महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक २९(२)] शनिवार, एप्रिल १८, २०२०/चैत्र २९, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ५१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मंत्रालय, मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ एप्रिल २०२०.
अधिसूचना
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५
क्रमांक डीएमयु २०१८/२४७/डीएमयु-१.------आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ (२००५ चा ५३) च्या कलम ७८ उपकलम (१) आणि (२) अन्वये असलेल्या अधिकारानुसार शासन अधिसूचना क्रमांक डीएमयु २०१८/२४७/डीएमयु-१, दिनांक २४ जानेवारी २०१९ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन नियम, २०१९ मध्ये महाराष्ट्र शासन पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :-----
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन नियम, २०१९ च्या नियम १४ नंतर खालील नियमांचा अंतर्भाव करण्यात येत आहे :----- "उद्योगांचे सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास देणग्या स्वीकारण्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात यावेे-----
(१) उद्योग जगताकडून देणग्या तसेच उद्योगांचे सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत आपत्ती न्यूनीकरणाकरिता लाभ स्वीकारण्याकरिता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्वतंत्र बँक खात्याची र्िनमिती करेल.
(२) राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत उद्योगांचे सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत देणग्या स्वीकारण्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येईल.
(३) संबंधित मंत्रालयीन विभागाच्या तांत्रिक शिफारशी आणि सहाय्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सदर खाते उघडण्यात येईल. या खात्यात असलेल्या निधीतून प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार आपत्ती न्यूनीकरण आणि आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील उपाययोजना करीता सदर निधी उपयोगात आणण्यात येईल. सदर खात्यातून होणारा खर्च हा शासनाच्या प्रचलित नियम आणि कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल. सदर खात्याचे लेखे शासनाच्या नियमानुसार ठेवण्यात येतील." २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १८, २०२०/चैत्र २९, शके १९४२ REVENUE AND FOREST DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated 16th April 2020.
NOTIFICATION
DISASTER MANAGEMENT ACT, 2005
No DMU-2018/247/DMU-1.—In exercise of the powers conferred by sub section (1) and (2) of section 78 of the Disaster Management Act, 2005 (53 of 2005), the Government of Maharashtra hereby amends the Maharashtra Disaster Management Rules, 2019 published vide the Government Notification No. DMU-2018/ CR 247/DM 1 dated 24th January, 2019 as follows :—
After rule 14 of the Maharashtra Disaster Management Rules, the following Rules shall be inserted namely:—
"Creation of a separate Bank Account under the State Disaster Management Authority for the
purpose of accepting donations under Corporate Social Responsibility :—
(1) The State Disaster Management Authority may constitute a separate bank account for the purpose of accepting donations and getting benefits under Corporate Social Responsibility (CSR) from various corporates for mitigating disasters.
(2) A separate Bank Account will be opened by the State Disaster Management Authority for accepting donations under CSR.
(3) This account will be opened by the State Disaster Management Authority with the technical recommendations and assistance of concerned department of the Government and proceeds thereof may be utilised for mitigation and management of disasters in such a manner as the State Disaster Management Authority may from time to time direct. The said account will be maintained as per Government rules and expenditure from account will be as per extant Government rules and procedures".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KISHOR RAJE NIMBALKAR,
Secretary to Government.