Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, नगर विकास विभाग यांजकडील मांजरी-खुर्द-कोलवडी प्रारूप नगर रचना योजनेसाठी लवादाच्या नियुक्तीबाबत अधिसूचना. (2) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडील मौजे हिंजवडी येथे विशेष आर्थिक क्षेत्र घोषित करणेबाबत अधिसूचना. (3) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 257 अंतर्गत प्रलंबित असलेले RTS रीव्हिजन अर्ज प्रसिद्ध करणे. (4) कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, उपविभागीय दंडाधिकारी, हवेली, कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग यांजकडील मयत समरी. (5) जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील आस्थापना बंद ठेवण्यासंबंधीचे आदेश, जिल्हा दंडाधिकारी, सांगली यांजकडील कायदा व सुव्यवस्थेबाबत आदेश, अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडील वाहतूक बंदी, नदीचे पाणी पिण्यास बंदी, संसर्गजन्य रोग्यांना नगरपरिषद हद्दीत येण्यास मनाई आदेश, अपर जिल्हादंडाधिकारी, सातारा यांजकडील कायदा व सुव्यवस्थेबाबत आदेश, अपर जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांजकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (अ ते फ) अन्वये मनाई आदेश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड शहर यांजकडील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंध आदेश, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश तसेच पोलीस अधीक्षक, सांगली, अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश.
Published 13 February 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.