Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

सहसचिव, महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांजकडील पुणे जिल्ह्यातील मौजे मुंढवा येथील फेरबदलाची अधिसूचना.

Published 05 May 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-05-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - ३ ]

मंगळवार , मे ५ , २०२० / वैशाख १५ , शके १ ९ ४२

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक ३

प्राधिकृत प्रकाशन

नगर विकास विभाग ,

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२ .

दिनांक ४ मे २०२०

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना, अधिनियम, १९६६

सूचना

क्र. टीपीएस -१८२० /३१ ९/प्र. क्र. ५५/२०२०/कलम ३७ (१ कक)/नवि-१३.--ज्याअर्थी , पुणे महानगरपालिकेची ( मूळ हद्द) सुधारित विकास योजना ( यापुढे जिचा उल्लेख " उक्त विकास योजना " असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ ( यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) चे कलम ३१ ( १) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्रमांक टीपीएस -१८१५/२० ९/प्र. क्र. ६९/१५/वि.यो. पुणे-मंजुरी / नवि-१३ , दिनांक ५ जानेवारी २०१७ अन्वये भागशः मंजूर केली आहे आणि वगळलेल्या भागाची विकास योजना अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१५/२०९/प्र. क्र. ६ ९/१५/ईपी-मंजुरी/नवि-१३ , दिनांक १७ फेब्रुवारी २०१८ ( यापुढे ज्यांचा उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) अन्वये मंजूर केली आहे ;

आणि ज्याअर्थी , उक्त विकास योजनेतील मौजे मुंढवा येथील सर्व्हे नं. ८४ मधील उत्तर- दक्षिण २४.०० मी . विकास योजना रस्त्याची रुंदी कमी करून ती ९.०० मी. प्रस्तावीत करण्याच्या ( यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त रस्ता " असा करण्यात आला आहे) फेरबदल प्रस्तावास शासन नगर विकास विभागाने अधिसूचना क्र. टीपीएस -१८१५/२० ९/प्र . क्र. ६९/१५/ कलम ३७ (१ कक) (ग) /नवि-१३ , दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ अन्वये मंजुरी दिली आहे:

आणि ज्याअर्थी, नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महानगरपालिकेने दिनांक १० फेब्रुवारी २०२० रोजीच्या पत्रान्वये तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २४ जानेवारी २०२० रोजीच्या पत्रान्वये , मौजे मुंढवा येथील सर्व्हे नं. ८४ मधील उक्त रस्त्याची प्रस्तावित ९ .०० मी. रुंदी, यापूर्वी शासनाने उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) अन्वये मंजूर केलेल्या उक्त विकास योजनेतील रुंदीप्रमाणे २४.०० मी . इतकी ठेवण्यात यावी , अशी शासनास विनंती केली आहे ( यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त प्रस्ताव " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महानगरपालिकेने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन, मौजे मुंढवा येथील स. नं . ८४ मधील उक्त उत्तर- दक्षिण रस्त्याची प्रस्तावित ९ .०० मी . रुंदी सदर सूचनेसोबतच्या भाग नकाशावर विस्तृतपणे दर्शविल्यानुसार , यापूर्वी मंजूर उक्त विकास योजनेप्रमाणे २४.०० मी . इतकी ठेवणे योग्य होईल , असे शासनाचे मत झाले आहे ( यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त प्रस्तावित फेरबदल " असा करण्यात आला आहे)

(१ )

एच-२८ , भाग एक-असा . (पु.वि.पु.)- ०३ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी , मे ५ , २०२० / वैशाख १५ , शके १९४२ आता त्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१ कक) अन्वये प्रदत्त असलेल्या अधिकारानुसार शासन " उक्त प्रस्तावित फेरबदल " प्रस्तावासंदर्भात आम जनतेकडून सूचना/ हरकती मागविण्यासाठी सूचना प्रसिद्ध करीत आहे. उक्त प्रस्तावित फेरबदलासंदर्भात नागरिकांना काही सूचना/हरकती दाखल करावयाच्या असल्यास त्या , सदर सूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत सहसंचालक, नगर रचना , पुणे विभाग , नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवनसमोर , २ रा मजला , रुम नं . २१२ , पुणे -४११ ००१ यांचेकडे लेखी स्वरूपात पाठवाव्यात. सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांना प्राप्त होणाऱ्या सूचना/हरकतींवर सुनावणी देण्याकरिता , तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ३७ ( १ कक) अन्वये विहित केलेली कार्यवाही पूर्ण करून अहवाल शासनास सादर करण्याकरिता " अधिकारी " म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

टीप.-(अ) प्रस्तुतची सूचना , प्रस्तावित फेरबदल दर्शविणाऱ्या भाग नकाशासह नागरिकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयांमध्ये उपलब्ध राहील .

