Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part V Extra No. 15 (12-03-2020) सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29, महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.

Published 12 March 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-12.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १२, २०२०/फाल्गुन २२, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष ६, अंक ७] गुरूवार, मार्च १२, २०२०/फाल्गुन २२, शके १९४१ [पृष्ठे ६, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानसभेत दिनांक १२ मार्च, २०२० रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :----

L. A. BILL No. XXIX OF 2020.

A BILL

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA LEGISLATURE MEMBERS'

SALARIES AND ALLOWANCES ACT.

सन २०२० चे विधानसभा विधेयक क्रमांक २९.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम यात आणखी सुधारणा

करण्यासाठी विधेयक.

१९५६ चा ४९.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-----

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते (सुधारणा) अधिनियम, संक्षिप्त नाव व प्रारंभ. २०२०, असे म्हणावे.

(१)

भाग पाच----१५-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १२, २०२०/फाल्गुन २२, शके १९४१ (२) तो, दिनांक १ जानेवारी २०२० पासून अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

२. महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम याच्या कलम ६ मधील, पोट-कलम १९५६ चा ४९.

(५) नंतर, पुढील पोट-कलम जादा दाखल करण्यात येईल :-----

सन १९५६ चा अधिनियम क्रमांक ४९ याच्या कलम ६ ची सुधारणा.

सन २०२० चा महा.

"" (६) महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते (सुधारणा) अधिनियम, २०२० याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून, प्रत्येक सदस्य, वाहनचालकाची सेवा मोफत मिळण्यास हक्कदार असेल. या प्रयोजनासाठी, सदस्यास, वैध वाहनचालन अनुज्ञप्ती (लायसन) धारण करणा-या आणि जिचे वय वर्षे साठ पूर्ण झालेले नाही, अशा कोणत्याही व्यक्तीची, वाहनचालक म्हणून नियुक्ती करता येईल. अशा प्रकारे नियुक्त केलेल्या वाहनचालकास, शासनाने, वेळोवेळी काढलेल्या आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करता येईल, असे ठराविक वेतन दरमहा मिळेल."".

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १२, २०२०/फाल्गुन २२, शके १९४१ ३

उद्देश व कारणे यांचे निवेदन.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम (१९५६ चा महा. ४९) यात, महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत तरतूद आहे. तसेच उक्त अधिनियमात राज्य विधानमंडळाच्या सदस्यांना इतर सुविधा पुरविण्याची देखील तरतूद आहे. तथापि, राज्य विधानमंडळाच्या सदस्यांकरिता वाहनचालकाच्या सेवेची तरतूद उक्त अधिनियमात नाही. वाहनचालकाची सुविधा, भत्ता म्हणून मिळण्याची मागणी, विधानमंडळाच्या सदस्यांकडून केली जात आहे. याबाबतची मागणी विचारात घेता, शासनास अशी तरतूद करणे इष्ट वाटते की, राज्य विधानमंडळाचा प्रत्येक सदस्य वाहन चालकाची सेवा मोफत मिळण्यास हक्कदार असेल आणि या प्रयोजनासाठी सदस्यास, वैध वाहनचालन अनुज्ञप्ती (लायसन) धारण करणा-या आणि वयाची ६० वर्षे पूर्ण न केलेल्या, कोणत्याही व्यक्तीची, वाहन चालक म्हणून नियुक्ती करता येईल आणि अशा प्रकारे नियुक्त केलेल्या वाहनचालकास, आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करण्यात येईल, असे ठराविक वेतन दरमहा मिळेल. सध्या अशा वाहनचालकास दरमहा रुपये पंधरा हजार इतके ठराविक वेतन देण्याचे निश्चित केले आहे. या प्रयोजनाकरिता, उक्त अधिनियमाच्या कलम ६ मध्ये योग्य त्या सुधारणा करण्यात येत आहे.

म्हणून, हे विधेयक सादर करण्यात येत आहे.

मुंबई,

अनिल परब,

दिनांक ११ मार्च २०२०.

संसदीय कार्य मंत्री.

भाग पाच----१५-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १२, २०२०/फाल्गुन २२, शके १९४१

वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे ज्ञापन

या विधेयकात, वैधानिक अधिकार सोपविण्याचा पुढील प्रस्ताव अंतभर्ूत आहे :----

खंड (२).----महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम, (१९५६ चा ४९) याच्या कलम ६ मध्ये, नवीन पोट-कलम (६) जादा दाखल करण्याचा हेतू असलेल्या या खंडान्वये, राज्य विधानमंडळाच्या सदस्यांनी नियुक्त केलेल्या वाहन चालकांना, प्रदेय असलेले ठराविक वेतन, आदेशाद्वारे, विर्िनदिष्ट करण्याचा अधिकारी राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.

२. वैधानिक अधिकार सोपविण्याचा वर नमूद केलेला प्रस्ताव सामान्य स्वरूपाचा आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १२, २०२०/फाल्गुन २२, शके १९४१ ५

वित्तीय ज्ञापन

या विधेयकाच्या खंड २ मध्ये, राज्य विधानमंडळाचा प्रत्येक सदस्य वाहनचालकाची सेवा मोफत मिळण्यास हक्कदार असल्याबाबत तरतूद आहे आणि या प्रयोजनासाठी, सदस्यास, वाहनचालक म्हणून ज्या व्यक्तीने वैध वाहनचालक अनूज्ञप्ती (लायसन) धारण केलेली आहे आणि जिचे वय वर्षे ६० पूर्ण केलेले नाही, अशा व्यक्तीची नियुक्ती करता येईल. अशारीतीने, नियुक्त केलेल्या वाहनचालकास, राज्य शासन, आदेशाद्वारे, वेळोवेळी निश्चित करील त्याप्रमाणे दरमहा वेतन मिळेल. सध्या अशा वाहनचालकास दरमहा रुपये पंधरा हजार इतके ठराविक वेतन देण्याचे निश्चित केले आहे. हे विधेयक राज्य विधानमंडळाचा अधिनियम म्हणून अधिनियमित झाल्यावर राज्याच्या एकत्रित निधीतून या प्रयोजनाकरिता दरवर्षी अंदाजे ६.६० कोटी रुपये इतका आवर्ती खर्च होणार आहे.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १२, २०२०/फाल्गुन २२, शके १९४१

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ अन्वये राज्यपालांची शिफारस

(महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग, आदेशाची प्रत)

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ याच्या खंड (३) अन्वये महाराष्ट्राच्या राज्यपालांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, ते महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते (सुधारणा) विचारार्थ घेण्याबाबत महाराष्ट्र विधानसभेस शिफारस करीत आहेत.

विधान भवन : मुंबई, दिनांक १२ मार्च, २०२०.

राजेन्द्र भागवत, सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-12.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-12.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-.