RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक २५] सोमवार, मार्च १६, २०२०/फाल्गुन २६, शके १९४१ [पृष्ठे ५, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ४५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सार्वजनिक आरोग्य विभाग गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल, १० वा मजला, नवीन मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १४ मार्च २०२०.
अधिसूचना
क्रमांक करोना २०२०/प्र क्र ५८/ आरोग्य ५.-----ज्याअर्थी महाराष्ट्र राज्यात दिनांक १३ मार्च २०२० च्या अधिसूचनेनुसार, अधिसूचनेच्या दिनांकापासून साथरोग अधिनियम, १८९७ ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे, त्याअर्थी साथरोग अधिनियम, १८९७ च्या खंड २, ३ व ४ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासन राज्यात करोना विषाणुमुळे (COVID 19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी खालीलप्रमाणे नियम प्रसिद्ध करीत आहे :-----
१. या नियमांना " महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२० " असे संबोधण्यात येईल.
२. " कोव्हीड-१९ " म्हणजे भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटनेने परिभाषित केल्यानुसार सिव्हीअर अॅक्यूट रेस्पीरेटरी सिंड्रोम करोना व्हायरस २ (सार्स कोव्ही २).
३. साथरोग अधिनियमाच्या खंड २ (१) नुसार आयुक्त, आरोग्य सेवा, संचालक, आरोग्य सेवा १, संचालक, आरोग्य सेवा २, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, सर्व विभागीय आयुक्त महसूल विभाग, सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात येत आहे व त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी ते सक्षम असतील.
४. सक्षम प्राधिकायांनी घोषित केलेल्या सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात करोना विषाणू संशयित रुग्णांची तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येईल.
५. सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांनी सदर रुग्णांची तपासणी करतांना त्यांनी करोना विषाणूबाधित इतर देशात प्रवास केला होता किंवा कसे याबाबत नोंदी घेतील. त्याचप्रमाणे सदर रुग्णांचा संपर्क संशयित किंवा संसर्गग्रस्त व्यक्तीशी आल्याची नोंद ठेवण्यात येईल. वरीलप्रमाणे घेण्यात आलेली रुग्णांची माहिती तातडीने एकात्मिक रोग सर्वेक्षण केंद्र, पुणे तसेच संबंधित जिल्हाधिकारी / आयुक्त, महानगरपालिका यांना सादर करणे आवश्यक राहील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च १६, २०२०/फाल्गुन २६, शके १९४१ २(i) प्रवाशाने करोना बाधित प्रदेशात मागील १४ दिवसांच्या कालावधीत प्रवास केल्याचा इतिहास असल्यास व रुग्णास करोना बाधा झाल्याची लक्षणे नसल्यास त्यांना तपासणी दिनांकापासून पुढील १४ दिवस स्वत:च्या घरात अलगीकरण करून रहाणे आवश्यक राहील. स्वत:च्या घरात अलगीकरण करून रहातांना त्यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी अलगीकरणाबाबत दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे त्यांचेवर बंधनकारक असेल. केंद्र शासनाच्या अलगीकरणासंबंधीच्या सूचनांचे स्वत:च्या घरात अलगीकरणासाठी पालन न करणाया रुग्णांना राज्य शासनाने कार्यान्वित केलेल्या अलगीकरण कक्षात भरती करण्यात येईल.
(ii) ज्या प्रवाशांना करोना बाधित प्रदेशातील प्रवासाचा इतिहास असेल व त्यांना कोव्हीड १९ संसर्गाबाबत निश्चित केलेल्या व्याखेनुसार रोगलक्षणे दिसत असतील तर त्यांना अलगीकरणाबाबत विर्िनदिष्ट उपचारपद्धतीनुसार शासकीय रुग्णालयातील स्वतंत्र विलगीकरण कक्षात भरती करण्यात यावे व त्यांची कोव्हीड १९साठी प्रयोगशाळा तपासणी व औषधोपचार सुरू करण्यात यावा.
सदर अलगीकरण व विलगीकरण सूचनांमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार वेळोवेळी झालेले बदल लागू राहतील.
६. कोणत्याही व्यक्तीस / संस्था / संघटनांना कोव्हीड १९ बाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनधिकृत माहिती ईलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. याबाबत आयुक्त, आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक, आरोग्य सेवा, मुंबई, संचालक, आरोग्य सेवा, पुणे व संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचेमार्फतच अधिकृत माहितीचे प्रसारण करण्यात येईल. याबाबतची कोणतीही अनधिकृत माहिती अथवा अफवा पसरविणाया व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहील.
७. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी प्राधिकृत केलेल्या प्रयोगशाळेमधूनच कोव्हीड १९ बाबतच्या नमुने गोळा करण्यात येतील व भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी प्राधिकृत केलेल्या प्रयोगशाळांमधूनच या नमुन्यांची तपासणी केली जाईल.
