महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ६, अंक ५] बुधवार, जानेवारी २२, २०२०/माघ २, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ८
प्राधिकृत प्रकाशन
नगररचना परियोजना नैना क्र. ३ (चिपळे, कोप्रोली, विहीघर, नेरे, नेरेपाडा, मोहो)
यांचे कार्यालय
जाहीर सूचना
(महाराष्ट्र नगररचना परियोजना नियम, १९७४ च्या नियम क्र. १३ अन्वये)
क्रमांक लवाद/नरयो-३/सर्वसाधारण/२०२०/३५२
प्रारुप नगररचना परियोजना नैना क्र. ३ (चिपळे, कोप्रोली, विहीघर, नेरे, नेरेपाडा, मोहो) ही उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको, यांनी नगरविकास विभाग, अधिसूचना क्र. टीपीएस/१८१७/९७३/प्र. क्र.१०३/१७/नवि-१३, दिनांक १३ सप्टेंबर २०१७ अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६८ च्या पोट-कलम (२) अन्वये त्यांची अधिसूचना क्र. सिडको/नैना/टीपीएस-३/प्रा.यो./२०१९/१२९९/SAP/११४४, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ प्रमाणे मंजूर केली आहे. उक्त अधिसूचना ही महाराष्ट्र शासन राजपत्रात असाधारण भाग-२ मध्ये दिनांक १ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध झालेली आहे.
त्याप्रमाणे शासनाच्या नगरविकास विभागाने श्री. सु. व. सुर्वे, निवृत्त उप संचालक, नगररचना यांची नेमणूक उक्त अधिनियमांच्या पोट-कलम (१) कलम ७२ प्रमाणे उक्त मंजूर प्रारुप परियोजनेसाठी लवाद म्हणून अधिसूचना क्र. टीपीएस-१२१९/१५२४/प्र.क्र.६४/१९/नवि-१२,दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ अन्वये केली आहे.
म्हणून महाराष्ट्र नगररचना परियोजना नियम क्र. १९७४ च्या नियम क्र. १३ प्रमाणे या सूचनेद्वारे मी निम्नस्वाक्षरीकार जाहीर करतो की, नगररचना परियोजना नैना क्र. ३ (चिपळे, कोप्रोली, विहीघर, नेरे, नेरेपाडा, मोहो) करीता लवाद म्हणून दिनांक ८ जानेवारी २०२० पासून कर्तव्ये पार पाडण्याचे काम सुरु केले आहे.
या नगररचना परियोजनेत समाविष्ट झालेल्या सर्व जमीनधारकांना उक्त मंजूर नगररचना परियोजनेच्या प्रस्तावासंबंधी सूचना किंवा हरकती सादर करण्यासाठी योग्य वेळी नमुना क्र. ४ मध्ये सूचना बजावण्यात येईल.
जे जमीनधारक किंवा परियोजनेत समाविष्ट झालेल्या जागांमध्ये हितसंबंध असलेल्या व्यक्ती उक्त परियोजना तयार केल्यामुळे अपायकारकरित्या बाधित झालेले असतील त्यांना कळविणेत येते की ते उक्त, अधिनियमांच्या कलम १०२ प्रमाणे नुकसानभरपाई मिळण्यासाठी निम्नस्वाक्षरीकार यांचेसमोर ही जाहीर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ६० दिवसांचे मुदतीपयर्ंत दावे सादर करणेस पात्र राहतील.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जानेवारी २२, २०२०/माघ २, शके १९४१ OFFICE OF THE ARBITRATOR, TOWN PLANNING SCHEME, NAINA No. 3 (Chipale, Koproli, Vihighar, Nere, Nerepada, Moho)Public Notice
(Under rule No.13 of the Maharashtra Town Planning Schemes Rules, 1974)
No. ARB/TPS-3/GEN/2020/352
The draft Town Planning Scheme NAINA No.3 (Chipale, Koproli, Vihighar, Nere, Nerepada, Moho) has been sanctioned by the Vice Chairman and Managing Director, CIDCO under sub-section (2) of section 68 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 vide Notification No. CIDCO/NAINA/TPS-3/Draft Scheme/2019/1299/SAP/1144, dated 1st November, 2019, in exercise of the powers delegated to him by Urban Development Department vide Notification No.TPS-1817/973/C.R.103/17/UD-13, dated 13th September, 2017. The said Notification is published in Maharashtra Government Gazette, Extraordinary, Part-II, dated 1st November 2019.
The Government of Maharashtra in Urban Development Department has appointed Shri S.V. Surve, Retired Deputy Director of Town Planning as the Arbitrator for the said sanctioned Draft Scheme vide Notification No.TPS-1219/1524/CR-64/19/UD-12, dated 30th November, 2019 under sub-section (1) of section 72 of the said Act.
I, the undersigned therefore in accordance with Rule No.13 of Maharashtra Town Planning Schemes Rules, 1974, declare by this Notice that, I have commenced the duties as Arbitrator for Town Planning Scheme, NAINA No.3 (Chipale, Koproli, Vihighar, Nere, Nerepada, Moho) from 8th January, 2020.
All the owners of the lands included in this Town Planning Scheme will be served with special notice in form No.4 to submit their suggestions or objections in respect of proposals of the sanctioned draft Town Planning Scheme in due course.
Those owners or interested persons of the lands included in the Town Planning Scheme NAINA No. 3, who have been injuriously affected by making of this scheme are hereby informed that they shall be entitled to make a claim of compensation as per section 102 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, before the undersigned within a period of 60 days from the date of appearing this Notice in the Maharashtra Government Gazette.
S. V. SURVE,
Arbitrator,
Navi Mumbai,
Town Planning Scheme NAINA No. 3 dated the 8th January 2020. (Chipale, Koproli, Vihighar, Nere, Nerepada, Moho).