Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I(KDS) Extra No.5 (21st-01-2020) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून (प्रकरण क्रमांक उपजिभूक्र.7/भूसं/एलएक्यू-842-ए/मुंउजि/2019

Published 21 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-21.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २१, २०२०/माघ १, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/36619 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी वर्ष ६, अंक ५] मंगळवार, जानेवारी २१, २०२०/माघ १, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ५

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून

अधिसूचना

प्रकरण क्रमांक उपजिभूक्र.७/भूसं/एलएक्यू-८४२-ए/मुंउजि/२०१९.---- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यच्या जिल्हाधिका-याने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा केला आहे.) च्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून क्रमांक उपजिभूक्र.७/भूसं/एलएक्यू-८४२-ए/मुंउजि/२०१९, दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ (एलएक्यू-८४२-ए) अन्वये प्रारंभिक अधिसूचना (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा केला आहे) काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

ज्याअर्थी, मुंबई उपनगर जिल्हाधिका-याने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी सोनाली मुळे, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. ७, मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा, प्रतापगड को-ऑ.हौ.सो., विनायक अपार्टमेंट, हाफकिन इन्स्िटटयूूटसमोर, १ मजला, परेल व्हिलेज, मुंबई-१२ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची एक

मौजे विक्रोळी, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर

न.भू.क्र. आवश्यक जमिनीचे क्षेत्र (चौ.मी.) अ.क्र. (१) (२)

(३)

१ ५१ अ १५१४९.६०

२ १ अ २४१०२.४०

एकूण ३९२५२.००

सार्वजनिक प्रयोजन.--- " मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्प " करिता भूसंपादन.

मुंबई, दिनांक १७ जानेवारी २०२०.

मिलिंद बोरीकर, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा.

भाग एक (को.वि.पु.)—५

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २१, २०२०/माघ १, शके १९४१

अनुसूची दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

सार्वजनिक प्रयोजन : " मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्प " या सार्वजनिक प्रयोजनाकरिता भूसंपादन.

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन : रेल्वे मंत्रालय, भारत सरकार यांनी भारतीय रेल्वे योजना २०२० तयार केली आहे आणि त्या योजनेचा दस्ताऐवज डिसेंबर, २००९ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. सदर प्रकल्प जपान सरकारच्या सहाय्याने कार्यान्वित करावयाचा आहे. प्रकल्पाची एकूण लांबी ही ५०८.१७ किमी असून त्यापैकी १५५.६४२ किमी लांब इतका रेल्वेमार्ग महाराष्ट्र राज्यामधून (बोगद्यातून २७ किमी व उर्वरित भाग उन्नत मार्ग) जातो. महाराष्ट्र राज्यातील या अंतरामध्ये चार स्थानके (बांद्रा-कुर्ला संकुल, ठाणे, विरार व बोईसर) नियोजित केले आहेत. रेल्वे चालनाचा वेग प्रति तास ३२० किमी इतका असेल.

समाजाला होणारा लाभ : मुंबई-अहमदाबाद द्रुतगती रेल्वे प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास जलदगतीने करणे शक्य होणार आहे.

मुंबई, दिनांक १७ जानेवारी २०२०.

मिलिंद बोरीकर, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २१, २०२०/माघ १, शके १९४१ ३

BY THE COLLECTOR, MUMBAI SUBURBAN DISTRICT

NOTIFICATION

No.DCLA'7/L.A./LAQ842-A/M.S.D./2019.—Whereas, the Collector of Mumbai Suburban District being an appropriate Government has, vide Notification, No. DCLA'7/L.A./LAQ842-A/M.S.D./2019 (LAQ 842-A), dated the 25th October 2019, (hereinafter referred to as " the said notification ") issued a Preliminary Notification in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 11 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), (hereinafter " the said Act ") and thereby notified that the land more particularly described in Schedule I appended hereto is required or likely to be required for a public purpose more particularly specified in Schedule II ;

Whereas, the Collector Mumbai Suburban District is satisfied, after considering the report, if any, made under sub-section (2) of section 15, that the said land is needed to be acquired for the said public purpose; and therefore it is hereby declared under the provisions of sub-section (1) of section 19 of the said Act, that the said land is needed for said public purpose ;

And, therefore, under clause (g) of section 3 of the said Act, the Collector being the appropriate Government is pleased to designate Sonali Muley, Dy. Collector (Land Acquisition) No. 7, Mumbai and Mumbai Suburban District, Pratapgarh Co. Op. Hou. Soci., Vinayak Apartment, Opp. Haffkine Institute, 1st Floor, Parel Village, Mumbai 400 012 to perform the functions of a Collector under the said Act.

SCHEDULE-I

Description of land to be acquired

Village Vikhroli, Taluka Kurla, District Mumbai Suburban

Sr. No. C.T.S. No. Area of Required Land (Sq.Mtr.) (1)

(2)

(3)

1 51 A 15149.60

2 1 A 24102.40

Total 39252.00

Public Purpose.—Acquisition for the purpose of " Mumbai-Ahmedabad High Speed Rail Project ".

MILIND BORIKAR, Place : Mumbai, dated 17th January 2020.

Collector, Mumbai Suburban District.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २१, २०२०/माघ १, शके १९४१

SCHEDULE-II

Description of the Project

Public Purpose : Acquisition for the purpose of " Mumbai-Ahmedabad High Speed

Rail Project " .

Description of Project : Ministry of Railway, Government of India formulated " Indian Railway

Vision 2020 " and published vision document in December 2009.

The Project is to be implemented with assistance of Government of

Japan. The total length of project is 508.17 Km out of which

155.642 Km is passing through State of Maharashtra (27 Km in Tunnel

and rest part is elevated). There are four stations planned (Bandra-Kurla

Complex, Thane, Virar and Boisar) in the State of Maharashtra. The

operational speed of train will be 320 Km per hour.

Benefits to the Society : Mumbai-Ahmedabad High Speed Rail Project enables to expedite the

journey from Mumbai to Ahmedabad.

Mumbai,

MILIND BORIKAR, dated 17th January 2020.

Collector,

Mumbai Suburban District. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-21.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-21.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.