newly recruited to the concerned Security Guard Board.
(2) The Security Guard Agency should make regular contribution of Employees' Provident Fund and ESIC of the concerned Security Guards and give regular Receipts to the Security Guard and submit a consolidated report of the abovesaid transaction to the concerned Security Guards Board every six months.
(3) The Security Guard Agency should submit proof of the previous contributions of Employees' Provident Fund and ESIC within a period of three months from the date of publication of this Notification to the concerned Security Guard Board. Otherwise, the exemption given to the concerned Security Guards will be cancelled.
(4) All concerned Chairman of the Security Guard Board shall ensured that all above returns and statements are regularly received or not and also ensure the correctness of it. If it is not as per the conditions the appropriate action shall be taken immediately.
(c) Annual Return.—Every Agency shall submit at Annual Return of Income Tax, P.F., E.S.I. duly certified by Chartered Accountant, in Form-D on or before the 30th of June of every year to the concerned Security Guard Board, alongwith copies of challans and other details.
8. Enrolment of the Agency with the Board.—The Agency should get itself enrolled with the Board according to the provisions of Clause 13(2) of the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Scheme, 2002, as an employer agency and shall register exempted Security Guards under Clause 14(3) of the Scheme applying in the Form devised by the Board by paying prescribed registration fee within a period of one month from the date of issuance of this Notification.
9. Registration of Principal Employer of Employer Agency.—The Principal Employer who is engaging exempted Security Guards of the Agency shall get registered with the Board as provided under Clause 13(1)(a) of the Scheme within 15 days from date of exempted Notification, applying in the Form devised by the Board by paying prescribed registration fee.
10. Enrolment fees.—While getting itself registered with the Board, the Agency should pay Registration Fee to the Board as per Clause 17 of the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Scheme, 2002 within stipulated time.
11. Registered Office.—Every Agency shall have registered office which shall be notified to the Government, Commissioner of Labour and the Board. In case of change in address or change in names the same shall be informed to the Government and to the Board alongwith documentary proof thereof within a period of 15 days from such change, so as to issue revised Notification by the Government in respect thereof. Board shall take note of such changes after issuance of the Notification.
भाग एक--ल-----२-२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१ 12. Allotment of Guards.—The Agency shall not allot their Security Guards to such Principal Employers who are registered with the Board. If agency deploys its Security Guards to such Principal Employer in that case exemption will be cancelled.
13. Issue of Identity Cards/Attendance Card.—Every Agency shall issue identity card, attendance card to Security Guards and Officers engaged and deployed by them.
14. Payment of Legal Dues.—Whenever a Security Guard leaves his job, it is obligatory on the part of the agency to pay all the legal dues to him and copy of the records thereof shall be submitted to the Board including gratuity and other legal dues.
15. Employment with one Principal Employer at a time.—Every Agency shall also ensure that its Security Guards shall not work for more than one Principal Employer at a time.
16. If any Security Guard is asked to work beyond the radius of 50 kms. from his place of residence, the Employer Agency shall pay an allowance @ 20% of total emoluments payable to such Security Guard.
17. The Agency and Principal Employer is liable to abide with any other terms and conditions, which may be imposed in favour of Security Guard by the Government of Maharashtra or Board in future.
18. The exempted Security Guard Agency should pay levy @ 3% to the Board per month on the wages paid to the Security Guards from the date of agreement made by Agency with the principal employer till the date of issuing notification under section 23 and till the period mentioned in the exemption notification.
The exempted Security Guard Agency should pay levy @ 3%. to the Board per month on wages paid to the Security Guards on or before 10th of every month. The agency should start paying such levy within the period of 1 month from the date of exemption Notification.
The employer agency who makes default in remitting the amount of 3% levy within the time limit specified as above, shall further pay by way of penalty, surcharge @ 10% of the amount to be remitted.
19. In case, the Principal Employer discontinues the exempted Security Guards due to expiry of agreement or due to any reason, in that case, the agency shall submit the details of such Principal Employers and the Security Guards to the Board within 7 days from such discontinuation. In such case the registration of the said Principal Employer shall stand cancelled. The agency shall also submit the details of Security Guards who have left the services due to any reason alongwith details of the Principal Employers to the Board and concerned Police Station within 7 (Seven) days. On receipt of the above details Board will cancel the registration of such exempted guards.
