Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IL Extra No. 14 (17-02-2020) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, अधिसूचना, क्रमांक किवेअ-2018/प्र.क्र. 216/काम-7, किमान वेतन अधिनियम,1948

Published 17 February 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १७, २०२०/माघ २८, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--ल

वर्ष ६, अंक ९] सोमवार, फेब्रुवारी १७, २०२०/माघ २८, शके १९४१ [पृष्ठे ६, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक १४

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ फेब्रुवारी २०२०

अधिसूचना

किमान वेतन अधिनियम, १९४८.

क्रमांक किवेअ. २०१८/प्र.क्र. २१६/काम.-७.----किमान वेतन अधिनियम, १९४८ (१९४८ चा ११) (यात यापुढे ज्याचा " उक्त अधिनियम " असा निर्देश करण्यात आलेला आहे.) हा महाराष्ट्र राज्यास लागू करण्यात आल्यानंतर त्याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) च्या खंड (ब) अन्वये अनुसूची भाग-१ मध्ये अंतभर्ूत " रबर उद्योगातील कामधंदा " या अनुसूचीत रोजगारात कामावर असलेल्या कामगारांना देय असलेले किमान वेतन दर पुर्ननिर्धारित करण्याबाबतचा प्रस्ताव अंतभर्ूत असलेली जी अधिसूचना काढण्याचे प्रस्तावित केलेले आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त अधिनियमाच्या कलम ५, पोट-कलम (१) खंड (ब) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे यामुळे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे, आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येत आहे की, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात सदरहू अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांनंतर महाराष्ट्र शासन उक्त मसुदा विचारात घेईल.

उक्त मसुद्याच्या संबंधात उपरोक्त कालावधी संपण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीकडून जे कोणतेही अभिवेदन कामगार आयुक्त, कामगार भवन, ई-ब्लॉक, सी-२०, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेमार्फत येईल ते शासनाकडून विचारात घेण्यात येईल.

मसुदा अधिसूचना

क्रमांक : किवेअ.२०१८/प्र.क्र. २१६/काम.-७.------- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने अनुसूचीच्या भाग-१ मधील " रबर उद्योगातील कामधंदा " या रोजगारात असलेल्या (यात यापुढे ज्याचा " उक्त अनुसूचित रोजगार " असा उल्लेख करण्यात आलेला आहे.) कामगारांना देय असलेले किमान वेतन दर शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक याचिका २०१३/१८६/प्र.क्र.९०/काम.-७, दिनांक २५ जून २०१३ अन्वये पुर्ननिर्धारित केले आहेत ;

(१)

भाग एक--ल-----१४--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १७, २०२०/माघ २८, शके १९४१ आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने पुर्नविलोकन करून उक्त अनूसूचीत रोजगारातील कामगारांना देय असलेले किमान वेतन दर पुर्ननिर्धारित करण्याचे ठरविले आहे.

त्याअर्थी, आता किमान वेतन अधिनियम, १९४८ (१९४८ चा ११) लागू करताना त्याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) चा खंड (ब) आणि कलम ५ च्या पोट-कलम (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, शासन अधिसूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक किवेअ-२०१८/प्र.क्र.२१६/कामगार-७, दिनांक १७ फेब्रुवारी २०२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रस्तावाच्या संबंधात मिळालेली सर्व अभिवेदने विचारात घेतल्यानंतर आणि सल्लागार मंडळाचा सल्ला विचारात घेतल्यानंतर महाराष्ट्र शासन याद्वारे दिनांक ................... पासून उक्त अनुसूचीत रोजगारात नोकरीत असलेल्या खालील अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या कामगारांच्या वर्गाला त्या अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये नमूद केल्याप्रमाणे वेतनाचे किमान दर पुर्ननिर्धारित करीत आहे :-----

अनुसूची

अ.क्र. कामगारांची वर्गवारी (१)

(२)

मूळ किमान वेतन दर (दरमहा रुपये) (३)

