महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक २०] गुरूवार, ऑगस्ट १३, २०२०/श्रावण २२, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ३२
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग
भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ प्रमाणे
कलम १९चे घोषणापत्र.
ज्याअर्थी कार्यकारी अभियंता, रायगड पाटबंधारे लघु विभाग कोलाड यांचेमार्फत सुतारवाडी लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत अतिरिक्त भूसंपादनाकरीता मौजे दुरटोली, ता. रोहा, जि. रायगड येथील जमीन संपादित करावयाची आहे. सदर संपादनासाठी केलेली जमीन उप विभागीय अधिकारी, रोहा यांचे कार्यालयाकडून संपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, उप विभागीय अधिकारी, रोहा यांनी अधिसूचना क्रमांक संकीर्ण/उवि/रोहा/भूसं/ दुरटोली/एस. आर. ११/२०१६ दिनांक ३ जानेवारी २०१९ अन्वये कलम ११ ची अधिसूचना मराठी मध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार ३-९, जानेवारी २०१९ पुष्ठ क्र १२,१३ वर प्रसिद्ध झाली आहे. तसेच "कृषिवल" मध्य शनिवार दिनांक २६ जानेवारी २०१९ रोजी पान नं. ७ वर प्रसिद्ध झाले आहे. यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
त्याअर्थी, मी जिल्हाधिकारी रायगड- अलिबाग, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे.) हा राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम १५च्या पोट-कलम (२) अन्वये अहवाल पाठविलेल्या प्राधिका-याचा अहवाल विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत माझी खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १३, २०२०/श्रावण २२, शके १९४२आणि ज्याअर्थी, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे. उक्त जमिनीच्या संबंधात यापुढे करावयाच्या सर्व कार्यवाहीच्या बाबतीत जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्याकरिता संपादन अधिनियमाचे कलम ३ (g) व अधिनियमाचे कलम २ (छ) याद्वारे उप विभागीय अधिकारी, रोहा उप विभाग, रोहा, ता. रोहा, जि. रायगड यांची नेमणूक करणेत येत आहे.त्याप्रमाणे त्यांना उक्त जमिनीच्या संबंधातील संपादनाची कार्यवाही, या प्रयोजनासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करून सुरू करावी, असे निर्देश देण्यात येत आहे.
अनुसूची- एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
गावाचे नाव :- मौजे दुरटोली तालुका :- रोहा
जिल्हा :- रायगड
अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
१ स.नं. ५१९/१ पैकी
०-३४-७
एकूण
. . ०-३४-७
अनुसूची- दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
अधिसूचना निर्गमित प्रकल्पाचे नाव --- मौजे दुरटोली, ता. रोहा, जि. रायगड येथील सुतारवाडी लघु पाटबंधारे योजने,
करण्यापूर्वी अंतर्गत धरणाचे बुडीत क्षेत्रासाठी.
मौजे दुरटोली, ता.रोहा, जि. रायगड येथील सुतारवाडी लघुपाटबंधारे योजने- प्रकल्पकार्याचे वर्णन --- अंतर्गत धरणाचे बुडीत क्षेत्रासाठी संपादन करण्यात येणारी जमीन.
समाजाला मिळणारे लाभ ---
पायाभूत सुविधा सदर धरणातील पाण्याचा उपयोग मौजे धगडवाडी, दुरटोली, सुतारवाडी, कुडली, सावरवाडी या गावातील लाभधारकांना तसेच अन्य नागरिकांनाही सिंचनासाठी व पाणी पिण्यासाठी होतो. सदर धरण हे मातीचे असून प्रस्तावितसाठी २.३२० दलघमी व उपयुक्त पाणीसाठी २.२६४ दलघमी एवढा आहे.
अनुसूची- तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन (लागू नाही)
गावचे नाव दुरटोली, तालुका-रोहा,
जिल्हा-रायगड
अनुक्रमांक भूमापन क्रमांक किंवा गट नंबर क्षेत्र (हेक्टरमध्ये)
१
निरंक
निरंक
अनुसूची- चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश) (लागू नाही)
" निरंक "
टिप : उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी रोहा, उप विभाग रोहा, ता. रोहा, जि. रायगड या कार्यालयात निरीक्षणाकरिता उपलब्ध होऊ शकेल.
ठिकाण :- अलिबाग, दिनांक :- ३ ऑगस्ट २०२०.
निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड.