Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ext. 85) (11th Mar. 2020) (महिला व बाल विकास विभाग) (महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३) (सदस्यपदी नियुक्ती)

Published 11 March 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ११, २०२०/फाल्गुन २१, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ६, अंक २९] बुधवार, मार्च ११, २०२०/फाल्गुन २१, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ८५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महिला व बाल विकास विभाग मंत्रालय, नवीन प्रशासन भवन, तिसरा मजला मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ मार्च २०२०

अधिसूचना

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३.

क्रमांक रामआ-२०२०/प्र.क्र.०२/का-१०.– ज्याअर्थी, राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ (१९९३ चा महा. १५) (ज्याचा उल्लेख यानंतर "उक्त अधिनियम" असा करण्यात आलेला आहे) च्या कलम-३ मधील उप कलम (१) आणि उपकलम (२) मधील खंड (अ) आणि (ब) आणि कलम ४ मधील उपकलम १ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून शासन अधिसूचना, महिला व बाल विकास विभाग क्रमांक रामआ-२०१८/प्र.क्र. १२२/का-१०, दि. १८ फेब्रुवारी, २०१९ व शासन अधिसूचना, महिला व बाल विकास विभाग क्रमांक रामआ-२०१८/प्र.क्र. १२२/का-१०, दि. १३ सप्टेंबर, २०१९ अन्वये अनुक्रमे श्रीमती विजया रहाटकर, औरंगाबाद यांची अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला आयोग या पदी (ज्याचा उल्लेख यानंतर "उक्त आयोग" असा करण्यात आला आहे) आणि श्रीमती चंद्रिका चौहान, श्रीमती अनुसया गुप्ता, श्रीमती ज्योती हरिशचंद्र भोये, श्रीमती रोहिणी नायडू, श्रीमती रीदा रशिद आणि श्रीमती गयाताई कराड यांची उक्त आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्रमांक २१९/२०१३ या प्रकरणी दि. २२ जानेवारी, २०२० रोजी आदेश दिले आहेत की, जर विद्यमान राजकीय व्यवस्था आपल्या पसंतीचा अध्यक्ष नियुक्त करण्यास इच्छुक असेल तर कायदेविषयक तरतुदी विचारात घेता, अध्यक्ष आपल्या पदावर कायम राहून कामकाज पाहू शकत नाहीत. तसेच मा. उच्च न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले आहे की, पुढील सुनावणीपूर्वी नवीन अध्यक्ष नियुक्तीबाबत मा. न्यायालयास अवगत करण्यात यावे ;

आणि ज्याअर्थी, श्रीमती विजया किशोर रहाटकर, यांनी मा. उच्च न्यायालयाच्या उपरोक्त आदेशाविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष सवलत याचिका (दिवाणी) डायरी क्र. ३४४९/२०२० नुसार दाखल केलेली याचिका दिनांक ४ फेब्रुवारी, २०२० रोजीच्या आदेशान्वये खारिज केली आहे ;

भाग चार ब- ८५---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ११, २०२०/फाल्गुन २१, शके १९४१ आणि ज्याअर्थी, श्रीमती विजया किशोर रहाटकर यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला असून त्यांचा राजीनामा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेला आहे;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने आयोगाच्या उक्त सदस्यांची नियुक्ती रद्द करणेबाबतचा निर्णय घेतला आहे;

आता त्याअर्थी, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ (१९९३ चा महा. १५) च्या कलम-४ मधील उप कलम (३) व त्यानुषंगाने प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन यान्वये श्रीमती चंद्रिका चौहान, श्रीमती अनुसया गुप्ता, श्रीमती ज्योती हरिशचंद्र भोये, श्रीमती रोहिणी नायडू, श्रीमती रीदा रशिद आणि श्रीमती गयाताई कराड यांची उक्त आयोगाच्या सदस्य पदावरील नियुक्ती समाप्त करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने,

ला. रा. गुजर, शासनाचे सहसचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ११, २०२०/फाल्गुन २१, शके १९४१ ३

WOMEN AND CHILD DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, New Administrative Building,

3rd Floor, Mumbai 400 032, dated the 11th March 2020

NOTIFICATION

MAHARASHTRA STATE COMMISSION FOR WOMEN ACT, 1993.

No. RMA-2020/C.R. 02/Desk-10.— Whereas, the Government of Maharashtra has, vide the Government Notification, Women and Child Development Department, No. RMA-2018/C.R. 122/ Desk-10, dated the 18th February, 2019 and the Government Notification, Women and Child Development Department, No. RMA-2018/C.R.122/Desk-10, dated the 13th September, 2019, issued in exercise of the powers conferred by sub-section (1) and clauses (a) and (b) of sub-section (3) of section 3 and sub-section (1) of section 4 of the Maharashtra State Commission for Women Act, 1993 (Mah. XV of 1993) (hereinafter referred to as "the said Act"), nominated Smt.Vijaya Rahatkar, Aurangabad as a Chairperson of the Maharashtra State Commission for Women (hereinafter referred to as "the said Commission") and nominated Smt. Chandrika Chauhan, Smt. Anusaya Gupta, Smt. Jyoti Harischandra Bhoye, Smt. Rohini Nayadu, Smt. Rida Rashid and Smt. Gayatai Karad as Members on the said Commission, respectively ;

And Whereas, the Bombay High Court in Public Interest Litigation No. 219 of 2013 vide order dated 22nd January, 2020 held that the position in law that the Chairperson cannot continue and hold the office when the present political dispensation is keen to appoint a Chairperson of its choice and the High Court has also observed that before the next date the court will be informed about the appointment of the new Chairperson ;

And Whereas, Special Leave Petition (Civil) diary No. 3449 of 2020 filed in the Supreme Court by Smt. Vijaya Kishor Rahatkar against the aforesaid order of the High Court has been dismissed vide order dated the 4th February, 2020.

And Whereas, Smt. Vijaya Kishor Rahatkar has resigned from the post of the Chairperson and her resignation has been accepted by the Government;

And Whereas, the Government of Maharashtra has taken a decision to remove the said Members of the Commission ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (3) of section 4 of the Maharashtra State Commission For Women Act, 1993 (Mah. XV of 1993) and of all other powers४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ११, २०२०/फाल्गुन २१, शके १९४१ enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby removes Smt. Chandrika Chauhan, Smt. Anusaya Gupta, Smt. Jyoti Harischandra Bhoye, Smt. Rohini Nayadu, Smt. Rida Rashid and Smt. Gayatai Karad from the offices of the Members of the said Commission.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

L. R. GUJAR,

Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.