20. From the amount of the payment made by the Principal Employer to the Security Agency, the Security Guards will be paid at least an amount which has been fixed by the Board towards the wages and all the statutory benefits towards Provident Fund, E.S.I.C., Payment of Bonus, leave with wages, leave on national holidays etc. or the same shall be the amount equivalent to 56% of the gross payment made by the Principal Employer to the Security Agency, whichever is higher.
21. The Principal Employer will pay to the agency on a prorata basis for the reliever who would be relieving the Security Guard in case of his weekly off or the amount paid to the reliever shall be 10 % of the basic wages, or whichever is higher.
22. The amount of levy to be deposited to the Security Guards Board, the cost of Training of the Security Guards, the cost of supervision, administration and profits of the agency the total cost of which will not exceed more than 30 % of the total amount paid by the Principal Employer to the agency.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१ १३23. The Service Tax/GST will be levied on the total mandatory cost mentioned hereinabove at the rate which is in force at any given point of time.
24. In addition to this uniform will be provided to the Security Guards. For this purpose an amount of 4 per cent. per annum should be delineate.
25. Wages of the Security Guards will be paid not later than 7th of every next month.
26. It shall also be the responsibility of the Security Guard Board to ensure that whether all these terms and conditions mentioned in the notification and scheduled-II attach with are followed scrupulously or not by the Agency or the Principal Employer as the case may be and failure to which appropriate action should be taken against the concerned as per rules.
27. This notification is issued on the basis of documents, records submitted by the Agency Owner, Principal Employer, Security Guards and Recommendation of the Chairman of concerned Security Guards Board and if it is found that this information, Documents are false or forged the concerned Agency Owner, Principal Employer, Security Guard and the Security Guard Board will be held responsible for any legal consequences arises in future in this regard.
28. This notification is issued subject to the conditions that all the terms and conditions of the licence issued by the concerned police authority under the provision of Private Security Agencies (Regulation) Act, 2005 (PASARA) and rules thereunder are compiled scrupulously.
29. Breach of any of above conditions by the employer agency shall make employer agency liable for cancellation or revocation of the exemption granted under this notification and subsequent action as per rules.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१FORM ' A '
Quarterly Return to be filed by the Agency
Quarterly Return for the months Date :
(January-March
April-June
July-September
October-December) :
Name and Address of the Agency :
Notification No. and Date :
Registration No. of Agency with the Board :
Serial Number and Address of Location of Security Name and Number the Principal Employer Guards deployed Category (1)
(2)
(3)
of the Guards (4)
Authorised Signatory,
(Name and Designation).
FORM ' B '
Half Yearly Return to be submitted by Security Guards Agency
Period of Return : January to June/ Date :
July to December :
Name and Address of the Agency :
Notification No. and Date :
Registration No. of Agency with the Board :
Serial Name and Total No. of No. of Number of No. Address of Security Guards Security Guards Security Guards Principal Employer Engaged who have left Newly Recruited (1) (2)
Categorywise the Security Categorywise Guards Agency Categorywise (4)
(3)
(5)
Authorised Signatory,
(Name and Designation).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१ १५FORM ' C '
Statement to be submitted to the Security Guards Board regarding disbursement of wages.
Disbursement of wages for the month of :
Name and Address of the Principal Employer :
Name of the Bank (Branch and Address) :
Amount Serial Name of the No. and Date of No. Security Guard the Cheque (1)
(2)
(3)
(4)
Authorised Signatory,
(Name and Designation).
FORM ' D '
Annual Return to be submitted by Security Guards Agency
Period of Annual Return :
Date :
Name and Address of the Agency :
Notification No. and Date :
Registration No. of Agency with the Board :
Serial Months Total No. of Total Wages The Wages on 3% Levy No. (April to March) Security Guard Paid to the which the P.F. Submitted to Engaged Security Guard Contribution the Board
is Deducted
(1) (2) (3) (4) (5) (6)
Authorised Signatory,
(Name and Designation).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY KALBHOR,
Section Officer.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.