RNI No. MAHBIL/ 2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार- ब
वर्ष ६, अंक १४ ( २) ]
सोमवार , फेब्रुवारी १० , २०२० / माघ २१, शके १ ९ ४१ [पृष्ठे ३, किंमत: रुपये ९ .००
असाधारण क्रमांक ४५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सार्वजनिक बांधकाम विभाग मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १० फेब्रुवारी २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.
क्रमांक खाक्षेस-२०१६/प्र.क्र. २५१ (एल.बी.५१ ) -ओ/रस्ते-८, ज्याअर्थी, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम (१ ९ ५५ चा ५५ ) ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे ) याच्या कलम १५ च्या पोट- कलम ( २ ) तसेच उक्त कलमाच्या पोट-कलम (३ ) आणि कलम १७ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासनाने , शासन अधिसूचना, सार्वजनिक बांधकाम विभाग , क्रमांक खाक्षेस-२०१६/प्र.क्र. २५१ (एल.बी.४६) -ओ/रस्ते-८ , दिनांक १६ सप्टेंबर २०१ ९ ( यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे ) द्वारे , सार्वजनिक प्रयोजन असलेल्या हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग [ राज्य महामार्ग (विशेष) क्र. २ ] ( यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त महामार्ग " असा करण्यात आला आहे ) याचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे यांसाठी , उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेली जमीन संपादित करण्याचा उद्देश घोषित केला होता ; आणि उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये ज्यांच्या जमिनी समाविष्ट आहेत, अशा , उक्त जमीन मालकांकडून किंवा जमिनींच्या हितसंबंधित व्यक्तींकडून , उक्त अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एकवीस दिवसांच्या आत हरकती व सूचना उपविभागीय अधिकारी किंवा प्राधिकृत अधिकारी , उपविभाग सिंदखेड राजा, जिल्हा बुलडाणा यांच्याकडे मागविल्या होत्या.
आणि ज्याअर्थी , उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा, जिल्हा बुलडाणा यांनी जमीन मालकांकडून आणि जमिनींच्या हितसंबंधित व्यक्तीकडून, त्याबाबतीत प्राप्त हरकती आणि सूचना विचारात घेऊन , उक्त अधिनियमाच्या कलम १८ च्या पोट- कलम (१ ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे , त्याचे अहवाल राज्य शासनास सादर केला आहे.
आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाने, उक्त अहवाल विचारात घेऊन, या अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेली जमीन उक्त महामार्गाचे बांधकाम , देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे यासाठी आवश्यक असल्याचे ठरविले आहे.
भाग चार-ब-४५-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, फेब्रुवारी १० , २०२० /माघ २१ , शके १ ९ ४१
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम (१ ९ ५५ चा ५५ ) याच्या कलम १८ च्या पोट- कलम (१ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे , या अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीच्या रकाना ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या गावांच्या बाबतीत, त्या अनुसूचीच्या रकाना (३ ) मध्ये नमूद केलेला भूसंपादन क्रमांक / गट क्रमांक असलेल्या जमिनी, त्या अनुसूचीच्या रकाना ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र हे , उक्त महामार्गाचे बांधकाम , देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे यासाठी संपादित करण्यात येईल असे घोषित करीत आहे.
अनुसूची
संपादित करावयासाठी उद्देशित असलेल्या जमीनीचे वर्णन
तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा
गाव
अ. क्र.
क्षेत्र (हेक्टर आर)
भूमापन क्रमांक / गट क्रमांक
(२)
(१)
(३)
(४)
सावरगाव माळ
२८
१
२.४४००
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
अ. अ. सगणे, शासनाचे सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब , फेब्रुवारी १० , २०२० / माघ २१ , शके १ ९ ४१
PUBLIC WORKS DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 10th February 2020 .
NOTIFICATION
MAHARASHTRA HIGHWAYS ACT.
No.PPP - 2016/CR - 251 (L.B.51 ) -O/Road - 8 . Whereas , in exercise of the powers conferred by sub - section ( 2) of section 15 read with sub - section (3 ) of the said section 15 and section 17 of the Maharashtra Highways Act (LV of 1955 ) ( hereinafter referred to as " the said Act " ) , and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra had, vide Government Notification , Public Works Department , No. PPP - 2016/ CR- 251 ( L.B.46 ) -O /Road - 8 , dated the 16th September , 2019 (hereinafter referred to as "the said notification ") , declared its intention to acquire the land as mentioned in the Schedule appended to the said notification, for a public purpose i.e. for building , maintenance , management or operation of the Hindu Hridaysamrat Balasaheb Thakare Maharashtra Samruddhi Mahamarg [ State Highway (Special) No. 2 ] ( hereinafter referred to as " the said Highway " ) ; and invited the objections and suggestions from the land owners or persons interested in the said land , whose lands are included in the Schedule appended to the said notification to the Sub- Divisional Officer or Authorized Officer , Sub- Division Sindhkhed Raja , District Buldhana , within twenty - one days from date of the publication of the said notification, in the Official Gazette ;
And whereas , the said Sub - Divisional Officer , Sindhkhed Raja , District Buldhana , has , after considering the objections and suggestions received from the land owners and persons interested thereof, submitted its report to the State Government as provided in sub - section ( 1) of section 18 of the said Act ;
And whereas , the Government of Maharashtra has , after considering said report , decided that the land specified in the Schedule appended to this notification is required for building , maintenance , management or operation of the said Highway;
Now, therefore , in exercise of the powers conferred by sub - section ( 1) of section 18 of the Maharashtra Highways Act (LV of 1955 ) , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra , hereby declares that in respect of the villages specified in column (2 ) of the Schedule appended hereto , the land bearing Survey Numbers /Gat Numbers mentioned in column (3 ) thereof, the area specified in column (4) of that Schedule shall be acquired for building , maintenance , management or operation of the said Highway .
Schedule
Description of land intended to be acquired Taluka Sindhakhed Raja , District Buldhana
Area
Village
Sr. No.
Survey Number /
GatNumber
(Hectare Are)
(2)
(3)
(1)
(4)
28
2.4400
1
SawargaonMal
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
A. A. SAGANE , Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .