Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV (Dated the 9th March 2020) (Extra No. 11) (सन 2020 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 3. (मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक 9 मार्च 2020 रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.) महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम.

Published 09 March 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च ९, २०२०/फाल्गुन १९, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ६, अंक १०] सोमवार, मार्च ९, २०२०/फाल्गुन १९, शके १९४१ [पृष्ठे ६, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ११

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३.---- महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम ...

पृष्ठे १---६ दिनांक ८ मार्च २०२० रोजी मा. राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

------------------------------------- सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३. (मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर ""महाराष्ट्र शासन राजपत्रात"" दिनांक ९ मार्च

२०२० रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी

आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम.

ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठीचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :---

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम, २०२०, असे म्हणावे.

संक्षिप्त नाव, प्रयुक्ती व प्रारंभ.

(२) तो, राज्यात स्थित असलेल्या प्रत्येक शाळेस आणि अशा शाळेत नावनोंदणी केलेल्या प्रत्येक विद्याथ्र्याला लागू असेल.

व्याख्या.

(३) तो, राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियत करील अशा तारखेस अंमलात येईल. २. या अधिनियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर,--- (क) "अपिलीय प्राधिकारी" याचा अर्थ, कलम ७ अन्वये शासनाने नियुक्त केलेला अपिलीय प्राधिकारी, असा आहे;

(१)

भाग चार--११----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च ९, २०२०/फाल्गुन १९, शके १९४१ (ख) "सक्षम प्राधिकारी" याचा अर्थ, कलम ६ च्या पोट-कलम (१) अन्वये शासनाने नियुक्त केलेला सक्षम प्राधिकारी, असा आहे ;

(ग) "शासन" याचा अर्थ, महाराष्ट्र राज्य शासन, असा आहे ;

(घ) "अधिसूचना" याचा अर्थ, महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध केलेली अधिसूचना, असा आहे आणि "अधिसूचित" या शब्दाचा अन्वयार्थ त्यानुसार लावण्यात येईल ;

(ङ) "विहित" याचा अर्थ, शासनाने केलेल्या नियमांद्वारे विहित केलेला, असा आहे ;

(च) "अनुसूची" याचा अर्थ, या अधिनियमास जोडलेली अनुसूची, असा आहे ;

(छ) "शाळा" याचा अर्थ,-

(एक) राज्य शासनाद्वारे किंवा स्थानिक संस्थांद्वारे चालविलेल्या - अनुदानित किंवा विना-अनुदानित अथवा कायमस्वरुपी विनाअनुदानित ;

(दोन) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३० च्या खंड (१) अन्वये अल्पसंख्याक वर्गाने स्थापन केलेल्या व प्रशासन केलेल्या अल्पसंख्याक शाळेसह कोणत्याही खाजगी शैक्षणिक संस्थेने स्थापन केलेली, प्रशासन केलेली किंवा चालविलेली,--- मग तिला राज्याकडून अनुदान मिळत असो किंवा नसो;

(तीन) कोणत्याही आंग्ल-भारतीय शाळेची किंवा पौर्वात्य (ओरिएंटल) शाळेची अथवा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई), भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषदेशी (सीआयएससीई), आंतरराष्ट्रीय विद्यापीठ पदवीशी (बॅकलोरिएट) (आय बी), केंब्रिज मंडळाशी, आंतरराष्ट्रीय माध्यमिक शिक्षण सर्वसाधारण प्रमाणपत्राशी (आयजीसीएसई), राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थेशी (एनआयओएस), महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) किंवा इतर कोणत्याही शासकीय किंवा खाजगी शिक्षण मंडळाशी संलग्न असलेली ;

(चार) याबाबत शासनाद्वारे अधिसूचित करण्यात येईल अशी; किंवा

(पाच) महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ यान्वये २०१३ चा महा. १.

शासनाने मान्यता दिलेली, कोणतीही प्राथमिक, उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा, असा आहे.

स्पष्टीकरण :- या खंडाच्या प्रयोजनार्थ,-

(एक) प्राथमिक शाळेत, इयत्ता पहिली ते पाचवीचा समावेश असेल ;

(दोन) उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत, इयत्ता पहिली ते आठवीचा किंवा इयत्ता

सहावी ते आठवीचा समावेश असेल;

(तीन) माध्यमिक शाळेत, इयत्ता पहिली ते दहावीचा, सहावी ते दहावीचा किंवा इयत्ता नववी

ते दहावीचा समावेश असेल ;

(ज) "कलम" याचा अर्थ, या अधिनियमाचे कलम, असा आहे ;

(झ) "राज्य" याचा अर्थ, महाराष्ट्र राज्य, असा आहे.

