Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV Ext. No. 26 (MAHARASHTRA ORDINANCE No. VII OF 2020.)

Published 04 May 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-05-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मे ४, २०२०/वैशाख १४, शके १९४२ १

RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ६, अंक १६] सोमवार, मे ४, २०२०/वैशाख १४, शके १९४२ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक २६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

नगरविकास विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ मे २०२०.

MAHARASHTRA ORDINANCE No. VII OF 2020.

AN ORDINANCE

to provide for temporary postponement of elections of the Mayor and Deputy Mayor of certain Municipal Corporations on account of

spread of pandemic Corona Covid virus in the State.

सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ७.

राज्यामध्ये कोरोना कोव्हिड विषाणूच्या सार्वत्रिक महामारीच्या साथीचा प्रसार झाल्यामुळे काही

महानगरपालिकांच्या महापौरांच्या व उपमहापौरांच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात पुढे ढकलण्याची

तरतूद करण्यासाठी अध्यादेश.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;

आणि ज्याअर्थी, राज्यभरामध्ये कोरोना कोव्हिड विषाणूच्या सार्वत्रिक महामारीच्या साथीचा प्रसार झाल्यामुळे काही महानगरपालिकांच्या महापौरांच्या व उपमहापौरांच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यासाठी आणि तत्संबंधित व तदनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;

(१)

भाग चार----अ-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मे ४, २०२०/वैशाख १४, शके १९४२ त्याअर्थी आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :----

संक्षिप्त नाव, प्रारंभ व कालावधी.

१. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र महानगरपालिकांच्या (राज्यामध्ये कोरोना कोव्हिड विषाणूच्या सार्वत्रिक महामारीच्या साथीचा प्रसार झाल्यामुळे काही महानगरपालिकांच्या महापौरांच्या व उपमहापौरांच्या) निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलणे अध्यादेश, २०२०, असे म्हणावे.

(२) तो, २७ एप्रिल, २०२० रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

१९०४ चा १.

(३) तो, या अध्यादेशाच्या प्रारंभाच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा राज्य शासन, राजपत्रात अधिसूचना काढून त्याद्वारे अधिसूचित करील अशा आधीच्या तारखेपयर्ंत अमलात राहील; आणि त्यानंतर समाप्त होईल. महाराष्ट्र सर्वसाधारण वाक्-खंड अधिनियमाचे कलम ७ हे, जणू काही तो महाराष्ट्र अधिनियमाद्वारे निरसित करण्यात आला होता त्याप्रमाणे, हा अध्यादेश समाप्त झाल्यावर लागू असेल.

व्याख्या. २. या अध्यादेशामध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर,----

१९४९ चा ५९.

(क) महानगरपालिका याचा अर्थ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमान्वये घटित केलेली महानगरपालिका, असा आहे ;

(ख) एखाद्या महानगरपालिकेच्या संबंधात, "संबंधित अधिनियम" याचा अर्थ, वरील खंड (क) मध्ये र्िनदिष्ट केलेला संबंधित अधिनियम, असा आहे;

(ग) या अध्यादेशात वापरलेले आणि यात व्याख्या न केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना संबंधित अधिनियमामध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल.

३. (१) संबंधित अधिनियमामध्ये किंवा त्या नवे केलेल्या नियमामध्ये किंवा कोणत्याही न्यायालयाचा कोणताही न्यायनिर्णय, हुकूमनामा किंवा आदेश यांमध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी,----

महापौरांच्या व उपमहापौरांच्या निवडणूका पुढे ढकलणे व त्यांचा पदावधी वाढविणे.

(क) महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची कोणतीही निवडणूक, हा अध्यादेश अंमलात आल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा राज्य शासनाद्वारे, कलम १ च्या पोट-कलम (३) अन्वये अधिसूचना काढून त्याद्वारे अधिसूचित करण्यात येईल अशा आधीच्या तारखेपयर्ंत घेण्यात येणार नाही (यात यापुढे, या अध्यादेशामध्ये ज्याचा निर्देश, "उक्तावधी" असा केला आहे) ;

(ख) उक्त कालावधीनंतर निवडून द्यावयाच्या महापौराचा व उपमहापौराचा पदावधी, निवडलेल्या नगरसेवकांच्या पदावधीच्या सह-पदावधी इतका असेल.

(२) पोट कलम (१) मध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, या अध्यादेशाद्वारे वाढविल्या प्रमाणे, महापौराचा व उपमहापौराचा पदावधी समाप्त झाल्यानंतर, ते, संबंधित अधिनियमान्वये नवीन महापौर किंवा, यथास्थिति, उपमहापौर निवडून देण्यात येईपयर्ंत, नियमितपणे पद धारण करतील.

