महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ६, अंक १४(४)] बुधवार, मार्च १८, २०२०/फाल्गुन २८, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक २४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६.----महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम
पृष्ठे १-२ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम . . . . . .
दिनांक १८ मार्च २०२० रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.
राजेन्द्र ग. भागवत, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६.
(मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर ""महाराष्ट्र शासन राजपत्रात"" दिनांक १८ मार्च २०२० रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.) महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च १८, २०२०/फाल्गुन २८, शके १९४१ (२) तो, दिनांक १ जानेवारी २०२० पासून अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल. २. महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम याच्या कलम ६ मधील, पोट-कलम १९५६ चा ४९.(५) नंतर, पुढील पोट-कलम जादा दाखल करण्यात येईल :-----
सन १९५६ चा अधिनियम क्रमांक ४९ याच्या कलम ६ ची सुधारणा.
सन २०२० चा महा. १६.
"" (६) महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते (सुधारणा) अधिनियम, २०२० याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून, प्रत्येक सदस्य, वाहनचालकाची सेवा मोफत मिळण्यास हक्कदार असेल. या प्रयोजनासाठी, सदस्यास, वैध वाहनचालन अनुज्ञप्ती (लायसन) धारण करणाया आणि जिचे वय वर्षे साठ पूर्ण झालेले नाही, अशा कोणत्याही व्यक्तीची, वाहनचालक म्हणून नियुक्ती करता येईल. अशा प्रकारे नियुक्त केलेल्या वाहनचालकास, शासनाने, वेळोवेळी काढलेल्या आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करता येईल, असे ठराविक वेतन दरमहा मिळेल."".