महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग पाच
वर्ष ६, अंक ३] शुक्रवार, फेब्रुवारी २८, २०२०/फाल्गुन ९, शके १९४१ [पृष्ठे ७, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.
__________________
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
महाराष्ट्र विधानसभेत दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :----
L. A. BILL No. VIII OF 2020.
A BILL
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA NURSES ACT, 1966.
सन २०२० चे विधानसभा विधेयक क्रमांक ८.
महाराष्ट्र परिचारिका अधिनियम, १९६६ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता विधेयक.
१९६६ चा महा. ४०.
ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र परिचारिका अधिनियम, १९६६ यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----
१. या अधिनियमास, महाराष्ट्र परिचारिका (सुधारणा) अधिनियम, २०२०, असे म्हणावे.
संक्षिप्त नाव.
(१)
भाग पाच-८---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२०/फाल्गुन ९, शके १९४१ २. महाराष्ट्र परिचारिका अधिनियम, १९६६ (यात यापुढे ज्याचा निर्देश " मुख्य अधिनियम " असा करण्यात १९६६ चा महा. ४०.
आला आहे) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (३) मध्ये,---
(क) खंड (अ) मध्ये,----
(एक) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :---
सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३ ची सुधारणा.
" (एक) आरोग्य सेवा सहायक संचालक, (शुश्रूषा) ;";
(दोन) उप-खंड (तीन) नंतर, पुढील उप-खंड जादा दाखल करण्यात येईल :---
" (चार) अधीक्षक, शुश्रूषासेवा, बृहन्मुंबई महानगरपालिका ;";
(ख) खंड (ब) मध्ये,----
(एक) उप-खंड (एक) मधील, " द्यावयाचा एक सदस्य " या मजकुराऐवजी, " द्यावयाचे दोन सदस्य " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(दोन) उप-खंड (चार) मधील, " तीन प्रदेशांपैकी प्रत्येक प्रदेशातून " हा मजकूर त्याच्या व्याकरणिक फेरफारासह वगळण्यात येईल ;
(तीन) उप-खंड (पाच), (सहा), (सात) आणि (आठ) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :---
" (पाच) भारतीय प्रशिक्षित परिचारिका संघाच्या राज्य शाखेने निवडून द्यावयाचा एक सदस्य ; " ;
(ग) खंड (क) ऐवजी, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :---
" (क) नामनिर्देशित सदस्य,----
राज्य शासनाने नामनिर्देशित करावयाचे पाच सदस्य, त्यापैकी,----
(एक) नोंदणीकृत परिचारिकांमधून नामनिर्देशित करावयाचा एक सदस्य,
(दोन) भिषकांमधून नामनिर्देशित करावयाचा एक सदस्य,
(तीन) शल्यचिकित्सकांमधून नामनिर्देशित करावयाचा एक सदस्य,
जे संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन याच्या अधिपत्याखालील सेवेत
कार्यरत आहेत ;
(चार) सार्वजनिक आरोग्य परिचारिकांमधून नामनिर्देशित करावयाचा एक सदस्य ;
(पाच) राज्याच्या मान्यताप्राप्त परिचारिका संस्थेमधील परिसेविका पाठनिर्देशक किंवा
चिकित्सालयीन निदेशक यांच्यामधून नामनिर्देशित करावयाचा एक सदस्य.".
३. मुख्य अधिनियमाच्या कलम ४ मध्ये, पोट-कलम (२) मधील, दुसरे परंतुक वगळण्यात येईल.
सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ४ ची सुधारणा.
४. मुख्य अधिनियमाच्या कलम ७ मध्ये, पोट-कलम (१) मधील,----
(क) खंड (क) मध्ये " दाखल करण्यात आलेले नसेल ;" या मजकुरानंतरचा, " किंवा " हा मजकूर वगळण्यात येईल ;
सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ७ ची सुधारणा.
(ख) खंड (ड) नंतर, पुढील खंड जादा दाखल करण्यात येईल :---
" (इ) ज्या प्रवर्गातून त्याला निवडून दिले होते त्या प्रवर्गाची पात्रता धारण करण्याचे त्याने बंद केले असेल ; किंवा
(फ) जर तो किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य, कोणत्याही स्वरूपात, कोणत्याही शुश्रूषा आस्थापनेचा मालक किंवा भागीदार असेल.".
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२०/फाल्गुन ९, शके १९४१ ३५. मुख्य अधिनियमाच्या कलम १७ मध्ये,---
(क) पोट-कलम (२) मधील, " पाच " या मजकुराऐवजी, " तीन " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(ख) पोट-कलम (५) च्या खंड (ब) मध्ये,----
सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १७ ची सुधारणा.