ज्याचा पदावधी वाढविलेला आहे अशा महापौराचे व उपमहापौराचे अधिकार आणि विवक्षित कृतींची विधिग्राता.

४. कलम ३ अन्वये ज्यांचा पदावधी वाढविण्यात आला असल्याचे मानण्यात आले आहे किंवा, यथास्थिति, वाढविलेला आहे असे सर्व महापौर व उपमहापौर, आशा वाढविलेल्या कालावधीमध्ये, असे महापौर किंवा उपमहापौर म्हणून सर्व अधिकारांचा वापर करण्यास, सर्व कर्तव्ये पार पाडण्यास आणि सर्व कामे करण्यास सक्षम असल्याचे मानण्यात येईल आणि सक्षम असतील; आणि उक्त कालावधीमध्ये त्यांच्यापैकी कोणीही केलेली कोणतीही कृती, वाढविलेल्या कालावधीत असा महापौर किंवा, यथास्थति, उपमहापौर, संबंधित अधिनियमान्वये असे सर्व अधिकार किंवा त्यापैकी कोणताही अधिकार वापरू शकत नाही किंवा अशी सर्व कर्तव्ये किंवा त्यापैकी कोणतेही कर्तव्य पार पाडू शकत नाही किंवा सर्व कामे किंवा त्यापैकी कोणतेही काम करू शकत नाही केवळ या कारणावरून, विधिअग्रा असणार नाही, किंवा कोणत्याही न्यायालयामध्ये प्रश्नास्पद करण्यात येणार नाही.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मे ४, २०२०/वैशाख १४, शके १९४२ ३

महापौरांच्या किंवा उपमहापौरांच्या निवडणुका घेण्याची व्यवस्था.

५ या अध्यादेशामध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, या अध्यादेशाद्वारे ज्यांचा कालावधी वाढविलेला आहे अशा विद्यमान महापौराचा आणि उपमहापौराचा पदावधी समाप्त होण्यापूर्वी किंवा समाप्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर, संबंधित अधिनियमाच्या तरतुदींनुसार व त्याखाली केलेल्या नियमांनुसार महापौराच्या व उपमहापौराच्या निवडणुका घेण्यासाठी संबंधित अधिकायांद्वारे व्यवस्था करण्यात येईल.

अडचण दूर करण्याचा अधिकार.

६. जर या अध्यादेशाच्या तरतुदी अमलात आणताना किंवा त्यात अंतभर्ूत असलेल्या कोणत्याही गोष्टीच्या कारणामुळे, किंवा या अध्यादेशामध्ये अंतभर्ूत असलेल्या कोणत्याही बाबीच्या बाबतीत संबंधित अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, राज्य शासनास, अशी अडचण दूर करण्याच्या प्रयोजनार्थ, ती उद्भवेल त्याप्रमाणे, आवश्यक असल्याचे दिसून येईल अशी कोणतीही गोष्ट, राजपत्रामध्ये प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे करता येईल.

व्यावृत्ती.

७. या अध्यादेशातील कोणतीही गोष्ट, कलम १ च्या पोटकलम (३) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या, या अध्यादेशाच्या अवधीच्या कालावधीमध्ये अशा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तात्काळ घ्यावयाच्या महानगरपालिकेच्या महापौराच्या किंवा उपमहापौराच्या निवडणुकीस लागू असणार नाही.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मे ४, २०२०/वैशाख १४, शके १९४२

निवेदन

राज्यातील नगरपालिका कायद्यांच्या विद्यमान तरतुदींनुसार महानगरपालिकांचे महापौर व उपमहापौर यांचा पदावधी अडीच वर्षे इतका आहे. काही महानगरपालिकांमधील महापौर नि उपमहापौर यांचा पदावधी एप्रिल किंवा मे २०२० मध्ये समाप्त होत आहे.

२. राज्यातील कोरोना कोविड विषाणूच्या महामारी साथीच्या प्रसारामुळे महानगरपालिकांचे अधिकारी नि कर्मचारी तसेच जिल्ह्यंतील पोलीस कर्मचारी आणि जिल्हा प्रशासनातील या व प्रतिबंध करणाया उपाययोजना करण्यामध्ये कार्यमग्न आहेत. नागरी व पोलीस प्रशासनावरील कोणताहि संभाव्य गैरवाजवी ताण आणि कायदा नि सुव्यवस्थेची समस्या किंवा नागरिकांची कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी काही महानगरपालिकांचा महापौर नि उपमहापौरांच्या निवडणुका तीन महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या पुढे ढकलणे इष्ट आहे असे वाटते.

३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी कायद्याद्वारे अशा तरतुदी करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक आहे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांची खात्री पटली आहे, म्हणून हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.

मुंबई, दिनांक २ मे २०२०.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

महेश पाठक, शासनाचे प्रधान सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 May 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-05-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-05-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.