८. मागील १४ दिवसांत ज्या व्यक्ती करोना बाधित देशातून प्रवास करून आलेल्या असतील त्यांनी स्वत:हून याबाबतची माहिती करोना नियंत्रणासाठीचा राज्य नियंत्रण कक्ष (०२० - २६१२ ७३९४), एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष (०२० - २७२९ ००६६) किंवा टोल फ्री क्रमांक १०४ किंवा यासाठी प्राधिकृत अधिकायांनी दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर कळविणे आवश्यक राहील जेणेकरून त्या अनुषंगाने आवश्यक उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधिकृत अधिकारी आयुक्त, आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक, आरोग्य सेवा, मुंबई, संचालक, आरोग्य सेवा, पुणे व संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचेमार्फतच त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये करतील.
९. वरीलप्रमाणे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ नुसार प्राधिकृत अधिकारी यांना प्रवाशांचे अलगीकरण व जागतिक आरोग्य संघटना किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी कोव्हीड १९ बाधित रोग व्याखेत नमूद केलेली लक्षणे असल्यास सदर संशयित रुग्णांना शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्याचे अधिकार राहतील. अलगीकरण किंवा रुग्णालयात विलगीकरणास मज्जाव / प्रतिबंध / अडथळा आणणायांविरुद्ध सक्षम प्राधिकायामार्फत भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल.
१०. एखाद्या भौगोलिक क्षेत्र उदाहरणार्थ गांव, शहर, तालुका, वॉर्ड, कॉलनी इत्यादी मध्ये कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव / उद्रेक आढळल्यास अशा उद्रेकजन्य क्षेत्राबाबत खाली नमूद केलेल्या तसेच प्रसंगानुसार आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त सक्षम प्राधिकारी असतील. अशा भौगोलिक क्षेत्रांच्या बाबतीत :----
(अ) क्षेत्र प्रतिबंधित करणे
(आ) क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधित करणे
(इ) क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करणे
(ई) क्षेत्रातील शाळा, कार्यालये, सिनेमागृहे, नाटयगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार सामुदायिक कार्यक्रमास प्रतिबंध करणे.
(उ) कोव्हीड १९ बाधितांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्वेक्षण करणे
(ऊ) संशयित व त्यांचे संपर्कातील व्यक्तींचे आवश्यकतेनुसार रुग्णालयात विलगीकरण करणे
(ए) शासकीय किंवा खाजगी इमारत / मत्ता अलगीकरणासाठी आवश्यकतेनुसार नामनिर्देशीत करणे
(ऐ) कोव्हीड १९चा प्रादुर्भाव व प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या मार्गदर्शक उपायोजना व सूचनांची अंमलबजावणी करणे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च १६, २०२०/फाल्गुन २६, शके १९४१ ३जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त यांना अशा क्षेत्रामधील सर्व शासकीय विभाग / संस्थांच्या आस्थापनेवरील कर्मचायांच्या सेवा किंवा निर्देशीत करतील अशी कोणत्याही व्यक्तीच्या सेवा कोव्हीड १९ या रोगाचे नियंत्रण / प्रतिबंधात्मक / आपत्कालीन उपाययोजना करण्याचे कामासाठी आवश्यकतेनुसार अधिग्रहीत करता येतील.
११. कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांनी या नियमावलीतील नियमांचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील व या नियमावलीनुसार प्राधिकृत अधिकारी उपरोक्तनुसार व वेळोवेळी शासनाने या नियमानुसार दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणायाविरुद्ध दंडनीय कारवाई करण्यास सक्षम असेल.
१२. या नियमावलीची अंमलबजावणी करणाया प्राधिकृत अधिकायाविरुद्ध कोव्हीड १९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदभावनेने केलेल्या किंवा करण्यात येणाया कृतीबद्दल अंमलबजावणीच्या अनुषंगाने अन्यथा दोषी नाही तोपयर्ंत कोणतीही कायदेशीर कारवाई अथवा गुन्हे दाखल करता येणार नाही.
१३. सदर नियमावली ही अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून तात्काळ अंमलात येईल व अधिसूचनेच्या दिनांकापासून पुढील एक वर्ष किंवा आवश्यकतेनुसार पुढील आदेशापयर्ंत अस्तित्वात राहील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
डॉ. प्रदीप व्यास,
शासनाचे प्रधान सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च १६, २०२०/फाल्गुन २६, शके १९४१ ४PUBLIC HEALTH DEPARTMENT
G. T. Hospital Compound, 10th Floor, New Mantralaya,
Mumbai 400 001, dated 14th March, 2020
NOTIFICATION
No. Corona-2020/CR-58/Aarogya-5.—Whereas State Government has decided to invoke provisions of Epidemic Disease Act, 1897 vide Notification No. Corona 2020/CR-58/Aarogya-5, dated 13th March, 2020 from the date of issue of the notification,
Therefore in exercise of the powers conferred under section 2, 3 and 4 of the Epidemic Diseases Act, 1897, Government of Maharashtra is pleased to frame following Regulations for prevention and containment of Coronavirus Disease-2019 (COVID-19).
