Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part V (Ex. 1) (Dated 25th February 2020) (L.A. BILL No. I of 2020) (महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, 2019 या सुधारणा करण्यासाठी विधेयक

Published 25 February 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २५, २०२०/फाल्गुन ६, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष ६, अंक १] मंगळवार, फेब्रुवारी २५, २०२०/फाल्गुन ६, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

-----------------------------------

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानसभेत दिनांक २५ फेब्रुवारी, २०२० रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :---

L. A. BILL No. I OF 2020.

A BILL

TO AMEND THE MAHARASHTRA GOODS AND SERVICES TAX

(AMENDMENT) ACT, 2019.

सन २०२० चे विधानसभा विधेयक क्रमांक १.

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ यात सुधारणा करण्यासाठी विधेयक.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;

२०१९ चा महा. ३१.

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ यात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती ; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक ५ फेब्रुवारी २०२० रोजी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) (सुधारणा) अध्यादेश, २०२०, हा प्रख्यापित केला होता ;

२०२० चा महा. अध्या ५. भाग पाच--१---१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २५, २०२०/फाल्गुन ६, शके १९४१

आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :---

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) (सुधारणा) अधिनियम, २०२०, असे संक्षिप्त नाव व प्रारंभ. म्हणावे.

(२) तो, दिनांक ५ फेब्रुवारी २०२० रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

२०१९ चा महा. ३१.

२. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ (यात यापुढे ज्याचा निर्देश ""मुख्य अधिनियम"" असा करण्यात आला आहे), याच्या कलम १ मधील पोट-कलम (२) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल आणि ते २६ डिसेंबर २०१९ पासून दाखल करण्यात आल्याचे मानण्यात येईल :---

सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१ याच्या कलम २ ची सुधारणा.

""(२) (क) कलमे ३ ते ६, कलम ८, कलम ९, कलम ११, कलम १२ व कलम २१ हे १ जानेवारी २०२० पासून अंमलात येतील ;

(ख) अन्यथा तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त्त उर्वरित कलमे, शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नेमून देईल अशा दिनांकास अंमलात येतील."".

३. (१) महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) (सुधारणा) अध्यादेश, २०२० हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे.

२०२० चा महा. अध्या. ५.

सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५ याचे निरसन व व्यावृत्ती.

(२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदीन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमान्वये सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिति, काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २५, २०२०/फाल्गुन ६, शके १९४१ ३

उद्देश व कारणे यांचे निवेदन

वस्तू व सेवा कर कायद्यांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २७९-क अन्वये भारताच्या राष्ट्रपतींनी घटित केलेल्या वस्तू व सेवा कर परिषदेकडून विविध निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ आणि एकात्मिक वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यात वित्त (क्रमांक २) अधिनियम, २०१९ (२०१९ चा २३) याद्वारे संसदेने सुधारणा केल्या आहेत. वस्तू व सेवा कराशी संबंधित कायद्यांच्या तरतुदींमध्ये एकरूपता ठेवण्यासाठी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यात देखील, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ (२०१९ चा महा. ३१) याद्वारे सुधारणा करण्यात आली आहे. उक्त्त सुधारणा अधिनियमाच्या कलम १ च्या पोट-कलम (२) मध्ये अशी तरतूद होती की, तो १ जानेवारी २०२० पासून अंमलात येईल.

२. तथापि, वित्त (क्रमांक २) अधिनियम, २०१९ (२०१९ चा २३) या अन्वये काढण्यात आलेली केंद्र सरकार अधिसूचना, वित्त मंत्रालय, क्र. ०१/२०२०-केंद्रीय कर/जी.एस.आर. २(इ), दिनांक १ जानेवारी २०२० याद्वारे, उक्त्त अधिनियमाचेे कलम ९२, कलम ९७, कलम १०० व कलमे १०३ ते ११० वगळून कलमे ९२ ते ११२, १ जानेवारी, २०२० पासून केंद्र सरकारकडून अंमलात आणण्यात आली आहेत आणि उर्वरित कलमे, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अंमलात येतील. वस्तू व सेवा कराशी संबंधित केंद्रीय व राज्य अधिनियमांच्या उक्त्त सुधारणा करणाया तरतुदी लागू करण्यात एकरुपता ठेवण्यासाठी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ याची त्याचप्रकारे सुधारणा केलेली कलमे, त्याच दिनांकास अंमलात आणण्याची आवश्यकता होती. म्हणून, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ यात योग्य त्या सुधारणा करणे इष्ट होते.

३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते आणि उपरोक्त्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ (२०१९ चा महा. ३१) यात सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तिवात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती, आणि, म्हणून, त्यांनी दिनांक ५ फेब्रुवारी २०२० रोजी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) (सुधारणा) अध्यादेश, २०२० (२०२० चा महा. अध्या. ५), हा प्रख्यापित केला होता.

४. उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.

मुंबई, दिनांक १८ फेब्रुवारी २०२०.

अजित पवार, उप मुख्यमंत्री.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २५, २०२०/फाल्गुन ६, शके १९४१

वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे ज्ञापन

या विधेयकात वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचा पुढील प्रस्ताव अंतभर्ूत आहे :----

खंड २(ख).-----या खंडान्वये, ज्या दिनांकास महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०१९ (२०१९ चा महा. ३१) याची उर्वरित कलमे अंमलात येतील तो दिनांक राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.

२. वैधानिक अधिकार सोपवण्यासंबंधीचा वर नमूद केलेला प्रस्ताव हा सामान्य स्वरुपाचा आहे.

विधान भवन : मुंबई, दिनांक २५ फेब्रुवारी, २०२०.

राजेन्द्र भागवत, सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-.