Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A KDS Weekly (16th Jan. to 22nd Jan. 2020)

Published 16 January 2020

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-16.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २०-२६, २०१८/अग्रहायण २९-पौष ५, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/39966

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक २] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६--२२, २०२०/पौष २६-माघ २, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

रत्नागिरी नगरपरिषद, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक रनप/आस्था/५२६/५०२३.----- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग ४, दिनांक १३ मार्च २०१२ मध्ये प्रसिद्ध केल्यानुसार सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२ मध्ये अंमलबजावणीसाठी व अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणणेसाठी मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेच्या बाबतीत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२ (३) नुसार संबंधित अधिकायास त्याच कार्यक्षेत्राकरिता " पदनिर्देशित अधिकारी " म्हणून अधिसूचित करणेची तरतूद करण्यात आलेली आहे ;

त्याअर्थी, आता महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२(३) मधील तरतुदीनुसार नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून मला प्राप्त झालेल्या अधिकारात मी, रत्नागिरी नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रासाठी रत्नागिरी नगरपरिषदेत कार्यरत असलेले खालील कर्मचारी यांना अनधिकृत बांधकामावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व अधिनियमातील कलम ५५ व ५६ मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून घोषित करीत आहे :----

अनुक्रमांक (१)

पदनिर्देशित अधिकारी (२)

सहा. पदनिर्देशित अधिकारी (३)

१ श्री. संतोष रमेश जाधव श्री. संतोष रामचंद्र कदम

रचना सहायक (गट ब)

लिपीक/टंकलेखक

२ श्री. यतीराज तुकाराम जाधव श्री. आनंदा नानासाो थोरात

पर्यवेक्षक (स्थापत्य) श्रेणी क.

मेस्त्री

रत्नागिरी, दिनांक ८ जानेवारी २०२०.

प्रशांत ठोंबरे, मुख्यधिकारी, रत्नागिरी, नगरपरिषद.

(१) भाग एक--अ (को.वि.पु.)--१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-16.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-16.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.