मराठी एक सक्तीचा विषय असणे.

३. (१) मराठी भाषा हा, अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, शैक्षणिक वर्ष, २०२०-२१ पासून प्रारंभ करून टप्प्याटप्प्याने, राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपयर्ंत एक सक्तीचा विषय म्हणून शिकवण्यात येईल.

(२) मराठी भाषा हा विषय, शैक्षणिक वर्ष, २०२०-२०२१ पासून इयत्ता पहिली व सहावी मध्ये सुरू करण्यात येईल आणि अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, चढत्याक्रमाने पुढील वगार्ंसाठी लागू करण्यात येईल.

(३) मराठी भाषा विषयामधील विद्याथ्यार्ंचे मूल्यनिर्धारण, सर्व शाळांमध्ये करण्यात येईल.

(४) राज्यातील शाळांमध्ये, मराठी बोलण्यावर, एकतर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणतेही निबर्ंध लादण्यात येणार नाहीत.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च ९, २०२०/फाल्गुन १९, शके १९४१ ३

(५) मराठी भाषा बोलण्यावर निबर्ंध लादणारा, कोणताही फलक किंवा सूचना शाळांमध्ये प्रर्दशित करण्यात येणार नाही किंवा अभियान चालविण्यात येणार नाही.

ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची शर्त.

४. (१) जेव्हा शाळेस, शासनाकडून मान्यतेची किंवा ना-हरकत प्रमाणपत्राची अथवा दोन्हींची आवश्यकता असते तेव्हा, या अधिनियमाच्या तरतुदींनुसार, मराठी भाषा विषयातील विद्याथ्यार्ंचे सक्तीचे अध्यापन व मूल्यनिर्धारण ही, अशी मान्यता किंवा असे प्रमाणपत्र देण्याची एक शर्त असेल.

(२) जी शाळा, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेस आधीच अस्तित्वात आहे आणि जी, एक सक्तीचा विषय म्हणून मराठी शिकवित नाही, अशा शाळेची मान्यता किंवा ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल आणि अशी शाळा ज्याच्याशी संलग्न आहे त्या संबंधित मंडळांना किंवा प्राधिकरणांना तशा अर्थाची सूचनादेखील पाठविण्यात येईल.

५. प्रत्येक शाळा, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, शासनाने विर्िनदिष्ट केलेल्या अभ्यासक्रमाचे अनुसरण राज्य शासनाचा अभ्यासक्रम.

करील.

सक्षम प्राधिकारी.

६. (१) शासनास, या अधिनियमाच्या व त्यान्वये केलेल्या नियमांच्या तरतुदी अंमलात आणण्याच्या प्रयोजनांसाठी, जिल्हा शिक्षण अधिकायाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या, शालेय शिक्षण विभागाच्या अधिकायाची, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करता येईल. वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळया सक्षम प्राधिकायांची नियुक्ती करता येईल.

(२) सक्षम प्राधिकारी, विहित करण्यात येतील अशा अधिकारांचा वापर करील व अशी कर्तव्ये पार पाडील.

अपिलीय प्राधिकारी.

७. शासनास, सक्षम प्राधिकायाच्या कोणत्याही आदेशाविरुद्धच्या किंवा निर्णयाविरुद्धच्या अपिलांवर निर्णय देण्याच्या प्रयोजनार्थ, उप संचालक (शिक्षण) याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या, शालेय शिक्षण विभागाच्या अधिकायाची, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, अपिलीय प्राधिकारी म्हणून नियुक्ती करता येईल.

अपील.

८. (१) कलम १२ च्या पोट-कलम (१) अन्वये लादलेल्या शास्तीसह सक्षम प्राधिकायाच्या कोणत्याही आदेशामुळे किंवा निर्णयामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, सक्षम प्राधिकायाचा आदेश किंवा निर्णय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत, अपिलीय प्राधिकायाकडे अपील दाखल करता येईल :

परंतु, अपिलीय प्राधिकायास, उक्त कालावधीच्या आत अपील दाखल न करण्यासाठी अपीलकाराकडे पुरेसे कारण होते याबद्दल त्याची खात्री पटली असेल तर, तीस दिवसांच्या उक्त कालावधीच्या समाप्तीनंतर दाखल केलेले असे कोणतेही अपील, दाखल करून घेता येईल.

