Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV Ext. 6 (5th Feb. 2020) वित्त विभाग, सन 2020 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 5, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, 2019 यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.

Published 05 February 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ६, अंक ५] बुधवार, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे

(१-३)

करण्यासाठी अध्यादेश.

सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५.--- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ यात सुधारणा . . . . . .

वित्त विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ फेब्रुवारी २०२०.

MAHARASHTRA ORDINANCE No. V OF 2020.

AN ORDINANCE

TO AMEND THE MAHARASHTRA GOODS AND SERVICES TAX

(AMENDMENT) ACT, 2019.

सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५.

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ यात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;

२०१९ चा महा. ३१.

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ यात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;

भाग चार-६---१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१ त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत:-----

१. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) (सुधारणा) अध्यादेश, २०२०, असे संक्षिप्त नाव व प्रारंभ. म्हणावे.

(२) तो, तात्काळ अंमलात येईल.

२०१९ चा महा. ३१.

२. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ याच्या कलम १ मधील पोट-कलम (२) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल आणि ते २६ डिसेंबर २०१९ पासून दाखल करण्यात आल्याचे मानण्यात येईल :---

सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१ याच्या कलम २ ची सुधारणा.

""(२) (क) कलमे ३ ते ६, कलम ८, कलम ९, कलम ११, कलम १२ व कलम २१ हे १ जानेवारी २०२० पासून अंमलात येतील ;

(ख) अन्यथा तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त्त उर्वरित कलमे, शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नेमून देईल अशा दिनांकास अंमलात येतील."".

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, फेब्रुवारी ५, २०२०/माघ १६, शके १९४१ ३

निवेदन

वस्तू व सेवा कर कायद्यांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २७९-क अन्वये भारताच्या राष्ट्रपतींनी घटित केलेल्या वस्तू व सेवा कर परिषदेकडून विविध निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ आणि एकात्मिक वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यात वित्त (क्रमांक २) अधिनियम, २०१९ (२०१९ चा २३) याद्वारे संसदेने सुधारणा केल्या आहेत. वस्तू व सेवा कराशी संबंधित कायद्याच्या तरतुदींमध्ये एकरूपता ठेवण्यासाठी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यात देखील, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ (२०१९ चा महा. ३१) याद्वारे सुधारणा करण्यात आली आहे. उक्त्त सुधारणा अधिनियमाच्या कलम १ च्या पोट-कलम (२) मध्ये अशी तरतूद आहे की, तो १ जानेवारी २०२० पासून अंमलात येईल.

२. तथापि, वित्त (क्र. २) अधिनियम, २०१९ (२०१९ चा २३) या अन्वये काढण्यात आलेली केंद्र सरकार अधिसूचना, वित्त मंत्रालय, क्र. ०१/२०२०-केंद्रीय कर/जी.एस.आर. २(इ), दिनांक १ जानेवारी २०२० याद्वारे, उक्त्त अधिनियमाचेे कलम ९२, कलम ९७, कलम १०० व कलमे १०३ ते ११० वगळून कलमे ९२ ते ११२, १ जानेवारी, २०२० पासून केंद्र सरकारकडून अंमलात आणण्यात आली आहेत आणि उर्वरित कलमे, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अंमलात येतील. वस्तू व सेवा कराशी संबंधित केंद्रीय व राज्य अधिनियमांच्या उक्त्त सुधारणा करणाया तरतुदी लागू करण्यात एकरुपता ठेवण्यासाठी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ याची त्याचप्रकारे सुधारणा केलेली कलमे, त्याच दिनांकास अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. म्हणून, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ यात योग्य त्या सुधारणा करणे इष्ट आहे.

३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ (२०१९ चा महा. ३१) यात सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तिवात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे आणि, म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.

मुंबई, दिनांक २ फेब्रुवारी २०२०.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

मनोज सौनिक, शासनाचे अपर मुख्य सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.