RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक ३] मंगळवार, जानेवारी १४, २०२०/पौष २४, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून
अधिसूचना
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.
प्रकरण क्रमांक उपजिभूक्र. ४/भूसं/एलएक्यू/एसआर-२७२/मुउंजि/२०१८.----भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश ''उक्त अधिनियम '' असा केला आहे.) च्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून क्रमांक उपजिभूक्र. ४/भूसं/एलएक्यू/एसआर-२७२/ मुंउजि/२०१८, दिनांक १८ जून, २०१९ (एलएक्यू/एसआर-२७२) अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीच्या अनुसूची मध्ये (जमिनीचे वर्णन) अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या '' ३५.०० मी. रुंद विहित रस्ता '' या सार्वजनिक प्रयोजनासाठी (यापुढे ज्याचा उल्लेख '' उक्त सार्वजनिक प्रयोजन '' असा केला आहे.) आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
ज्याअर्थी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (यापुढे ज्याचा उल्लेख ''उक्त संपादन संस्था '' असा केला आहे.) प्रस्तावित केलेल्या व उक्त अधिनियमाच्या कलम ११(१) अन्वये अधिसूचित केलेल्या ३०३.०० चौ.मी. या क्षेत्राचे उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन करण्याचे कळविले आहे ;
ज्याअर्थी, मौजे गोरेगाव (प.), तालुका बोरीवली येथील ३०३.०० चौ. मी. क्षेत्र असलेली न.भू.क्र. ६०/६ (भाग) ही जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक असल्याबाबतची जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांची खात्री झाली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाचे कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, संपादनाखाली जमिनीवरील सदर विहित रस्ता रेषेप्रमाणे रस्ता विकसित होऊन सदर रस्त्यावर मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे उक्त संपादन संस्थेने कळविले आहे ;
(१)
भाग एक (को.वि.पु.)—३--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १४, २०२०/पौष २४, शके १९४१ त्याअर्थी, शासनाने प्रदान केलेल्या शक्तीनुसार आणि अधिनियम, २०१३ च्या कलम १९ च्या पोट-कलम (१) अन्वये मा. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा असे घोषित करतात की, गोरेगाव (पू.), तालुका बोरीवली येथील ३०३.०० चौ.मी. क्षेत्र असलेली न.भू.क्र. ६०/६ (भाग) जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे आणि उक्त अधिनियम, २०१३ च्या कलम ३ खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. ४, मुंबई उपनगर जिल्हा, प्रशासकीय इमारत, ९ वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांना पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची
मौजे गोरेगाव
तालुका बोरीवली
जिल्हा मुंबई उपनगर
अ. क्र.
न.भू.क्र. संपादनाखालील जमिनीचे अंदाजित क्षेत्र चौ.मी.
(१)
(२)
(३)
१ ६०/६ (भाग) ३०३.००
सार्वजनिक प्रयोजन .--- '' ३५.०० मी. रुंद विहित रस्ता '' या प्रयोजनासाठी भूसंपादन.
मिलिंद बोरीकर,
मुंबई, दिनांक १० जानेवारी २०२०.
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा.
,महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १४, २०२०/पौष २४, शके १९४१ ३
BY THE COLLECTOR, MUMBAI SUBURBAN DISTRICT
NOTIFICATION
RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARANCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.
Whereas, Case No. DCLA4/L.A./LAQ/SR-272/M.S.D./2018.—Under the Right to Fair Compensation and Transparancy in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), (hereinafter referred to as " the said Acquisition Act ") the notification under section 11 sub-section (1) was notified No. D.C.L.A.4/L.A/LAQ/SR-272/M.S.D./2018 (LAQ/Sr-272) on 18th June 2019, that the land described in schedule hereto (Details of land) are needed or likely to be needed for the public purpose of " 35 Meters prescribed Road Line " (hereinafter referred as " the said Public Purpose ") ;
Whereas, 303.00 sq. mt. area proposed by Municipal Corporation of Greater Mumbai (hereinafter referred to as " the said acquiring body ") and notified under section 11 (1) of the said act now the said acquiring body has intimated to acquire ;
Whereas, the Collector, Mumbai Suburban District is satisfied that land bearing C.T.S, No. 60/6 (pt) admeasuring area 303.00 sq. mt. of Village Goregaon (W.), Taluka Borivali is needed for the said public purpose and therefore under section 19 (1) of the said Acquisition Act declares that the land is needed for said public purpose ;
And Whereas, as per said Road Line road has been developed and construction of Mrunaltai Gore Flyover is completed now as informed by said acquiring body ;
Therefore, in exercise of the delegated powers under sub-section (1) of section 19 of the said Land Acquisition Act, 2013. The Collector, Mumbai Suburban District, hereby declares that the land bearing C.T.S. No. 60/6 (pt) admeasuring area 303.00 sq. mt. of Village Malad, Taluka Borivali is needed for the said public purpose and under clause (g) of section 3 of the said Acquisition Act, 2013, the Collector being the appropriate Government is pleased to designate Dy. Collector (Land Acquisition) No. 4, Mumbai Suburban District, Administrative Building, 9th Floor, Government Colony, Bandra (East), Mumbai 400 051 to perform the functions of a Collector under the said Act.
Schedule
Village Goregaon, Taluka Borivali, District Mumbai Suburban
Sr. No. C.T.S. No. Approximate Area of Required Land (Sq. Mt.) (1)
(2)
(3)
1. 60/6 (pt.)
303.00
Public Purpose : Acquisition for the purpose of " 35 Meters Prescribed Road Line ".
MILIND BORIKAR,
Mumbai,
Collector,
Dated 10th January 2020.
Mumbai Suburban District. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.