(एक) " दोन रुपये " या मजकुराऐवजी, " पाचशे रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(दोन) परंतुकामध्ये, " पाच रुपये " या मजकुराऐवजी, " दोन हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(ग) पोट-कलम (७) मध्ये, " दोन रुपये " या मजकुराऐवजी, " पाचशे रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
६. मुख्य अधिनियमाच्या कलम १८ नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल :---
सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० यामध्ये नवीन कलम १८अ समाविष्ट करणे.
पारस्परिक नोंदणी.
" १८अ. (१) महाराष्ट्र राज्य वगळता इतर राज्यात परिचारिका म्हणून नोंदणी करण्याकरिता अर्हताप्राप्त केलेल्या ज्या व्यक्तीची या अधिनियमाअन्वये पारस्परिक नोंदणी प्राप्त करण्याची इच्छा असेल अशी कोणतीही व्यक्ती प्रबंधकाकडे विहित नमुन्यात अर्ज करील आणि त्यासोबत, विहित करण्यात येईल अशी फी देईल. असा अर्ज व फी प्राप्त झाल्यावर, प्रबंधक, नोंदणी पुस्तकात त्या अर्जदाराची पारस्परिक नावनोंदणी करण्यासाठी परिषदेच्या अध्यक्षाची मान्यता घेईल.
(२) पोट-कलम (१) अन्वये जिचे नाव नोंदणी पुस्तकात दाखल केले असेल, अशा प्रत्येक व्यक्तीस विहित करण्यात येईल अशा नमुन्यात एक पारस्परिक नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. असे प्रमाणपत्र, त्यात विर्िनदिष्ट करण्यात येईल अशा कालावधीसाठी अंमलात राहील.
(३) पोट-कलम (१) अन्वये पारस्परिक नोंदणी धारण करणारी कोणतीही व्यक्ती, या अधिनियमाअन्वये घेण्यात येणा-या कोणत्याही निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा राहण्यास किंवा मत देण्यास पात्र ठरणार नाही.".
७. मुख्य अधिनियमाच्या कलम १९ मधील पोट-कलम (४) मध्ये, " पाच रुपये " या मजकुराऐवजी, " पाचशे रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १९ ची सुधारणा.
८. मुख्य अधिनियमाच्या कलम २७ मध्ये,---
(क) पोट-कलम (९) मध्ये,----
(एक) " दोनशे पन्नास रुपये " या मजकुराऐवजी, " पाच हजार रुपये " हा मजकूर दाखल
सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २७ ची सुधारणा.
करण्यात येईल ;
(दोन) " सहा महिने " या मजकुराऐवजी, " एक वर्ष " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
येईल ;
भाग पाच-८---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२०/फाल्गुन ९, शके १९४१ (ख) पोट-कलम (१०) मध्ये,----
(एक) " पन्नास रुपये " या मजकुराऐवजी, " दोन हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(दोन) " तीन महिने " या मजकुराऐवजी, " सहा महिने " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(तीन) " शंभर रुपये " या मजकुराऐवजी, " पाच हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(ग) पोट-कलम (११) मध्ये,----
(एक) " दोनशे पन्नास रुपये " या मजकुराऐवजी, " पाच हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(दोन) " सहा महिने " या मजकुराऐवजी, " एक वर्ष " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(तीन) " एक हजार रुपये " या मजकुराऐवजी, " दहा हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
९. मुख्य अधिनियमाच्या कलम २८ मधील, पोट-कलम (२) मध्ये,---
(क) " शंभर रुपये " या मजकुराऐवजी, " एक हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(ख) " दोनशे रुपये " या मजकुराऐवजी, " दोन हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २८ ची सुधारणा.
(ग) " तीनशे रुपये " या मजकुराऐवजी, " पाच हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
१०. मुख्य अधिनियमाच्या कलम ३१ मध्ये,---
(क) पोट-कलम (३) मध्ये,----
(एक) " पंचवीस रुपये " या मजकुराऐवजी, " एक हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३१ ची सुधारणा.
(दोन) " पन्नास रुपये " या मजकुराऐवजी, " तीन हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(तीन) " शंभर रुपये " या मजकुराऐवजी, " पाच हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(ख) पोट-कलम (४) मध्ये,----
(एक) " शंभर रुपये " या मजकुराऐवजी, " एक हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(दोन) " दोनशे रुपये " या मजकुराऐवजी, " दोन हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(तीन) " तीनशे रुपये " या मजकुराऐवजी, " पाच हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
११. मुख्य अधिनियमाच्या कलम ३३ मधील,---
(अ) खंड (१) मध्ये, " दोनशे पन्नास रुपयापयर्ंतच्या " या मजकुराऐवजी, " पाच हजार रुपयापयर्ंतच्या " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(ब) खंड (२) मध्ये,----
सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३३ ची सुधारणा.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२०/फाल्गुन ९, शके १९४१ ५१२. मुख्य अधिनियमाच्या कलम ३४ मधील,---
(क) खंड (अ) मध्ये, " शंभर रुपये " या मजकुराऐवजी, " पाच हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३४ ची सुधारणा.
