महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ६, अंक २] शनिवार, जानेवारी ११, २०२०/पौष २१, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
नाशिक महानगरपालिका, नाशिक
पोट-निवडणूक--२०१९
अधिसूचना
क्रमांक मनपा/निवडणूक/०६/२०२०
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ ' अ ' आणि २६ ' अ ' या जागेवर प्रत्येकी एकच उमेदवार निवडून द्यावयाचा असून सदर जागेसाठी महानगरपालिकेची पोट-निवडणूक दिनांक ९ जानेवारी २०२० रोजी घेण्यात आली. तसेच मतदान घेतलेल्या प्रभाग २२ ' अ ' आणि २६ ' अ ' ची मतमोजणी दिनांक १० जानेवारी २०२० रोजी होऊन महानगरपालिका सदस्य मताधिक्याने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे अनुसूची ' ड ' प्रकरण-१, निवडणूक नियम ३९(२) व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/मनपा-२०१९/प्र.क्र. ९/का. ५, दिनांक ९ डिसेंबर २०१९ नुसार निवडून आलेल्या महानगरपालिका सदस्यांची नावे, राहण्याचे ठिकाण (पत्ते) व पक्ष याबाबतची माहिती मी, राधाकृष्ण वि. गमे, आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक या अधिसूचनेद्वारे खालीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे :---
प्रभाग क्रमांक जागा क्रमांक निर्वाचित सदस्याचे नाव पत्ता (१) (२) (३) (४)
पक्ष (५) २२ २२ ' अ ' पवार जगदीश शंकर पोस्ट पिंपळगाव खांब, ता. जि. नाशिक नॅशनॅलिस्ट काँॅग्रेस पार्टी २६ २६ ' अ ' जाधव मधुकर भागीरथ गट नं. ९९ + १०० डी/१,
शिवसेना
जाधव टाऊनशिप, सातपूर अंबड, नाशिक ४२२ ०१०.
नाशिक, दिनांक ११ जानेवारी २०२०.
रा. वि. गमे, आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.