Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IL Extra No. 12 (10-02-2020) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, अधिसूचना, क्रमांक एफएसी-2019/प्र.क्र. 253/काम-4, कारखाने अधिनियम, 1948

Published 10 February 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०, २०२०/माघ २१, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--ल

वर्ष ६, अंक ७] सोमवार, फेब्रुवारी १०, २०२०/माघ २१, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक १२

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० फेब्रुवारी २०२०

अधिसूचना

कारखाने अधिनियम, १९४८.

क्रमांक एफएसी-२०१९/प्र.क्र.२५३/काम-४.-----कारखाने अधिनियम, १९४८ (१९४८ चा ६३) याच्या कलम ११२ व कलम ११५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने सुधारित करण्याचे योजिलेल्या महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ या नियमांचा पुढील मसुदा, त्यामुळे बाधा पोहचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता, उक्त अधिनियमाच्या कलम ११५ च्या उप-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे, आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, उक्त मसुदा, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून पंचेचाळीस दिवसांच्या समाप्तीनंतर विचारात घेण्यात येईल.

२. उपरोक्त कालावधी समाप्त होण्यापूर्वी, उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना, संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कामगार भवन, पाचवा मजला, ब्लॉक-ई, सी-२०, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ यांच्याकडे प्राप्त होतील, त्या शासन विचारात घेईल.

नियमांचा मसुदा

१. या नियमांना महाराष्ट्र कारखाने (सुधारित) नियम, २०२० म्हणता येतील.

२. महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ च्या प्रकरण ३ च्या विद्यमान नियम १८-अ ऐवजी नवीन नियम १८-अ खालीलप्रमाणे लागू होतील :----

(१) धोकादायक प्रक्रिया आणि कामामध्ये किंवा घातक प्रक्रियेमध्ये काम करणारे कामगार वगळता कारखान्यातील प्रत्येक कामगारांची वैद्यकीय तपासणी वर्षातून एकवेळा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक जो बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS) ही पदवी व औद्योगिक आरोग्य (DIH) ही पदविका धारक किंवा महानिदेशक, कारखाने सलाह सेवा आणि श्रम संस्थान (DGFASLI) किंवा राज्य शासनाची मान्यता असलेले असोशिएट फेलो ऑफ इंडस्ट्रीयल हेल्थ (AFIH) हे प्रमाणपत्र धारक आहे त्याच्याकडून झाली पाहिजे. तसेच तो भारतीय वैद्यक परिषद (IMC) किंवा महाराष्ट्र वैद्यक परिषद (MMC) कडे नोंदणी केलेला असावा.

(१)

भाग एक--ल-----१२-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०, २०२०/माघ २१, शके १९४१ (२) या नियमाअंतर्गत केलेल्या वैद्यकीय तपासणीची नोंद फॉर्म - ७अ मध्ये ठेवण्यात येईल आणि कारखाने निरीक्षकास सादर करण्यात येईल व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून फॉर्म-७अ प्राप्त झाल्यावर तो सात दिवसाच्या आत कारखान्याच्या भोगवटादाराने संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रविष्ठ (Upload) करावा.

(३) कामगारांची आरोग्य स्थिती प्रमाणित करण्यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने कामगाराचे कामाचे स्वरूप किंवा कामाचे वातावरण लक्षात घेऊन आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या कराव्यात.

(४) सदर वैद्यकीय तपासण्यासाठी लागणारे शुल्क कारखान्याच्या भोगवटादाराने नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाला दिले पाहिजे.

(५) कारखान्यामध्ये करावयाच्या वैद्यकीय तपासण्यासाठी कारखान्याच्या भोगवटादाराने व्यवस्थित स्वच्छ केलेली, पुरेसे वायूविजन व प्रकाश असलेली आणि टेबल व खुर्चीयुक्त असलेली खोली उपलब्ध करून दिली पाहिजे.

(६) कोणत्याही कामगाराच्या वैद्यकीय तपासणीचे व चाचण्यांचे अहवाल आणि नोंदवही शेवटच्या वैद्यकीय तपासणीपासून तीन वर्षाच्या कालावधीसाठी कारखान्याच्या भोगवटादाराने जतन केले पाहिजे आणि कारखाने निरीक्षकाने मागणी केल्यावर सादर केले पाहिजे.