परिमंडळ-१ परिमंडळ-२ परिमंडळ-३ १ कुशल १२,२१८ ११,७४२ ११,४२४ २ अर्धकुशल ११,१०७ १०,३६१ १०,३१४ ३ अकुशल १०,३१४ ९,८३८ ९,५२० स्पष्टीकरण.------या अधिसूचनेच्या प्रयोजनार्थ,—

(क) परिमंडळ एक.----महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या हद्दीमधील सर्व क्षेत्रे, छावणी क्षेत्र, तसेच महानगरपालिका क्षेत्रापासून २० किलोमीटर पयर्ंतचे औद्योगिक क्षेत्र ;

(ख) परिमंडळ-दोन.----महाराष्ट्र राज्यातील सर्व ""अ"", ""ब"" व ""क"" वर्ग नगरपरिषद क्षेत्र तसेच नगरपरिषद क्षेत्रापासूनचे २० किलोमीटर पयर्ंतचे औद्योगिक क्षेत्र ;

(ग) परिमंडळ-तीन.----परिमंडळ १ व २ समोर दर्शविलेले क्षेत्र वगळून उर्वरित सर्व क्षेत्र ;

(घ) रोजंदारीवर काम करणा-या कामगारांस देय असलेले मजुरीचे किमान दर तो कामगार ज्या वर्गाचा असेल, त्या वर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या मासिक मजुरीच्या दरांना २६ ने भागून येणारा भागाकार नजिकच्या पैशांपयर्ंत पूणार्ंकात करून काढण्यात येईल ;

(च) अर्धवेळ काम करणा-या कामगारांना देय असलेल्या प्रतितास किमान वेतनाचा दर तो कामगार ज्या वर्गवारीचा असेल, त्या वर्गवारीच्या रोजंदारी किमान वेतनास ८ (तास) ने भागून व त्यात १५ टक्के वाढ करून तसेच येणारी रक्कम नजिकच्या पैशापयर्ंत पूणार्ंकात परिर्वतित करण्यात येऊन काढण्यात येईल ;

(छ) किमान वेतनामध्ये साप्ताहिक सुट्टीच्या वेतनाचा समावेश असेल ;

(ज) किमान वेतन दरामध्ये मूळ वेतन दर, विशेष भत्ता आणि सवलती असल्यास त्यांचे रोख मूल्य यासाठी अनुज्ञेय असलेल्या सर्व दरांचा समावेश असेल ;

(झ) कुशल कामगार म्हणजे जो स्वत:च्या निर्णय शक्तीनुसार आपले काम कार्यक्षमतेने व जबाबदारीने पार पाडू शकतो असा कामगार ;

(ट) अर्धकुशल कामगार म्हणजे सर्वसाधारणपणे नित्याच्या स्वरूपाचे असे काम करतो की, ज्यामध्ये निर्णय घेण्याची फारशी गरज नसते, परंतु तुलनेने त्याला दिलेले छोटेसे काम की, ज्यामध्ये महवाचे निर्णय इतरांकडून घेतले जातात असे काम योग्य रितीने पार पाडण्याची आवश्यकता असते. मर्यादित व्याप्तीचे नित्याचे काम पार पाडणे हेच त्याचे कर्तव्य असते ;

(ठ) अकुशल कामगार म्हणजे ज्यास लहानसा किंवा स्वतंत्र निर्णय घेणे आणि पूर्वानुभव असणे आवश्यक नाही. परंतु तरीही व्यावसायिक परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे असे साध्या कर्तव्य पालनाचा अंतर्भाव असलेले काम करणारा कामगार, म्हणून त्याच्या कामासाठी शारीरिक परिश्रमाशिवाय निरनिराळया वस्तूंची किंवा मालाची त्याला चांगली माहिती असणे आवश्यक असेल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १७, २०२०/माघ २८, शके १९४१ ३

