Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part V (Ext. No. 17) (13th March 2020) (सन 2020 चे विधानपरिषद विधेयक क्र. 2)

Published 13 March 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १३, २०२०/फाल्गुन २३, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष ६, अंक ८(२)] शुक्रवार, मार्च १३, २०२०/फाल्गुन २३, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानपरिषदेत दिनांक १३ मार्च २०२० रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानपरिषद नियम १११ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :----

L. C. BILL No. II OF 2020.

A BILL

FURTHER TO AMEND THE DR. BABASAHEB AMBEDKAR TECHNOLOGICAL UNIVERSITY ACT, 2014.

सन २०२० चे विधानपरिषद विधेयक क्रमांक २.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४

यात आणखी सुधारणा करण्याकरिता विधेयक.

सन २०१४ चा महा. २९.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनाकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४, यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :---

१. (१) या अधिनियमास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, संक्षिप्त नाव व प्रारंभ.

२०२० असे म्हणावे.

(२) तो ताबडतोब अंमलात येईल.

भाग पाच---१७-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १३, २०२०/फाल्गुन २३, शके १९४१ २. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ (यात यापुढे, ज्याचा निर्देश 'मुख्य अधिनियम' असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (३) मध्ये 'वास्तुशास्त्र' या मजकुरानंतर, ", व्यवसाय व्यवस्थापन" हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २९ याच्या कलम ३ ची सुधारणा.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ४ मध्ये,---

(१) पोट-कलम (२) मधील "अशा व्यवस्थापनाखेरीज" हा मजकूर वगळण्यात येईल.

(२) पोट-कलम (३) मधील "व्यवस्थापनाखेरीजच्या" हा मजकूर वगळण्यात येईल.

सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २९ याच्या कलम ४ ची सुधारणा.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १३, २०२०/फाल्गुन २३, शके १९४१ ३

उद्देश व कारणे यांचे निवेदन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम करण्यामागील शासनाची भूमिका मागास क्षेत्रांमध्ये तंत्रशास्त्राचा प्रसार करून विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे तसेच, उच्च शिक्षणासाठी, संशोधनासाठी किंवा विशेषीकृत अभ्यासक्रम राबविणे ही होती. सदरहू अधिनियम अस्तित्वात आला त्यावेळी त्यात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, वास्तुशास्त्र परिषद किंवा औषधविद्याशास्त्र परिषद यांच्या कार्यकक्षेखाली येणाया पदवी किंवा त्यावरील स्तरावरील विविध अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा अंतर्भाव नाही. काळानुरूप सद्य:स्थितीत व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाची आवश्यकता असल्याने व त्या अभ्यासक्रमाचा दर्जा वाढविण्याची गरज असल्याने 'व्यवसाय व्यवस्थापन' या अभ्यासक्रमाचा उक्त अधिनियमात अंतर्भाव करणे आवश्यक झाले आहे.

म्हणून हे सुधारणा विधेयक प्रस्तावित करण्यात आले आहे.

नागोराव गाणार, प्रभारी सदस्य.

विधान भवन : मुंबई, दिनांक ९ जानेवारी २०२०.

विधान भवन : मुंबई, दिनांक १३ मार्च २०२०.

राजेन्द्र भागवत, सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानपरिषद.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-.