नमुना ७-अ

(नियम १८-अ पहा)

आरोग्य नोंदणी

(कारखान्यांतील धोकादायक ऑपरेशन्स आणि प्रक्रिया किंवा घातक प्रक्रियेत काम करणा-या कामगारांव्यतिरिक्त इतर व्यक्तींसाठी)

कारखान्याचे नाव व पत्ता :

अ.क्र. (१) विभाग (२) कामगाराचे नाव (३) लिंग (४) वय (शेवटच्या जन्म दिनांका वेळी) (५) सध्याच्या कामाच्या नोकरीची तारीख (६) कामाचे किंवा व्यवसाय स्वरूप (७) वैद्यकीय तपासणीची तारीख (८) वैद्यकीय तपासणीच्या वेळी लक्षणे/ चिन्हे (९) कामगारांचे आरोग्य तपासण्या- साठी घेण्यात आलेली चाचणी (१०) कामगारांची आरोग्य स्थिती/ आजार (११) नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाची सही व दिनांक (१२)

टीप : मी प्रमाणित करतो की मी वर उल्लेख केलेल्या व्यक्तीची वैयक्ितकपणे तपासणी केलेली आहे.

दिनांक :

नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाची नाव व स्वाक्षरी ठिकाण :

म.वै.प्र नोंदणी क्रमांक --------------- वैधता ----------------

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. श्री. ल. पुलकुंडवार, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०, २०२०/माघ २१, शके १९४१ ३

In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department No. FAC.2019/ C.R.253/Lab-4,dated the 10th February 2020 is hereby published under the authority of the Governor of Maharashtra.

By order and in the name of Governor of Maharashtra,

DR. S. L. PULKUNDWAR,

Deputy Secretary to Government. INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th February 2020

NOTIFICATION

FACTORIES ACT, 1948.

No.FAC.2019/C.R.253/LAB-4.—The following draft of rules further to amend the Maharashtra Factories Rules, 1963 (hereinafter referred to as "the principal Rules"), which the Government of Maharashtra proposes to make in exercise of the powers conferred by section 112 and 115 of the Factories Act, 1948 (63 of 1948), in its application to the State of Maharashtra and clause (3) of section 23 of the General Clauses Act, 1897 (X of 1897) and of all other powers enabling it in that behalf, is hereby published as required by sub-section (1) of section 115 of the said Act, for information of all persons likely to be affected thereby;

and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra on or after the expiry of forty-five days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

2. Any objection or suggestion, which may be received by the Director, Directorate of Industrial Safety and Health, Kamgar Bhavan, 5 th Foor, Block-E, C-20, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051, on or before the expiry of the abovesaid period from any person with respect to the said draft, will be considered by the Government.

DRAFT RULES

1. These rules may be called the Maharashtra Factories (Amendment) Rules, 2020.

2. In chapter III of Maharashtra Factories Rules, 1963, for the existing rule 18A, the following new rule 18-A shall be substituted, namely :—

18-A-Medical examinations of workers:—

(1) Every worker in the factory except workers engaged in dangerous operations and processes or hazardous processes shall be medically examined once in a year by a registered medical practitioner possessing a degree of Bachelor of Medicine and Bachelor of Surgery (MBBS) and Diploma in Industrial Health (DIH) or posses a certificate of Associate fellow of Industrial Health (AFIH) approved by Directorate General Factory Advice Service and Labour Institute or State Government. He should be registered with medical Council of India or Maharashtra Medical Council.

(2) Record of medical examination conducted under this rule shall be maintained in form 7-A and shall furnish to the inspector and also uploaded by Occupier online on department website within seven days of receipt of form 7-A from the registered medical practitioner.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०, २०२०/माघ २१, शके १९४१

(3) Registered medical practitioner shall conduct medical tests required to ascertain health status of worker depending on his nature of work or work environment.

(4) The fees to be paid for medical examination shall be payable to the registered medical practitioner by the occupier.

(5) The Occupier of a factory shall provide for the purpose of medical examination to conduct at the factory a room which shall be properly cleaned and adequately ventilated and lighted and furnished with a table and chairs.

(6) The Occupier of a factory Shall preserved a register or record of medical examination and tests of any workers for a period of three years after the last medical examination and shall be produced before the Inspector on demand.

FORM 7-A

(See Rule 18-A)

Health Register

(In respect of persons employed in factories except workers engaged in dangerous operations and

processes or hazardous processes)

Name and address of the factory

Sr. No. (1) De- part- ment (2) Name of worker (3) Sex (4) Age (last birth- day) (5) Date of employ- ment of present work (6) Nature of job or occupation (7) Date of medical examina- tion (8) Symptoms/ Sign observed during examina- tion (9) Test conducted to ascertain workers/ health of worker (10) health status of disease (11) Signature of registered medical practitioner with date (12)

Note : I certify that I examined the person mentioned above personally .

Date : Name and Signature of registered medical practitioner Place :

MMC Registration No. _________ valid upto ______

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. S. L. PULKUNDWAR,

Deputy Secretry to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.