परिशिष्ट

१. महाराष्ट्र राज्यातील दहा केंद्रांचा सरासरी ग्राहक मूल्य निर्देशांक (नवीन मालिका २००१ = १००) हा उक्त अनुसूचीत रोजगारात नोकरी करत असलेल्या कामगारांना राहणीमान निर्देशांक लागू असेल. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेला सक्षम प्राधिकारी, १ जानेवारी आणि १ जुलै रोजी सुरू होणा-या प्रत्येक सहामाहीच्या समाप्तीनंतर, त्या सहा महिन्यांसाठी उक्त कर्मचा-यांना लागू असलेल्या राहणीमान निर्देशांकाची सरासरी काढील आणि ३११ निर्देशांकावर अशा प्रत्येक अंकाच्या वाढीसाठी ज्या सहामाहीच्या संबंधात अशी सरासरी काढण्यात आलेली असेल, त्या सहा महिन्यांलगत पुढील सहामाहीसाठी उक्त कर्मचा-यांना देय असलेला विशेष भत्ता (यात ज्याचा ""राहणीमान भत्ता"" असा निर्देश करण्यात आला आहे.) सर्व परिमंडळाच्या संबंधित दरमहा रुपये २९ दराने असेल.

२. सक्षम प्राधिकारी, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, उपरोक्त प्रमाणे हिशोब करून काढलेला राहणीमान भत्ता, जानेवारी ते जून या कालावधीतील प्रत्येक महिन्यासाठी देय असेल, तेव्हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयामध्ये आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील प्रत्येक महिन्यासाठी देय असेल, तेव्हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडयामध्ये जाहीर करील :

परंतु, सक्षम प्राधिकारी किमान वेतन निश्चित केल्याच्या दिनांकापासून देय असलेला राहणीमान भत्ता जून किंवा डिसेंबर अखेरपयर्ंतच्या किंवा यथास्थिती, किमान वेतन दर निश्चित करण्यात आल्याच्या दिनांकानंतर लगेचच जाहीर करील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. मा. साठे, शासनाचे उप सचिव.

भाग एक--ल-----१४-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १७, २०२०/माघ २८, शके १९४१ In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, No. KWA. 2018/CR-216/ LAB-7, dated the 17th February 2020 published in the Maharashtra Government Gazette, Part I-L, Extra Ordinary is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. M. SATHE,

Deputy Secretary to Government.

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 17th February 2020

NOTIFICATION

MINIMUM WAGES ACT, 1948.

No. [KWA. 2018/CR-216/LAB-7].—The following draft of a notification which is proposed to be issued under clause (b) of sub-section (1) of section 3 of the Minimum Wages Act, 1948 (XI of 1948), in its application, containing proposal for revision of the minimum rates of wages payable to the employees employed in the Scheduled Employment, viz. " Employment in Rubber Manufacturing Industry" is hereby published as required by clause (b) of sub-section (1) of section 5 of the said Act, for the information of all persons likely to be affected thereby ; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra, after the expiry of two months from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

2. Any representation, which may be received by the Commissioner of Labour ' Kamgar Bhavan ', ' E ' Block, C-20, Bandra-Kurla Complex, Bandra (E.), Mumbai 400 051, from any person, in respect of the said draft, before the expiry of the aforesaid period, will be taken into consideration by the Government.

DRAFT NOTIFICATION

No. [KWA-2018/CR.216/LAB-7].—Whereas, by the Government Notification, Industries, Engery and Labour Department, No.WRIT. 2013/186/CR.90/LAB-7, dated the 25th June 2013, the Government of Maharashtra has revised the minimum rates of wages payable to the employees employed in the Scheduled Employment viz. " Employment in Rubber Manufacturing Industry " (hereinafter referred to as " the said scheduled employment ") ;

And whereas, the Government of Maharashtra, having reviewed the minimum rates of wages payable to the employees employed in the said scheduled empolyment, considers it necessary to revise them further.