(ख) खंड (ब) मध्ये,----
(एक) " तीन महिने " या मजकुराऐवजी, " सहा महिने " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(दोन) " दोनशे रुपये " या मजकुराऐवजी, " दहा हजार रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
१३. मुख्य अधिनियमाच्या कलम ३८ मधील पोट-कलम (२) मध्ये,---
(क) खंड (ज) नंतर पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :----
" (ज-१) कलम १८क अन्वये, पारस्परिक नोंदणीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना, त्यासाठीची
सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३८ ची सुधारणा.
फी आणि पारस्परिक नोंदणी प्रमाणपत्राचा नमुना ;" ;
(ख) खंड (के) मध्ये, " दोन रुपयांची " या मजकुराऐवजी, " एक हजार रुपयांची " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२०/फाल्गुन ९, शके १९४१उद्देश व कारणे यांचे निवेदन.
महाराष्ट्र राज्यातील परिचारिकांची नोंदणी व प्रशिक्षण यांचे विनियमन करणा-या विधींचे एकत्रीकरण करणे आणि त्याबाबत अधिक चांगली तरतूद करणे यांकरिता महाराष्ट्र परिचारिका अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४०) अधिनियमित केला आहे. परिचारिका अधिनियमाच्या कलम ३ मध्ये, परिचारिका अधिनियमाच्या प्रयोजनार्थ त्यात विर्िनदिष्ट करण्यात आल्याप्रमाणे, विवक्षित पदसिद्ध सदस्य, निवडलेले सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य यांनी मिळून बनलेली, महाराष्ट्र शुश्रूषा परिषद प्रस्थापित करण्याची आणि तिचे विधिसंस्थापन करण्याची तरतूद आहे.
२. महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ अधिनियम, २०१३ (२०१३ चा महा. २३) अधिनियमित करून महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ स्थापन केले आहे. उक्त मंडळाची स्थापना केल्यानंतर, परिचारिका संस्थांना मंजुरी देणे किंवा संलग्नता देणे आणि परीक्षा घेणे यांच्याशी संबंधित काम, महाराष्ट्र शुश्रूषा परिषदेकडून उक्त मंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे आणि राज्यातील परिचारिकांची नोंदणी करण्यासंबंधीचे काम, महाराष्ट्र शुश्रूषा परिषदेकडे ठेवण्यात आले आहे. सध्या परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. तथापि शुश्रूषा व्यवसायाच्या हितासाठी, सुधारित रचनेसह, उक्त परिषदेची निवडणूक घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शुश्रूषा परिषदेच्या रचनेस मान्यता देणे आणि फी ची, शास्तीची रक्कम यात आणि अनर्हतेचे निकष यांत सुधारणा करणे देखील गरजेचे आहे.
ज्या परिचारिकांनी त्यांच्या मूळ राज्यात नोंदणी केलेली आहे परंतु, ज्या महाराष्ट्र राज्यात नोकरीसाठी स्थलांतर करीत आहेत, अशा परिचारिकांना नोंदणी करणे शक्य होईल, अशी कोणतीही तरतूद परिचारिका अधिनियमात नाही. त्यानुसार, अशा परिचारिकांची पारस्परिक नोंदणी करण्यासाठी उक्त परिचारिका अधिनियमात उचित तरतूद समाविष्ट करणे, आवश्यक आहे.
त्याकरिता, परिचारिका अधिनियमात योग्य त्या सुधारणा करणे इष्ट वाटते.
३. वरील उद्दिष्टये साध्य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.
मुंबई, दिनांक २५ फेब्रुवारी २०२०.
अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण मंत्री.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२०/फाल्गुन ९, शके १९४१ ७वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे ज्ञापन
या विधेयकात, वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचा पुढील प्रस्ताव अंतभर्ूत आहे :------
खंड ६.----- महाराष्ट्र परिचारिका अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४०) यामध्ये नवीन कलम १८अ समाविष्ट करणा-या या खंडान्वये, ज्या नमुन्यात महाराष्ट्र राज्य वगळता इतर राज्यात परिचारिका म्हणून नोंदणी करण्याकरिता अर्हताप्राप्त केलेल्या ज्या व्यक्तीची या अधिनियमांन्वये पारस्परिक नोंदणी प्राप्त करण्याची इच्छा असेल अशी कोणतीही व्यक्ती अर्ज करील तो नमुना, त्याची फी आणि पारस्परिक नोंदणी प्रमाणपत्राचा नमुना, विहित करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.
२. वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचा वर नमूद केलेला प्रस्ताव हा सामान्य स्वरुपाचा आहे.
विधान भवन :
राजेन्द्र भागवत,
मुंबई,
सचिव (कार्यभार),
दिनांक २८ फेब्रुवारी २०२०.
महाराष्ट्र विधानसभा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.