(१ ) सहसंचालक, नगर रचना , पुणे विभाग , पुणे .

(२) आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे .

(ब) सदरहू सूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in ( कायदे /नियम) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.

श्रीरंग लांडगे ,

सहसचिव , महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya , Mumbai - 400 032

Dated 4th May 2020 .

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 .

Notice

No. TPS -1820/319 / CR - 55 / 2020/ Sec.37 ( 1AA) / UD - 13 : -Whereas , the Revised Development Plan ofPuneMunicipal Corporation ( Original Limit ) ( hereinafter referred to as " the said Development Plan " ) prepared under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ( hereinafter referred to as " the said Act " ) has been partly sanctioned by Government in Urban Development Department under Section 31 ( 1 ) vide Notification No. TPS - 1815/ 209/ CR - 69 / 15/D.P.Pune- Sanction/ UD - 13 , dated 5th January 2017 and Excluded Part ( EP ) has been sanctioned vide Notification No. TPS- 1815 / 209/CR- 69 /15 / E.P.Sanction / UD - 13 , dated 17th February 2018 ( hereinafter referred to as " the said Notifications " ) ;

and whereas , Government in Urban Development Department has accorded sanction to the modification proposal to reduce the width of 24.00 mtrs . wide North - South Development Plan Road in S. No. 84 ofvillage Mundhwa in the said Development Plan and to propose it to 9.00 mtrs . ( hereinafter referred to as " the said Road " ) vide Notification No. TPS - 1815 / 209/CR - 69 / 15/ Sec . 37 (AA) ( c) /UD - 13, dated 13th December 2019 ;

and whereas , the Pune Municipal Corporation as Planning Authority vide letter dated 10th February 2020 and Local People's Representative vide letter dated 24th January 2020 have requested the Government to restore the proposed 9.00 Mtrs . width of the said Road to 24.00 mtrs . as per the width in the earlier Sanctioned said Development Plan by the Government under Section 31 ( 1 ) of the said Act( hereinafter referred to as the " said Proposal " ) ;

and whereas , considering the request of the Pune Municipal Corporation as Planning Authority and Local People's Representative , the Government is of opinion that , the width of the proposed North - South said Development Plan Road in S. No. 84 of village Mundhwa should be maintained as 24.00 mtrs . as per earlier Sanctioned Development Plan , as shown elaborately on the part plan along with this Notice ( hereinafter referred to as " the said Proposed Modification " ) ;

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी, मे ५ , २०२० / वैशाख १५ , शके १९४२ Now therefore , in exercise of the power conferred under Section 37 ( 1AA ) of the said Act , the Government publishes the Notice in respect of the said Proposed Modification for inviting suggestions / objections from the general public . Suggestions / objections from general public in respect of the said Proposed Modification , if any , shall be forwarded to the Joint Director of Town Planning , Pune Division , New Administrative Building , Opposite Vidhan Bhavan , 2nd floor , Room No.212 , Pune - 411 001 who is being appointed as an " Officer " to hear suggestions / objections received by him and to complete the procedure as mentioned in Section 37 ( 1AA) of the said Act and submit his report to the Government .

Note.- (A) The Notice and the Plan showing proposed Modifications is made available for inspection to the general public during office hours on all working days at the following offices.-

1. Joint Director of Town Planning , Pune Division , Pune .

2. The Commissioner, Pune Municipal Corporation , Pune .

(B) This Notification is also made available on the Government website at www.maharashtra.gov.in (Acts/Rules).

By Order and in the name of the Governor of Maharashtra ,

SHRIRANG LANDGE ,

JointSecretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 May 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-05-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-05-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.