Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Weekly Gazette Dated 23rd Jan to 29th Jan. 2020

Published 23 January 2020

Type
Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2009/31732

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-अ

वर्ष ६, अंक १] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ [पृष्ठे ४

किंमत : रुपये ९.०० ट

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ जानेवारी २०२०.

अधिसूचना

विधि सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७.

क्रमांक एलएबी-२०१९/१५२/प्र.क्र.११३/का-२२.----- विधि सेवा प्राधिकरण अधिनियम, १९८७ (१९८७ चा ३९) याच्या कलम ६ च्या पोट-कलम (२) तसेच महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण नियम १९९८ याच्या नियम ३ च्या उप-नियम (२) व (३) व नियम ५ च्या उप-नियम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि यासंबंधात या आधी काढण्यात आलेल्या इतर सर्व अधिसूचना अधिक्रमित करून महाराष्ट्र शासन उच्च न्यायालयाच्या मा. मुख्य न्यायमूर्तीबरोबर विचारविनिमय करून, याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ २ मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींना, उक्त अधिनियमाखालील कामे पार पाडण्यासाठी, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरिता, महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाचे सदस्य म्हणून नामनिर्देशित करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. (१) नाव व पदनाम (२) पद (३)
१ २ ३ ४ ५ ६ श्री. आर. ए. दादा, वरिष्ठ समुपदेशी, उच्च न्यायालय, मुंबई श्री. राजीव पाटील, वरिष्ठ अधिवक्ता-मध्यस्थ श्रीमती. दिपा प्रशांत चव्हाण, अधिवक्ता, उच्च न्यायालय, मुंबई श्रीमती. निर्मला सामंत प्रभावळकर, समाजसेविका श्रीमती विजया बांगडे, अधिवक्ता व सामाजिक कार्यकत्र्या, चंद्रपूर डॉ. आशा बाजपेयी, अध्यक्ष, सेंटर फॉर सोशोलिगल स्टडीज अॅन्ड ुमन राइट्स, टाटा इन्स्टीटयुट ऑफ सोशल सायन्स, मुंबई सदस्य सदस्य सदस्य सदस्य सदस्य सदस्य

(१)

भाग चार-अ-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१

अनुसूची-समाप्त

अ. क्र. (१)

नाव व पदनाम

(२)

पद (३) ७ श्री. प्रशांत कुमार साथीनाथन, अधिवक्ता, नागपूर ८ श्री. सदाशिव एस. देशमुख, (निवृत्त जिल्हा न्यायाधीश) ९ श्री. एस. जी. देशमुख, अधिवक्ता व मध्यस्थ १० श्रीमती रिबेका गोन्साल्विस, अधिवक्ता, उच्च न्यायालय, मुंबई

सदस्य सदस्य सदस्य सदस्य

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. ना. लढ्ढा, शासनाचे प्रधान सचिव व विधि परामर्शी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१ ३

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 17th January 2020.

NOTIFICATION

LEGAL SERVICES AUTHORITIES ACT, 1987.

No. LAB-2019/152/C.R.113/Desk-22.––In exercise of the powers conferred by sub-section (2) of Section 6 of the Legal Services Authorities Act, 1987 (39 of 1987) read with sub-rules (2) and (3) of rule 3 and sub-rule (1) of rule 5 of the Maharashtra Legal Services Authority Rules, 1998, and in supersession of all other earlier notification issued in this behalf, the Government of Maharashtra hereby, in consultation with the Hon'ble the Chief Justice of the High Court, nominates the persons mentioned in column (2) of the Schedule appended hereto, to be the members of the Maharashtra State Legal Services Authority for the period of three years from the date of publication of this notification to perform the functions under the said Act.

Schedule

Sr. No. (1) Name (2) Designation (3)
1 2 3 4 5 6 7 8 9 10 Shri. R. A. Dada, Senior Counsel, High Court, Bombay. Shri. Rajeev Patil, Senior Advocate-Mediator. Smt. Deepa Prashant Chavhan, Advocate, High Court, Bombay. Smt. Nirmala Samant Prabhavalkar, Social Worker. Smt. Vijaya Bangde, Adovacate and Social Worker, Chandrapur. Dr. Asha Bajpai, Chairperson, Centre for Socio Legal Studies and Human Right Tata Institute of Social Science, Mumbai. Shri. Prashant Kumar Sathinathan, Advocate, Nagpur. Shri. Sadashiv S. Deshmukh, (Retd. District Judge) Shri. S. G. Deshmukh, Advocate and Mediator Smt. Rebecca Gonsalvez, Advocate, High Court, Bombay Member Member Member Member Member Member Member Member Member Member

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. N. LADDHA,

Principal Secretary and Remembrance of

Legal Affairs to Government.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२०/माघ ३-९, शके १९४१

वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ जानेवारी २०२०

अधिसूचना

क्रमांक भनिनि-२०१९/प्र.क्र.२४/सेवा-६.---महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी व अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (महाराष्ट्र) यामध्ये अंशदान करणाया व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमा असलेल्या शिल्लक रकमा यावर तसेच १ नोव्हेंबर १९५६ पूर्वी खाली नमूद केलेल्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये अंशदान करणाया व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमेस असलेल्या शिल्लक रकमा यावर दिनांक १ ऑक्टोबर २०१९ ते दिनांक ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीकरिता व्याजाचा दर दरसाल दरशेकडा ७.९ % (सात पूणार्ंक नऊ दशांश टक्के) असा ठरविण्यात आला आहे :------

(१) सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),

(२) पटवायांचा भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),

(३) अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),

(४) सक्तीची बचत योजना (हैद्राबाद).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

भा. ज. गाडेकर,

शासनाचे उप सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.