1. These regulations may be called 'The Maharashtra COVID-19 Regulations, 2020'.
2. COVID-19 means the Coronavirus Disease caused by Severe Acute Respiratory Syndrome Coronavirus 2 (SARS CoV 2) as defined by the World Health Organization (WHO) / Government of India.
3. 'Empowered Officer' under Section 2(1) of the Act. shall be Commissioner, Health Services, Director of Health Services (DHS-I and II), Director, Medical Education and Research (DMER), all Divisional Commissioners of Revenue Divisions and all Collectors and Municipal Commissioners and they are empowered to take such measures as are necessary to prevent the outbreak of COVID-19 or the spread thereof within their respective jurisdictions.
4. All hospitals (Government and Private) should have separate corners for screening of suspected cases of COVID-19.
5. All hospitals (Government and Private) during screening of such cases shall record the history of travel of the person to any country or area where COVID-19 has been reported. In addition, the history of contacts with the suspected or confirmed case of COVID-19 is also required to be recorded. Information of all such cases must be given to State Integrated Disease Surveillance Unit and Collector of the district/ local Municipal Commissioner immediately.—
(i) In case the person has any such history of travel to affected areas in last 14 days and he/ she is asymptomatic, he/ she must remain in home quarantine for 14 days from the day of exposure. He/ she must abide by the Home Quarantine Guidelines issued by Ministry of Health and Family Welfare, Government of India meticulously. Persons who do not observe the Home Quarantine Guidelines shall be quarantined in the quarantine facilities set up by Government.
(ii) Person with travel history and symptoms as per case definition of COVID-19, must be isolated in a hospital as per protocol and he/ she will be tested for COVID-19 as per protocol.
These stipulations of duration and symptoms may undergo changes based on advisories issued by Government of India.
6. No person/ Institution/ organization will use any print or electronic or social media for dissemination of any information regarding COVID-19 without ascertaining the facts and prior clearance of the Commissioner, Health Services, Director of Health Services (DHS-I and II), Director, Medical Education and Research (DMER), or Collector as the case may be. This is necessary to avoid spread of any unauthenticated information and/or rumors regarding COVID-19. If any person / Institution / organization is found indulging in such activity, it will be treated as a punishable offence under these Regulations.
7. Only laboratories authorized to take test samples for COVID-19 will collect the samples as per guidelines of Government of India. Such samples shall be sent to designated laboratories as authorized by Government of Maharashtra / Government of India.
8. Any person with a history of travel in last 14 days to a country or area from where COVID-19 has been reported, must voluntarily report to State Control Room (020- 26127394) or to the State Surveillance Officer, IDSP (020-27290066) / Toll Free number 104 or to such numbers as may be assigned, so thatमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च १६, २०२०/फाल्गुन २६, शके १९४१ ५ necessary measures may be initiated by Commissioner, Health Services, Director of Health Services (DHS-IandII), Director, Medical Education and Research (DMER), and the Collector/ Municipal Commissioner as the case may be.
9. Officers empowered under the Act are authorized to isolate and / or admit a person who develops symptoms simulating that of the COVID-19 infection as per the case definition criteria published by WHO or Government of India from time to time. The empowered officer may initiate action under the section 188 of Indian Penal Code (48 of 1860) against the person who refuses to comply with such advice of isolation and/or admission.
10. In the event of COVID-19 being reported from a defined geographic area such as village, town, ward, colony, settlement, the Collector of the concerned District / Municipal Commissioner of the concerned Municipal Corporation shall be competent to implement following containment measures, but not limited to these, in order to prevent spread of the disease.—
(i) Sealing of the geographical area.
(ii) Barring entry and exit of population from the containment area.
(iii) Restricting Vehicular Movement in the area.
(iv) Closure of schools, offices, cinema halls, swimming pools, gyms, etc. and banning mass congregations, functions as may be deemed necessary.
(v) Initiating active and passive surveillance of COVID-19 cases.
(vi) Hospital isolation of all suspected cases and their contacts.
(vii) Designating any Government or Private Building as a quarantine facility.
(viii) Any other measure as directed by Public Health Department of Government of Maharashtra.
Staff of all Government Departments and Organisations of the concerned area will be at the disposal of Collector/ Municipal Commissioner for discharging the duty of containment measures. If required, Collector / Municipal Commissioner may requisition the services of any other person also.
11. Any person / Institution / organization found violating any provision of these Regulations shall be deemed to have committed an offence punishable under section 188 of Indian Penal Code (45 of 1860). Empowered Officers may penalize any person / institution / organization found violating provisions of these Regulations or any further orders issued by Government under these Regulations.
12. No suit or legal proceedings shall lie against any person for anything done or intended to be done in good faith under this Regulation unless proved otherwise
13. These regulations shall come into force immediately and shall remain valid for a period of one year, or until further orders, whichever is earlier from the date of publication of this Notification.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. PRADEEP VYAS,
Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.