(२) अपिलीय प्राधिकारी, अपील निकालात काढण्यापूर्वी, अपीलकारास, म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देईल.

(३) अपिलावरील अपिलीय प्राधिकायाचा निर्णय अंतिम असेल.

निदेश देण्याचा शासनाचा अधिकार.

९. (१) (क) शासनास, लोकहितार्थ, आदेशाद्वारे, सक्षम प्राधिकायास, आदेशामध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कोणत्याही प्रकरणी, या अधिनियमान्वये चौकशी करण्याचा किंवा यथोचित कार्यवाही हाती घेण्याचा निदेश देता येईल, आणि सक्षम प्राधिकारी, त्याने केलेल्या चौकशीचा किंवा, यथास्थिति, हाती घेतलेल्या कार्यवाहीचा निर्णय, विहित करण्यात येईल अशा कालावधीत शासनास कळवील.

(ख) खंड (क) अन्वये सक्षम प्राधिकायाकडून अहवाल प्राप्त झाल्यावर, शासन, त्यास योग्य वाटतील असे निदेश देईल आणि असे निदेश, अंतिम व बंधनकारक असतील.

(२) शासनास, या अधिनियमाच्या सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही तरतुदींचे किंवा त्यान्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे, अधिसूचनेचे किंवा दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यास दिसून येतील असे निदेश, अशा इतर प्राधिकायास देता येतील आणि असा प्राधिकारी, अशा प्रत्येक निदेशाचे अनुपालन करील.

अधिकारतेस रोध.

१०. या अधिनियमाच्या तरतुदींन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास किंवा हाती घेतलेल्या कोणत्याही कार्यवाहीस, कोणत्याही न्यायालयात, कोणत्याही दाव्यात किंवा अर्जात, आव्हान देता येणार नाही आणि या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकारा अनुसार केलेल्या कोणत्याही कारवाईच्या बाबतीत, कोणत्याही न्यायालयाद्वारे कोणताही मनाईहुकूम देण्यात येणार नाही.

भाग चार--११-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च ९, २०२०/फाल्गुन १९, शके १९४१ सूट देणे. ११. (१) शासनास, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे, आणि अशा आदेशात विर्िनदिष्ट करावयाच्या, त्यास योग्य वाटतील अशा शतर्ींस अधीन राहून, या अधिनियमाच्या सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही तरतुदींमधून, कोणत्याही विद्याथ्र्यास किंवा विद्याथ्यार्ंच्या कोणत्याही वर्गास, एकतर अंशत: किंवा संपूर्णत: सूट देता येईल.

(२) पोट-कलम (१) खालील अधिकाराचा, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे शासनाने विशेषरीत्या अधिकार प्रदान केलेल्या, उप संचालक, शालेय शिक्षण याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या, शासनाच्या अशा अधिकायाकडूनदेखील वापर करता येईल.

१२. (१) या अधिनियमाच्या तरतुदींचे, त्यान्वये केलेल्या नियमांचे किंवा काढलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाया शाळेच्या कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार असलेला व्यवस्थापकीय संचालक किंवा इतर कोणतीही व्यक्ती, एक लाख रुपयांपयर्ंतच्या शास्तीस पात्र असेल.

अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल शास्ती.

(२) सक्षम प्राधिकारी, पोट-कलम (१) खालील शास्ती लादण्याकरिता सक्षम असेल :

परंतु, सक्षम प्राधिकारी, या पोट-कलमान्वये कोणताही आदेश संमत करण्यापूर्वी, त्या व्यक्तीला, म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देईल.

(३) शिक्षण संचालकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकायास, विहित करण्यात येईल अशा रीतीने, अशी शास्ती वसूल करता येईल.

अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार.

१३. (१) शासनास, जर तसे करणे इष्ट किंवा आवश्यक आहे असे त्याचे मत असेल तर, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, अनुसूचीत जादा भर घालता येईल किंवा फेरबदल करता येईल किंवा सुधारणा करता येईल आणि त्यानंतर, त्यानुसार अनुसूचीत सुधारणा केली असल्याचे समजण्यात येईल.

(२) पोट-कलम (१) अन्वये काढलेली अशी कोणतीही अधिसूचना, ती काढण्यात आल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल.

अधिभावी परिणाम.