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (1) of section 3 read with sub-section (2) of section 5 of the Minimum Wages Act, 1948 (XI of 1948), in its application, the Government of Maharashtra, after considering all the representations received by it in respect of the proposal published in the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. KWA.2018/CR-216/LAB-7, dated the 17th February 2020 and after consulting the Advisory Board, hereby revises, with effect from ................, the minimum rates of wages payable to the employees employed in the said scheduled employment and refixes them, as set out in column (3) of the Schedule appended hereto, as the minimum rates of wages payable to the class of employees mentioned against them in column (2) of the said Schedule.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १७, २०२०/माघ २८, शके १९४१ ५

Schedule

Sr. No. Class of Employees Minimum rates of wages

(per month basic rates in rupees) (1)

(2)

(3)

Zone I Zone II Zone III

Rs. Rs. Rs.

1 Skilled 12,218 11,742 11,424 2 Semi-skilled 11,107 10,631 10,314 3 Unskilled 10,314 9,838 9,520 Explanation.—For the purposes of this notification ,—

(a) Zone I.— shall comprise of the areas falling within the limits of all Municipal Corporations, Cantonment areas and Industrial areas within 20 Kilometer radius from all Municipal Council limit. ;

(b) Zone II.—shall comprise of the areas falling within the limits of all "A", "B" and "C" class Municipal Councils and Industrial areas within 20 Kilometer radius from all Municipal Council limit. ;

(c) Zone III.—shall comprise of all other areas in the State, which are not inculded in Zone-I and Zone-II ;

(d) the minimum rates of daily wages payable to an employee employed on daily wages shall be computed by dividing the minimum rates of monthly wages fixed for the class of employees to which he belongs by twenty-six, the quotient being stepped upto the nearest paisa ;

(e) the minimum rates of hourly wages payable part-time an employee wages shall be computed by dividing the rates of minimum wages applicable to the concerned class of employees by eight hours with 15% rise in it and quotient being stepped upto the nearest paisa ;

(f) the minimum rates of wages shall be inclusive of payment of remuneration in respect of weekly day of rest ;

(g) the minimum rates of wages shall consist of basic rates, the Cost of Living Allowance and the cash value of concession, if, any ;

(h) a skilled employee is one who is capable of working efficiently, of exercising considerable independent judgment and of discharging his duties responsibly ;

(i) a semi-skilled employee is one who does work generally of a well-defined routine nature, wherein the major requirement is not so much of the judgment, skills and dexterity, but of proper discharge of duties assigned to him for a relatively narrow job and important decisions are made by others; his work is thus limited to the performance of routine operation of limited scope ;

(j) an unskilled employee is one who does operations that involve the performance of simple duties which require exercise of little or no independent judgment or previous experience, although a familiarity with the occupational environment is necessary. His work may thus require, in addition to physical exertion, familiarity with a variety of articles or goods.

APPENDIX

1. The average Consumer Price Index Number in respect of ten centers in the State of Maharashtra for working class (New Series 2001=100) shall be the Cost of Living Index Number applicable to the employees employed in the said scheduled employment. The Competent Authority appointed by the Government shall, after the expiry of every six months commencing on the first day of January and the first day of July, calculate the average of the Cost of Living Index Number applicable to the said employees६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १७, २०२०/माघ २८, शके १९४१ for these six months and ascertain the rise of such average over 311 points. For such rise of every point, special allowance (hereinafter referred to as " the Cost of Living Allowance ") payable to the employees in the said scheduled employment for each of the six months immediately following six months in respect of which such average has been calculated at the rate of Rs. 29.00 per month for all Zones.

2. The Cost of Living Allowance computed as aforesaid shall be declared by the Competent Authority by notification in the Official Gazette in the last week of July when such allowance is payable for each of the months from July to December and in the last week of January, when such allowance is payable for each of the months from January to June :

Provided that, the Competent Authority shall declare the Cost of Living Allowance payable in respect of the period from the date of fixation of the rate of minimum wages to the end of December or June, as the case may be, immediately after the said date with effect from which the minimum rates of wages are fixed.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. M. SATHE,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.