१४. या अधिनियमाच्या तरतुदी, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यामध्ये अथवा त्यान्वये केलेल्या नियमांमध्ये किंवा काढलेल्या आदेशांमध्ये त्याच्याशी विसंगत असलेली कोणतीही गोष्ट अंतभर्ूत असली तरी, परिणामक असतील.

सद्भावपूर्वक केलेल्या कृत्यांस संरक्षण.

१५. या अधिनियमाअन्वये किंवा त्यान्वये केलेल्या नियमांन्वये किंवा काढलेल्या आदेशांन्वये सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचे उद्देशित असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल, शासनाविरुद्ध, शासनाच्या कोणत्याही अधिकायाविरुद्ध किंवा प्राधिकायाविरुद्ध किंवा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कोणताही दावा, खटला किंवा अन्य कायदेशीर कार्यवाही दाखल करणार नाही.

१६. (१) राज्य शासनास, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, आणि नियम करण्याचा अधिकार. पूर्वप्रसिद्धीच्या शर्तीस अधीन राहून, नियम करता येतील.

(२) या अधिनियमान्वये केलेला प्रत्येक नियम, तो केल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाचे अधिवेशन चालू असताना, एकाच अधिवेशनात किंवा लागोपाठच्या दोन किंवा अधिक अधिवेशनात मिळून एकूण तीस दिवसांचा होईल इतक्या कालावधीकरिता, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल, आणि ज्या अधिवेशनात तो अशा रीतीने ठेवण्यात आला असेल ते अधिवेशन किंवा त्याच्या लगतनंतरचे अधिवेशन समाप्त होण्यापूर्वी, जर त्या नियमात कोणताही फेरबदल करण्याबाबत दोन्ही सभागृहे सहमत होतील किंवा तो नियम करण्यात येऊ नये याबाबत दोन्ही सभागृहे सहमत होतील आणि असा निर्णय, राजपत्रात अधिसूचित करतील तर, तो नियम, अशी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्याच्या दिनांकापासून केवळ अशा फेरबदल केलेल्या स्वरूपातच अंमलात येईल, किंवा, यथास्थिति, तो अंमलात येणार नाही; तथापि, अशा कोणत्याही फेरबदलामुळे किंवा विलोपनामुळे, त्या नियमान्वये पूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वगळलेल्या कोणत्याही गोष्टींच्या विधिग्रातेस बाध येणार नाही.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च ९, २०२०/फाल्गुन १९, शके १९४१ ५

अडचणी दूर करण्याचा अधिकार.

१७. (१) या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, राज्य शासनास, प्रसंगानुरूप, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजनांसाठी आवश्यक किंवा इष्ट वाटेल अशी, या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसणारी कोणतीही गोष्ट करता येईल :

परंतु, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून दोन वषार्ंचा कालावधी समाप्त झाल्यानंतर, असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.

(२) पोट-कलम (१) अन्वये काढलेला प्रत्येक आदेश, तो काढण्यात आल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे मांडण्यात येईल.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च ९, २०२०/फाल्गुन १९, शके १९४१

अनुसूची

(कलम ३ पहा)

एक. प्राथमिक स्तर (इयत्ता पहिली ते पाचवी)

मराठी भाषा, २०२०-२०२१ या वर्षापासून पुढे इयत्ता पहिलीमध्ये सक्तीचा विषय म्हणून सुरू करण्यात येईल आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी, ती पुढील वगार्ंना खालीलप्रमाणे चढत्या क्रमाने लागू करण्यात येईल :---

अनु.क्र. इयत्ता शैक्षणिक वर्ष
१. पहिली २०२०-२०२१
२. दुसरी २०२१-२०२२
३. तिसरी २०२२-२०२३
४. चौथी २०२३-२०२४
५. पाचवी २०२४-२०२५

दोन. उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा स्तर (इयत्ता सहावी ते दहावी)

मराठी भाषा, २०२०-२०२१ या वर्षापासून पुढे इयत्ता सहावीमध्ये सक्तीचा विषय म्हणून सुरू करण्यात येईल आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी, ती पुढील वगार्ंना खालीलप्रमाणे चढत्या क्रमाने लागू करण्यात येईल :---

अनु.क्र. इयत्ता शैक्षणिक वर्ष
१. सहावी २०२०-२०२१
२. सातवी २०२१-२०२२
३. आठवी २०२२-२०२३
४. नववी २०२३-२०२४
५. दहावी २०२४-२०२५

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.